Video : इरफान पठाणने दिग्गज गोलंदाजाला मारले चार गगनचुंबी षटकार

ऑस्ट्रेलियाच्या लिजेंड्स टीमने सुरुवातीला फलंदाजी करीत असताना 20 ओव्हरमध्ये 171 धावा केल्या होत्या.

Video : इरफान पठाणने दिग्गज गोलंदाजाला मारले चार गगनचुंबी षटकार
irfan pathan
Image Credit source: twitter
| Updated on: Sep 30, 2022 | 12:57 PM

इरफान पठाणने (Irfan Pathan) सध्या सुरु असलेल्या इंडिया लिजेंड्स (India Legends) या स्पर्धेत आत्तापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे त्याची पुन्हा चर्चा सुरु झाली आहे. कारण त्याने गोलंदाजीसह फलंदाजी उत्तम केल्याने व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) अधिक व्हायरल झाले आहेत. नुकत्याचं झालेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात त्याने चार षटकार खेचल्यामुळे पुन्हा तो चर्चेत आला आहे. पु्न्हा खेळाडूंना खेळता पाहून चाहते देखील खूष आहेत.

रोड सेफ्टी वर्ल्ड या स्पर्धेत टीम इंडियाच्या लिजेंड्सने गुरुवारी ऑस्ट्रेलियाचा पराभव केला. इरफान पठानने चांगली फलंदाजी केल्यामुळे कांगारुंचा पराभव झाला. विशेष म्हणजे कालच्या सामन्यात टीम इंडियाला लिजेंड्स गरज असताना इरफानने 19 व्या षटकात तीन षटकार खेचले.


अंतिम ओव्हरमध्ये पाच चेंडू टीम इंडियाच्या लिजेंड्सला एका धावेची गरज असताना ब्रेट लीला जोरदार षटकार लगावला.

ऑस्ट्रेलियाच्या लिजेंड्स टीमने सुरुवातीला फलंदाजी करीत असताना 20 ओव्हरमध्ये 171 धावा केल्या होत्या.

टीम इंडिया लिजेंड्सकडून नमन ओझाने चांगली पारी खेळली. त्याने नाबाद 90 धावा काढल्या, तसेच इरफान पठाणने 39 धावांची स्फोटक फलंदाजी केली.