IPL 2021 | बायो बबलमध्ये कोरोना कसा शिरला? बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली म्हणतो…

| Updated on: May 06, 2021 | 8:28 PM

आयपीएल 2021 च्या (IPL 2021) बायो-बबलमध्ये कोरोना कसा शिरला, याबाबत काही सांगणं हे अवघड आहे, असं बीसीसीआयचा (Bcci president ) अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) म्हणाला.

IPL 2021 | बायो बबलमध्ये कोरोना कसा शिरला? बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली म्हणतो...
बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली (Bcci President Sourav Ganguly)
Follow us on

मुंबई : भारतात कोरोनाचा (Corona) प्रादुर्भाव वाढत होता. त्यानंतरही बीसीसीआयने जोखीम पत्कारात भारतात आयपीएलच्या 14 व्या मोसमाचं (IPL 2021) आयोजन केलं. स्पर्धा यशस्वीरित्या पार पडावी यासाठी बीसीसीआयने (BCCI) आवश्यक ती सर्व काळजी घेतली. बायो बबलमध्ये (Bio-Bubble) खेळाडूंना ठेवण्यात आलं. मात्र त्यानंतरही ज्याची भिती होती तेच झालं. कोरोनाने बायो बबल भेदला. अनेक खेळाडूंसह सपोर्ट स्टाफला कोरोनाची बाधा झाली. सुरक्षिततेची सर्व काळजी घेतल्यानंतरही कोरोना बायो बबलमध्ये कसा शिरला, हा प्रश्न अनेकांना पडला आहे. यावर बीसीसीआय अध्यक्ष (Sourav Ganguly) सौरव गांगुलीने प्रतिक्रिया दिली आहे. (It is difficult to say how the corona got into the ipl 2021 bio bubble says bcci president sourav ganguly)

बायो बबलमध्येही खेळाडूंना कोरोना कसा झाला, हे सांगणं जरा अवघडच आहे. तसेच कोरोना असतानाही भारतात आयपीएलचं आयोजन करण्यात आलं. यावरुन अनेकांनी टीका केली. या टीकेलाही गांगुलीने सडेतोड उत्तर दिलं आहे.

गांगुली काय म्हणाला?

“इंग्लंडमध्ये कोरोनाची दुसरी लाट आली होती. त्यावेळेस तिथे इंग्लिश प्रीमियर लीग सुरु होती. त्या स्पर्धेतही कोरोनाचे रुग्ण सापडले. मॅन्चेस्टर सिटी आणि आर्सेनलच्या खेळाडूंना कोरोनाने गाठलं. युकेत लॉकाडऊन असताना या स्पर्धेचं आयोजन केलं होतं. जगात सर्वकाही सुरु होतं”, असं गांगुली म्हणाला.

“मागील 3 आठवड्यात परिस्थिती हाताबाहेर”

“भारतात आयपीएल 2021 चं आयोजन केल्यानंतर हे असं काही घडेल, याची कल्पनाही कोणी केली नसेल. फेब्रुवारी महिन्यात परिस्थिती नियंत्रणात होती. कोरोनाचा विस्फोट गेल्या 3 आठवड्यात झालाय. दरम्यान आता BCCI उर्वरित सामन्यांचं आयोजन करण्यासाठी तयारी करत आहे. मात्र स्पर्धा केव्हा पर्यंत सुरु होणार याबाबत काही वक्तव्य करणं हे धाडसाचं ठरेल. उर्वरित 31 सामने भारतात खेळवायचे की यूएईत हा देखील एक प्रश्न आहे. बायो बबलमध्ये कोरोनाच्या शिरकावामुळे नवे प्रश्न उपस्थित झाले आहेत”, असं गांगुलीने स्पष्ट केलं.

आयपीएलच्या 13व्या मोसमाचं आयोजन यूएईत केलं होतं. तेव्हा बायोबबलची जबाबदारी यूकेतील ‘रेस्ट्राटा’ या कंपनीवर होती. तर यावेळेस बायो बबलची जबाबदारी स्वत: बीसीसीआयची होती.

संबंधित बातम्या :

Shikhar Dhawan | ‘गब्बर’ धवनने घेतला कोरोना लसीचा पहिला डोस, शिखरकडून ट्विटरवर फोटो शेअर

IPL 2021 मधील उर्वरित सामने कुठे होणार? ‘या’ 3 देशांची नावं चर्चेत, BCCI समोर मोठं आव्हान

(It is difficult to say how the corona got into the ipl 2021 bio bubble says bcci president sourav ganguly)