
Ranji Trophy 2025 : जम्मू-काश्मीरने रणजी ट्रॉफी टुर्नामेंटमध्ये दिल्लीला 7 विकेटने हरवून इतिहास रचला. 1934 साली भारतात रणजी ट्रॉफी टुर्नामेंटची सुरुवात झाली. 96 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदा जम्मू-काश्मीर टीमने दिल्लीला हरवलं. जम्मू-काश्मीरच्या विजयात आकिब नबी प्लेयर ऑफ द मॅचचा पुरस्काराचा मानकरी ठरला. त्याशिवाय कॅप्टन पारस डोगरा, कामरान इकबाल आणि शर्माजींच्या मुलाने कमाल केली. शर्माजींच्या मुलाचा अर्थ जम्मू काश्मीरचा खेळाडू वंशराम शर्माशी आहे. आपल्या होमग्राऊंडवर खेळताना दिल्लीने जम्मू-काश्मीरसमोर विजयासाठी 179 धावांच लक्ष्य ठेवलं होतं.
जम्मू-काश्मीरच्या टीमने 3 विकेट गमावून हे लक्ष्य पार केलं. जम्मू-काश्मीरच्या या रन चेजमध्ये सर्वात मोठी भूमिका कामरान इकबालची आहे. त्याने 179 पैकी 133 धावा एकट्याने केल्या. टीमला विजय मिळवून दिल्यानंतरच त्याने सुटकेचा निश्वास सोडला. दिल्लीने प्रथम फलंदाजी करताना 211 धावा केल्या. दिल्लीला मोठी धावसंख्या उभारण्यापासून रोखण्यात जम्मू-काश्मीरचा गोलंदाज आकिब नबीने महत्वाची भूमिका बजावली. त्याने पहिल्या इनिंगमध्ये 35 धावा देऊन 5 विकेट काढले.
दुसऱ्या इनिंगमध्ये किती धावा केल्या?
दिल्लीने पहिल्या डावात 211 धावा केल्या. जम्मू-काश्मीरने प्रत्युत्तरात पहिल्या डावात 310 धावा केल्या. यात कॅप्टन पारस डोगराच्या 106 धावांच योगदान होतं. दिल्लीने दुसऱ्या डावात थोडी चांगली कामगिरी केली. पण त्यांना 300 धावांचा टप्पा पार करु करता आला नाही. दिल्लीच्या टीमने दुसऱ्या इनिंगमध्ये 277 धावा केल्या.
शर्माजींच्या मुलाची कमाल
दिल्ली विरुद्ध पहिल्या डावात गोलंदाज आकिब नबीने जिंकलं, तर दुसऱ्या डावात वंशज शर्माची दहशत दिसून आली. त्याने एकट्याने दिल्लीचे 6 विकेट काढले. पहिल्या इनिंगमधील दोन विकेट मिळून वंशज शर्माने मॅचमध्ये एकूण 8 विकेट काढले.