KL Rahul and Athiya Shetty: कधी होणार केएल राहूल आणि अथिया शेट्टी यांचं लग्न ? सुनिल शेट्टीनं दिलं उत्तर

कधी होणार केएल राहूल आणि अथिया शेट्टी यांचं लग्न ?

KL Rahul and Athiya Shetty: कधी होणार केएल राहूल आणि अथिया शेट्टी यांचं लग्न ? सुनिल शेट्टीनं दिलं उत्तर
KL Rahul-Athiya Shetty
Image Credit source: instagram
| Updated on: Nov 29, 2022 | 3:44 PM

मुंबई : टीम इंडियाचा स्टार फलंदाज केएल राहूल (KL Rahul) आणि अथिया शेट्टी (Athiya Shetty) मागच्या अनेक दिवसांपासून एकमेकांना डेट करीत आहेत. सोशल मीडियावर (Social Media)मागच्या काही दिवसांपासून लग्न करणार असल्याची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. विश्वचषक स्पर्धेत केएल राहूलने खराब कामगिरी केली, त्यानंतर त्यांच्यावरती चाहत्यांनी आणि टीम इंडियाच्या माजी खेळाडूंनी जोरदार टीका केली.

बॉलिवूड अभिनेता सुनिल शेट्टीने केएल राहूल आणि अथिया शेट्टी यांच्या लग्नाच्या बाबत एक मोठं विधान केलं आहे. सुनिल शेट्टी याने आम्ही तारिखेवरती विचार करीत असल्याचे म्हटले आहे.

सुनिल शेट्टी यांनी एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीमध्ये, लवकरचं तुम्हाला लग्नाची तारिख आणि ठिकाण सांगण्यात येणार आहे. दोघांच्या शेड्यूलनुसार तारिख ठरवली जाणार आहे.

आशिया चषकात केएल राहूल आणि अथिया शेट्टी शेट्टी एकत्र दिसले होते. ज्यावेळी टीम इंडियाची मॅच असायची, त्यावेळी अथिया शेट्टी मैदानात प्रेक्षकांमध्ये दिसली आहे.

विश्वचषक स्पर्धेतल्या काही मॅच दरम्यान अथिया शेट्टी ऑस्ट्रेलियात पाहायला मिळाली होती.

केएल राहूलला न्यूझिलंड दौऱ्यात विश्रांती देण्यात आली आहे. टीम इंडियामध्ये अनेक युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे.