100 किलोची गुंडी 13 वेळा उचलली, कोल्हापुरात गुंडी उचलण्याची अनोखी स्पर्धा

| Updated on: Oct 09, 2019 | 11:43 AM

दसऱ्यानिमित्त देशभरात उत्साह असताना, कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील गिरगाव इथं सालाबादप्रमाणे गुंडी (Girgaon Gundi competition) उचलण्याची स्पर्धा पार पडली.

100 किलोची गुंडी 13 वेळा उचलली, कोल्हापुरात गुंडी उचलण्याची अनोखी स्पर्धा
Follow us on

कोल्हापूर : दसऱ्यानिमित्त देशभरात उत्साह असताना, कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील गिरगाव इथं सालाबादप्रमाणे गुंडी (Girgaon Gundi competition) उचलण्याची स्पर्धा पार पडली. 100 किलो वजनाची गोलाकार गुंडी (Girgaon Gundi competition) तब्बल 13 वेळा उचलून, ओंकार रामचंद्र पाटील या 19 वर्षीय तरुणाने गुंडीसम्राट हा मानाचा किताब पटकावला.

100 किलो वजनाचा गोलाकार दगड जमिनीवरून वर उचलून तो मांडीवरुन खांद्यावर न थांबता जो जास्त वेळ वर खाली करेल, त्याला या स्पर्धेत गुंडी सम्राट किताब देऊन गौरविण्यात येते. स्पर्धकाच्या शारीरिक आणि बौद्धिक चातुर्याचं कसब यावेळी पाहायला मिळतं.

अंगाचा तोल सावरत स्पर्धेचा थरार पाहताना अनेकांचा  पोटात गोळा आल्याशिवाय राहत नाही. अवघे 19 वय असलेल्या ओंकार रामचंद्र पाटील याने तब्बल 13 वेळ गुंडी वर खाली करत या स्पर्धेत विक्रम प्रस्थापित केला. ही स्पर्धा पाहण्यासाठी पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.