प्रेग्नेंट महिलेसोबत संसार थाटणारी लेस्बियन क्रिकेटर… कधीकाळी विराट कोहलीसोबत लग्नाचे रंगवत होती स्वप्न
प्रेग्नेंट महिलेसोबत संसार थाटणारी लेस्बियन क्रिकेटर लवकरच मुलीला देणार जन्म..., कोण आहे 'ती'? तिने विराट कोहली यांच्यासोबत लग्नाचे रंगवलेले स्वप्न, पण..., सध्या सर्वत्र लेस्बियन कपलची चर्चा...

कधीकाळी भारताचा स्टार क्रिकेटपटू विराट कोहली याच्यासोबत लग्नाचे स्वप्न पाहणारी लेस्बियन क्रिकेटर लवकर मुलीचं जगात स्वागत करणार आहे.. ही क्रिकेटर दुसरी तिसरी कोणी नाही तर, इंग्लँडची क्रिकेटर डॅनी व्याट आहे… डॅनी हिने तिच्या जोडीदारासमोर मनातील भावना मांडल्या आणि दोघींनी मोठ्या थाटात लग्न केलं.. आता या लेस्बियन कपलच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन होणार आहे… सांगायचं झालं तर, इंग्लंडची स्टार महिला क्रिकेटपटू डॅनी व्याट-हॉजने 2024 च्या टी 20 विश्वचषकादरम्यान जोझी हॉज हिच्यासोबत लग्न केलं. जोझी हिच्यााबद्दल सांगायचं झालं तर, ती एक फुटबॉल एजंट आहे.
नुकताच, इंग्लंडची अष्टपैलू खेळाडू डॅनी व्याट-हॉज आणि तिची जोडीदार जॉर्जी व्याट-हॉज सूर्यास्ताच्या वेळी पाण्याच्या काठावर उभे असलेले दिसले. त्यांच्याकडे अल्ट्रासाऊंड फोटो आहेत. फोटो पोस्ट करत, डॅनी व्याट-हॉज आणि जॉर्जी व्याट-हॉज यांनी चाहत्यांसोबत आनंदाची बातमी शेअर केली आहे. एवढंच नाही तर, पोस्टमध्ये त्यांनी खुलासा केला आहे की, ते मुलीला जन्म देणार आहेत.
View this post on Instagram
जॉर्जी व्याट हिने इंन्स्टाग्रामवर फोटो पोस्ट करत मनातील भावना व्यक्त केल्या… आमची छोटी व्याट – हॉज लवकरच येणार आहे… लवकरच भेटू बेबी गर्ल… आता आम्ही तुला भेटण्यासाठी आतुर आहोत… आमचं मन आनंदानं भरून गेलंआहे. या जोडप्याने एक फोटो शेअर केला आहे ज्यामध्ये त्यांच्या चेहऱ्यावर आनंद स्पष्ट दिसतो.
सांगायचं झालं तर, महिला बिग बॅश लीगमध्ये डॅनी व्याट-हॉज उत्तम कामगिरी बजावत असताना ही आनंदाची बातमी समोर आली. लेस्बियन जोडप्याने आनंदाची बातमी सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर, शेफाली वर्मा, ड्वेन ब्रावो अनेर क्रिकेटर्सने शुभेच्छा दिल्या आहेत. विराट कोहली याच्यासोबत लग्न करण्याची इच्छा…
Kholi marry me!!!
— Danielle Wyatt-Hodge (@Danni_Wyatt) April 4, 2014
डॅनी व्याट तेव्हा देखील तुफान चर्चे आली, जेव्हा तिने भारताचा स्टार क्रिकेटपू विराट कोहली यांच्यासोबत लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली. 2014 मध्ये डॅनी व्याट हिने एक ट्विट केलं आणि म्हणालेली, ‘विराट कोहली माझ्यासोबत लग्न करशील…’, त्यानंतर सर्वत्र चर्चांना उधाण आलं होतं…
