Video : लखनौचा ‘सुपर’ विजय, पंजाबविरोधात 20 धावांनी एलएसजी जिंकला, पाहा Highlights Videos

लखनौ सुपर जायंट्सने पंजाब किंग्जसमोर विजयासाठी 154 धावांचे लक्ष्य ठेवलं होतं. ते पंजाबला पूर्ण करता आलं नाही.

Video : लखनौचा सुपर विजय, पंजाबविरोधात 20 धावांनी एलएसजी जिंकला, पाहा Highlights Videos
लखनौचा 'सुपर' विजय
Image Credit source: tv9
| Updated on: Apr 30, 2022 | 12:16 AM

मुंबई : आज आयपीएलच्या (IPL 2022) पंधराव्या सीजनमधील सामन्यात पंजाब (PBKS) विरुद्द लखनौ सुपर जायंट्सने (LSG) वीस धावांनी विजय मिळवलाय. लखनौच्या संघाने गोलंदाजांच्या दमावर विजय मिळवल्यामुळे लखनौ आता पॉईंट्स टेबलमध्ये आठव्या विजयाचा हकदार झालाय. लखनौच्या 154 धाावांच्या टार्गेटचा पाठलाग करताना पंजाब किंग्सला वीस ओवरमध्ये 133 धावाच बनवता आल्या. पंजाबच्या जॉनी बेअरस्टोने सर्वाधिक 28 चेंडूत 32 धावा काढल्या. यात त्याने 5 चौकार मारले. तर मयंक अग्रवालने 17 चेंडूत 25 धावा काढल्या. यात त्याने 2 चौकार आणि 2 षटकार मारले. यानंतर ऋषी धवनने 22 चेंडूत 21 धावा काढल्या. त्यात तीन चौकार आणि एक षटकार मारला. मात्र, अखेर पंजाबला टार्गेट पूर्ण करता आलं नाही.पंजाबविरोधात 20 धावांनी लखनौचा सुपर विजय झाला.

पंजाब विरुद्ध लखनौ सान्यातील काही विशेष क्षण, VIDEO पाहण्यासाठी इथे क्लिक करा

डी कॉकचं अर्धशतक हुकलं

पहिला झटका केएल काहुलचा बसला. त्यानंतर डी कॉक चांगला खेळला मात्र थोड्यावरुन त्याचं अर्धशतक हुकलं. संदीप शर्माने जितेश शर्माच्या हाती डी कॉकला झेलबाद केलं. डी कॉकने बाद होण्याआधी 37 चेंडूत 46 धावा काढल्या.

डी कॉकची विकेट, VIDEO पाहण्यासाठी इथे क्लिक करा

रबाडाने चार विकेट घेतल्या

लखनौ सुपर जायंट्सचा संघ चांगल्या भागीदारीनंतर थांबली. रबाडाने तिसऱ्या षटकात दोन मोठे धक्के दिले. त्याने षटकाच्या पहिल्या चेंडूवर क्रुणाल पांड्याला सात धावांवर बाद केले आणि त्यानंतर पाचव्या चेंडूवर आयुष बडोनीकडे धाव घेतली.

पंजाबचा पराभव

लखनौ सुपर जायंट्सने पंजाब किंग्जसमोर विजयासाठी 154 धावांचे लक्ष्य ठेवलं होतं. पुण्याच्या एमसीए स्टेडियमवर सुरू असलेल्या या सामन्यात नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना लखनौने 8 गडी गमावून 153 धावा केल्या होत्या. लखनौ संघाने शेवटच्या 55 धावांमध्ये 7 विकेट गमावल्या. लखनौकडून क्विंटन डी कॉकने 47 धावा केल्या. पंजाबकडून रबाडा आणि राहुल चहर यांनी मिळून 6 विकेट घेतल्या. रबाडाने 4 आणि चहरने दोन गडी बाद केले होते.