
गुजरातमधील वडोदरा येथे असलेल्या समा स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये 28 ते 30 नोव्हेंबरदरम्यान झालेल्या 21व्या WKI इंटरनॅशनल कराटे चॅम्पियनशिप 2025 मध्ये महाराष्ट्राची उदयोन्मुख कराटेपटू आराध्या पांडेय हिने दमदार कामगिरी करत राज्याचे नाव उज्ज्वल केले. वाडो-काई इंडिया (WKI) संघटनेतर्फे आयोजित ही प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय स्पर्धा अनेक देशांतील खेळाडूंना एकाच मंचावर आणते आणि याच मंचावर महाराष्ट्रातील आराध्याने आपली चमक दाखवली.
या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत विविध देशांतील खेळाडूंनी भाग घेतला. स्पर्धेत दोन प्रमुख गटांमध्ये सामने झाले. काता (Kata) ज्यामध्ये तंत्र, संतुलन आणि नियंत्रण यावर विजेता ठरतो आणि कुमिते ज्यामध्ये प्रत्यक्ष सामने होऊन विजेता निवडला जातो. या दोन्ही प्रकारांमध्ये आराध्याने अप्रतिम कौशल्य दाखवले.
Aaradhya Pandey
कुमितेमध्ये आराध्याने नेपालच्या खेळाडू ला पराभूत करून सुवर्ण पदक जिंकले, तर कातामध्ये श्रीलंकेच्या खेळाडू ला मात देत कांस्य पदक आपल्या नावे केले. तिचा आत्मविश्वास, वेग, तंत्र आणि संतुलन पाहून उपस्थित प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले. फॉरमोस्ट फायटर अकॅडमीमधून निवड झालेल्या इतर विद्यार्थ्यांनीही भारताचे प्रतिनिधित्व करत विविध गटांत उत्कृष्ट कामगिरी करून पदके जिंकली आहेत.
या खेळाडूंची ही कामगिरी केवळ एक विजय नाही, तर मेहनत, शिस्त आणि योग्य मार्गदर्शन मिळाल्यास आंतरराष्ट्रीय स्तरावर यश मिळवणे शक्य आहे याचा पुरावा आहे. आराध्याचे प्रशिक्षक पुरु रावल आपल्या शिष्याच्या यशाने अत्यंत आनंदी असून आराध्या भविष्यात महाराष्ट्राला आणि देशाला अनेक मोठ्या आंतरराष्ट्रीय पदकांची भेट देईल असा विश्वास व्यक्त केला. आपली ही कामगिरी देशाला समर्पित करत आराध्याने सांगितले की, ती पुढे आणखी मेहनत करून महाराष्ट्राचे आणि भारताचे नाव जागतिक मंचावर अधिक उज्वल करणार आहे. आराध्या पांडेय आज महाराष्ट्रासाठीच नव्हे, तर संपूर्ण भारतासाठी एक प्रेरणादायी नाव ठरली आहे.
Aaradhya Pandey
आराध्याच्या या यशाबद्दल तिचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिनंदन केले आहे. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटले, ‘वडोदरा येथे झालेल्या WKI इंटरनॅशनल कराटे स्पर्धेत महाराष्ट्राची आराध्या पांडेय हिने कुमितेमध्ये सुवर्ण आणि कातामध्ये कांस्य पदक जिंकत भारताचा झेंडा अभिमानाने उंचावला. मी तिचे अतिशय मनापासून अभिनंदन करतो. महाराष्ट्राची लेक म्हणून आम्हाला तिचा अभिमान आहे. तिच्या भविष्यातील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा !’
वडोदरा येथे झालेल्या WKI इंटरनॅशनल कराटे स्पर्धेत महाराष्ट्राची आराध्या पांडेय हिने कुमितेमध्ये सुवर्ण आणि कातामध्ये कांस्य पदक जिंकत भारताचा झेंडा अभिमानाने उंचावला. मी तिचे अतिशय मनापासून अभिनंदन करतो. महाराष्ट्राची लेक म्हणून आम्हाला तिचा अभिमान आहे. तिच्या भविष्यातील… pic.twitter.com/cbH9TtIh2U
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) December 1, 2025
मंत्री चंद्रकांत पाटील यांनीही सोशल मीडियावर पोस्ट करत लिहिले की, ‘महाराष्ट्राच्या भूमीतील आणखी एका हिऱ्याची आंतरराष्ट्रीय स्तरावर चमक! वडोदरा येथे नुकत्याच पार पडलेल्या WKI इंटरनॅशनल कराटे स्पर्धेत, महाराष्ट्राची कन्या आराध्या पांडेय हिने कुमितेमध्ये सुवर्ण आणि कातामध्ये कांस्य पदक जिंकत आपल्या जबरदस्त कामगिरीने भारताचा आणि महाराष्ट्राचा झेंडा अभिमानाने उंचावला आहे. मी तिचे मन:पुर्वक अभिनंदन करतो. महाराष्ट्राची लेक म्हणून आम्हाला तुझा खूप खूप अभिमान आहे. आराध्याच्या पुढील वाटचालीस आणि भविष्यातील सर्व आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी खूप खूप शुभेच्छा!’
महाराष्ट्राच्या भूमीतील आणखी एका हिऱ्याची आंतरराष्ट्रीय स्तरावर चमक!
वडोदरा येथे नुकत्याच पार पडलेल्या WKI इंटरनॅशनल कराटे स्पर्धेत, महाराष्ट्राची कन्या आराध्या पांडेय हिने कुमितेमध्ये सुवर्ण आणि कातामध्ये कांस्य पदक जिंकत आपल्या जबरदस्त कामगिरीने भारताचा आणि महाराष्ट्राचा… pic.twitter.com/TWglqMhEot
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) December 1, 2025