महेंद्रसिंह धोनीकडे सचिन-सेहवागला मागे टाकण्याची संधी

मुंबई : ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या वन डे सामन्यात दमदार कामगिरी करत पुन्हा एकदा यष्टीरक्षक महेंद्रसिंह धोनीने आपली धडाकेबाज फलंदाजी दाखवून दिली. धोनीच्या जबरदस्त फलंदाजामुळे भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्धची वन डे मालिका 2-1 अशी जिंकली. आता येत्या बुधवारी धोनी न्यूझीलंडविरुद्ध सुरु होत असलेल्या वन डे मालिकेत खेळणार आहे. यासाठी भारतीय संघाचा सराव सुरु आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पाच …

महेंद्रसिंह धोनीकडे सचिन-सेहवागला मागे टाकण्याची संधी

मुंबई : ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या वन डे सामन्यात दमदार कामगिरी करत पुन्हा एकदा यष्टीरक्षक महेंद्रसिंह धोनीने आपली धडाकेबाज फलंदाजी दाखवून दिली. धोनीच्या जबरदस्त फलंदाजामुळे भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्धची वन डे मालिका 2-1 अशी जिंकली. आता येत्या बुधवारी धोनी न्यूझीलंडविरुद्ध सुरु होत असलेल्या वन डे मालिकेत खेळणार आहे. यासाठी भारतीय संघाचा सराव सुरु आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पाच वनडे सामने खेळवले जाणार आहेत.

न्यूझीलंडविरुद्धच्या वन डे मालिकेत धोनीला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडण्याची संधी आहे. न्यूझीलंडमध्ये धोनीने आतापर्यंत 10 वन डे सामन्यात 456 धावा केल्या आहेत. न्यूझीलंडमध्ये  सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय क्रिकेटरच्या यादीत धोनी तिसऱ्या स्थानावर आहे. जर धोनीने या मालिकेत 197 धावांचा पल्ला गाठला तर तो सचिन तेंडुलकरला मागे टाकत पहिल्या स्थानावर झेप घेऊ शकतो.

सचिन तेंडुलकरने न्यूझीलंडमध्ये 18 सामन्यांमध्ये सर्वाधिक 652 धावा केल्या आहेत. यानंतर दुसऱ्या स्थानावर भारताचा माजी फलंदाज वीरेंद्र सेहवागचं नाव येतं. सेहवागने 12  सामन्यांमध्ये 598 धावा ठोकल्या  आहेत. तर धोनी 456 धावांसह तिसऱ्या स्थानावर आहे.

ऑस्ट्रेलिया दौऱ्याआधी धोनीच्या खेळावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात होतं.  37 वर्षीय धोनीला आगामी विश्वकप स्पर्धेसाठी कमकुवत समजलं जात होतं. मात्र धोनीने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत दमदार कामगिरी करुन, विरोधकांना फलंदाजीने उत्तर दिलं.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *