AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

निवृत्तीनंतरही महेंद्र सिंह धोनी याची अनोखी कामगिरी, भरला इतका जास्त कर…

MS Dhoni Income Tax: आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून संन्यास घेतल्यानंतरही माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी या बिहार आणि झारखंड येथील सर्वाधिक टॅक्सपेअर बनला आहे.

निवृत्तीनंतरही महेंद्र सिंह धोनी याची अनोखी कामगिरी, भरला इतका जास्त कर...
Mahendra Singh Dhoni
| Updated on: May 11, 2026 | 7:24 PM
Share

MS Dhoni Income Tax: भारतीय क्रिकेट टीमचा माजी महेंद्र सिंह धोनी याची जादू खेळाच्या मैदानात तर सर्वांनी पाहिलीच आहे. कॅप्टन कूल म्हणून ओळखला जाणारा धोनी आता आर्थिक जगतातही कमाल दाखवत आहे. ताज्या आकडेवारीनुसार महेंद्र सिंह धोनी आता बिहार आणि झारखंड राज्यात सर्वाधिक कर भरणारा(Individual Taxpayer) व्यक्ती झाला आहे.

50 कोटीहून जास्त कर

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून संन्यास घेतल्यानंतरही धोनी आता ब्रँड एंडोर्समेंट, आयपीएल आणि अनेक प्रकारच्या बिझनस वेंचर्समध्ये सतत सक्रीय आहे. याच कारणाने धोनीच्या उत्पन्नाचा ग्राफ सतत वाढतच आहे. बातम्यांनुसार धोनी याने गेल्या आर्थिक वर्षात 50 कोटींहून अधिक एडव्हान्स टॅक्स जमा केलेला आहे. आयकर विभाग कोणत्याही व्यक्तीची कर भरलेल्या रकमेची माहिती सार्वजनिक करत नाही. परंतू बिहार-झारखंड क्षेत्राचे मुख्य आयकर आयुक्त डॉ. डी. सुधाकर राव यांनी या वृत्ताला दुजोरा देत धोनी हा व्यक्तिगत श्रेणीत सर्वात मोठा करदाता ठरला आहे.

बिहार-झारखंडचे रेकॉर्ड टॅक्स कलेक्शन

धोनी याच्या व्यक्तिगत कर भरल्याचा रेकॉर्ड झाला असतानाच दुसरीकडे बिहार आणि झारखंड यांच्या एकूण कर संकलनात एक ऐतिहासिक वाढ पाहायला मिळाली आहे. आयकर विभागाने आर्थिक वर्ष 2025-26 दरम्यान दोन्ही राज्यातून 20,000 कोटींचा रेकॉर्ड कर वसुल केला आहे. या आकड्यात झारखंडची कामगिरी उजवी ठरली आहे. झारखंडने एकूण कर संकलनात 12,000 कोटींहून अधिक वाटा उचलला आहे. सरकारी तिजोरीत आलेल्या मोठ्या रकमेपैकी सुमारे 70 टक्के वाटा हा थेट ‘टॅक्स डिडक्शन अॅट सोर्स’ म्हणजे टीडीएस (TDS) द्वारा जमा झाला आहे. हा आकडा पारदर्शक वित्तीय देवाण-घेवाण आणि अनुपालन दर्शवतो.

सरकारी कंपन्यांचा दबदबा

केवळ व्यक्तीगत स्तरावरच नाही तर कॉर्पोरेट जगातील मोठ्या सरकारी कंपन्यांनी देखील या मजबूत टॅक्स कलेक्शनमध्ये मोलाची साथ दिली आहे. सेंट्रल कोलफील्ड्स लिमिटेड (CCL), भारत कोकिंग कोल लिमिटेड (BCCL) आणि CMPDI सारख्या मोठ्या कंपन्यांनी देखील सरकारी खजिन्यात मोठे योगदान दिले आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार मोठ्या पर्जन्यवृष्टीतही खणन कार्यात आलेल्या व्यत्ययानंतरही या कॉर्पोरेट्सद्वारा मिळालेले टॅक्स कलेक्शन समाधानकारक आहे.

एवढेच लोक भरतात इन्कम टॅक्स रिटर्न

बिहार आणि झारखंडमध्ये एकूण 5.5 कोटी लोकांकडेच पॅनकार्ड आहे. मात्र, या पैकी केवळ 40 लाख लोकच त्यांचा इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) फाईल करतात. पॅनकार्डधारक आणि रिटर्न भरणाऱ्यांमधील हे मोठे अंतर अर्थव्यवस्थेसाठी एक मोठे आव्हान आहे. हेच कारण आहे की आयकर विभागाने लोकांमध्ये जनजागृती करणे आणि रिटर्न भरणाऱ्यांची संख्या वाढवण्यासाठी ‘आऊटरीच प्रोग्रॅम’सुरु करण्याची तयारी केली आहे.

Follow Us
पक्षप्रवेश करणाऱ्या 6 खासदारांची खासदारकी जाणार? शिंदेंनी एका झटक्यातच
Big Breaking | पक्षप्रवेश करणाऱ्या 6 खासदारांची खासदारकी जाणार? शिंदेंनी एका झटक्यातच दिलं उत्तर; कायदेशीर...
ठाकरेंच्या 6 खासदारांचा शिवसेने जाहीर पक्षप्रवेश; पत्रकार परिषदेच्या..
ठाकरेंच्या 6 खासदारांचा शिवसेने जाहीर पक्षप्रवेश; पत्रकार परिषदेच्या सुरुवातीलाच शिंदेंचं ओमराजेंबाबत मोठं विधान
गेल्या दोन तासांपासून बैठक सुरु; 6 फुटीर खासदार Y. B. चव्हाण सेंटरवर
गेल्या दोन तासांपासून बैठक सुरु; 6 फुटीर खासदार Y. B. चव्हाण सेंटरवर पोहोचण्याआधीच...
हुबेहुब रुपाली चाकणकर! महाराष्ट्रभर गाजलेल्या खरात प्रकरणावरील चित्रपट
हुबेहुब रुपाली चाकणकर! महाराष्ट्रभर गाजलेल्या खरात प्रकरणावरील चित्रपटाचा First Look समोर
6 खासदार गेलेच, आता ते 3 आमदारही नाराज? ठाकरेंच्या बैठकीला मारली दांडी
मोठी घडामोड! 6 खासदार गेलेच, आता ते 3 आमदारही नाराज? उद्धव ठाकरेंच्या बैठकीला मारली दांडी!
पक्ष प्रवेशापूर्वीच शिंदेकडून ओमराजेंना मोठं गिफ्ट? थेट दिल्लीत...
Omraje Nimbalkar | पक्ष प्रवेशापूर्वीच मोठं घडलं; शिंदेकडून ओमराजेंना मोठं गिफ्ट? थेट दिल्लीत...
शिंदे-मींदे बाळंत झालेत, 6 गद्दारांना जन्म दिला; राऊतांचा हल्लाबोल
Sanjay Raut | शिंदे-मींदे बाळंत झालेत, 6 गद्दारांना जन्म दिला, नंदनवनात पाळणा...शिंदेंवर राऊतांचा हल्लाबोल
उद्धव ठाकरेंच्या बाजूला बसलेलेही त्यांनी फसवतायेत? बड्या नेत्याच्या
उद्धव ठाकरेंच्या बाजूला बसलेलेही त्यांनी फसवतायेत? बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
ऑपरेशन टायगर 2 पण होणार, शिंदेंच्या बड्या नेत्याने दिले मोठे संकेत
मोठी बातमी! 6 खासदारांनंतर आणखी मोठा धक्का; ऑपरेशन टायगर 2 पण होणार, शिंदेंच्या शिवसेनेच्या बड्या नेत्याने दिले मोठे संकेत
उद्धव ठाकरेंची 20 आमदारांसोबत बैठक, बैठकीला कोण हजर अन् कोण गैरहजर?
Thackeray MLA Meeting | उद्धव ठाकरेंची 20 आमदारांसोबत बैठक, बैठकीला कोण हजर अन् कोण गैरहजर?