Musheer Khan : इंग्लंडमध्ये दाखल होताच सरफराज खानच्या भावाची वादळी खेळी, फक्त इतक्या चेंडूत ठोकलं शतक
Musheer Khan : इंग्लंडमध्ये दाखल होताच सरफराज खानच्या भावाची बॅट चांगलीच तळपली. सध्या भारताची सीनियर टीम आणि अंडर-19 टीमही इंग्लंड दौऱ्यावर आहे. मुशीर खान मुंबईच्या संघातील उदयोन्मुख स्टार खेळाडू आहे.

भारताच्या सीनियर टीमशिवाय अंडर-19 टीमही सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. दुसऱ्याबाजूला मुंबई क्रिकेट संघाने आपली इमर्जिंग टीम इंग्लंड दौऱ्यावर पाठवली आहे. मुंबईची इमर्जिंग टीम एक महिन्याच्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. मुंबईची टीम या दौऱ्यात वेगवेगळे काऊंटी क्लब आणि स्थानिक संघांविरुद्ध दोन पाच दिवसीय आणि चार एकदिवसीय सामने खेळणार आहे. सध्या मुंबईची टीम नॉटिंघमशर सेकंड इलेव्हन विरुद्ध खेळत आहे. मुंबईच्या संघातील उदयोन्मुख स्टार मुशीर खानने शतक ठोकलं आहे.
मुशीर खानने इंग्लंड दौऱ्याची सुरुवात शतकाने केली आहे. नॉटिंघमशर सेकंड इलेव्हन विरुद्ध मुशीरने शतक ठोकून सगळ्यांच लक्ष आपल्याकडे वेधून घेतलं. मुशीर खानने 127 चेंडूंचा सामना करताना 100 धावा केल्या. या दरम्यान त्याने 14 चौकार लगावले. त्याने डाव संभाळताना टीमसाठी मजबूत पायाभरणी केली. सरफराज खानचा भाऊ मुशीर खानसाठी हा दौरा खूप महत्त्वाचा आहे. मागच्या काही सामन्यात देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्याने शानदार प्रदर्शन केलं आहे. आता मुशीर खानकडे परदेशी विकेटवर स्वत:ला सिद्ध करण्याची संधी आहे.
मुंबईची टीम कोणाविरुद्ध खेळणार?
युवा खेळाडूंना आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा अनुभव मिळावा, हा या दौऱ्यामागे उद्देश आहे. क्रिकेटच टेक्निक, रणनितीक आणि मानसिक कौशल्य वाढवणं हा यामागे उद्देश आहे. मुंबईने 16 सदस्यीय टीम इंग्लंडला पाठवली आहे. मुशीर खानशिवाय अंगकृष रघुवंशी आणि युवा स्पिनर हिमांशु सिंह सुद्धा या टीमचा भाग आहेत. सूर्यांश शेडगेकडे टीमच नेतृत्व आहे. त्याच्यासोबत वेदांत मुरकरला उपकर्णधार बनवून पाठवण्यात आलं आहे. मुंबईची टीम नॉटिंघमशरशिवाय वॉर्सेस्टरशर, ग्लूस्टरशर आणि काउंटीची चॅलेंजर्स टीम सारख्या मजबूत संघांविरुद्ध खेळणार आहे.
इंग्लंड दौऱ्यासाठी मुंबईची इमर्जिंग टीम
सूर्यांश शेड़गे (कॅप्टन), वेदांत मुरकर (उपकर्णधार), अंगकृष रघुवंशी, आयुष वर्तक, आयुष जिमारे, हिमांशु सिंह, मनन भट्ट, मुशीर खान, निखिल गिरी, प्रग्नेश कनपिल्लेवार, प्रतीककुमार यादव, प्रेम देवकर, प्रिंस बदियानी, जैद पाटणकर, हृषिकेश गोरे आणि हर्षल जाधव.
