रोहित, विराटला 2027 ODI वर्ल्ड कपमध्ये खेळायचं असेल तर फक्त दोनच अटी, थेट बीसीसीआयने…

Mithun Manhas On 2027 World Cup: बीसीसीायचे अध्यक्ष मिथुन मन्हास यांनी २०२७च्या विश्वचषकासाठी भारतीय संघात खेळायचे असल्यास काय गरजेचे आहे ते आता स्पष्ट बोलून दाखवले आहे..

रोहित, विराटला 2027 ODI वर्ल्ड कपमध्ये खेळायचं असेल तर फक्त दोनच अटी, थेट बीसीसीआयने...
| Updated on: Oct 13, 2026 | 3:29 PM

Mithun Manhas On 2027 World Cup: २०२७ चा एकदिवसीय विश्वचषक अजून एक वर्ष दूर असला तरी, भारतीय संघात कोणाचा समावेश असेल यावर चर्चा सुरू झाली आहे. सर्वात मोठा प्रश्न हा आहे की रोहित शर्मा आणि विराट कोहली खेळणार की नाही. गेल्या विश्वचषक अंतिम सामन्यातील पराभवाचे दुःख या दोन्ही अनुभवी खेळाडूंच्या मनात अजूनही आहे. हे दोघे विश्वचषक खेळणार की नाही यावर आणखी प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. आता यावर बीसीसीआयचे अध्यक्ष मिथुन मनहास यांनी एक विधान केले आहे.

स्पोर्टस्टारला दिलेल्या एका विशेष मुलाखतीत, बीसीसीआयचे अध्यक्ष मिथुन मनहास म्हणाले की, “भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी खेळाडूची पात्रता वयापेक्षा तंदुरुस्ती आणि कामगिरीवर ठरवली पाहिजे. निवडीची प्रकरणे माझ्या अधिकारक्षेत्राबाहेरची असून ती निवड समितीची जबाबदारी आहे. जोपर्यंत बीसीसीआयचा संबंध आहे, आम्ही यावर भाष्य करू शकत नाही कारण हे सर्व निवड समिती आणि प्रशिक्षकांवर अवलंबून आहे. पण माझ्या मते, निवडीचा आधार वय नव्हे, तर तंदुरुस्ती आणि कामगिरी असावी. जर एखादा खेळाडू खेळण्यासाठी तंदुरुस्त असेल आणि देशासाठी चांगली कामगिरी करून सामने जिंकत असेल, तर आपण फक्त त्यावरच लक्ष केंद्रित केले पाहिजे.”

Loading...

जर रोहित शर्माची २०२७ च्या विश्वचषकासाठी निवड झाली, तर तो वयाच्या ४० व्या वर्षी भारतासाठी विश्वचषकात खेळणारा सर्वात वयस्कर खेळाडू ठरेल, तर विराट कोहली ३८ वर्षांचा असेल. २०२७ चा एकदिवसीय विश्वचषक डोळ्यासमोर ठेवून गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये शुभमन गिलला भारताचा कर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले होते. मनहास यांचा विश्वास आहे की, या २७ वर्षीय नवीन कर्णधाराला अनुभवी खेळाडूंची साथ मिळेल. संघात विराट, हार्दिक पांड्या आणि रोहित असल्यामुळे गिलला निश्चितच मदत होईल. मग जसप्रीत बुमराहसारखे खेळाडू आहेत जे संघाचे नेतृत्व करू शकतात, गोलंदाजीचा कर्णधार होऊ शकतात आणि मग कोणीतरी क्षेत्ररक्षणाचा कर्णधार असेल, त्यामुळे हा सर्व जबाबदाऱ्यांच्या विभागणीचा प्रश्न आहे.”

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us