AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्लॅटिना बाईक ते आंतराष्ट्रीय क्रिकेट सामना, ऑस्ट्रेलियात वर्णभेदाची टीका, वाचा मोहम्मद सिराजची संघर्षगाथा

मोहम्मद सिराजने वैयक्तिक आयुष्यात प्रचंड संघर्ष करत टीम इंडियात स्थान मिळवलं आहे (Mohammad siraj true life story).

प्लॅटिना बाईक ते आंतराष्ट्रीय क्रिकेट सामना, ऑस्ट्रेलियात वर्णभेदाची टीका, वाचा मोहम्मद सिराजची संघर्षगाथा
| Updated on: Jan 10, 2021 | 7:55 PM
Share

मुंबई : भारतीय क्रिकेट संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया यांच्यात सिडनीत तिसरी कसोटी खेळण्यात येत आहे. मात्र, या कसोटीच्या तिसऱ्या आणि चौथ्या दिवशी भारतीय खेळाडूंना विचित्र प्रसंगाला सामोरं जावं लागलं. या सामन्यादरम्यान प्रेक्षकांकडून काल (9 जानेवारी) जसप्रीत बुमराह आणि आज (10 जानेवारी) मोहम्मद सिराजला वर्णभेदाच्या टीकेचा आणि शिव्यांचा सामना करावा लागला (Mohammad siraj true life story).

मोहम्मद सिराजने वैयक्तिक आयुष्यात प्रचंड संघर्ष करत टीम इंडियात स्थान मिळवलं आहे. त्याने आतापर्यंत फक्त सहा आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत, असं असताना त्याला अशा प्रकारच्या प्रसंगातून सामोरे जावे लागले. या अशाप्रकारे टीका-टीप्पणी करुन खेळाडूंचं मनौधर्य खचवण्याचा केविलवाणा प्रयत्न काही विकृतांकडून केला जातो. पण सिरोज यातूनही यशस्वीपणे बाहेर पडेल. सिरोजच्या आजपर्यंतचा संघर्षाविषयी थोडक्यात माहिती आज आम्ही तुम्हाला देणार आहोत.

एक काळ होता जेव्हा फिरोज प्लॅटिना गाडीवर फिरायचा. त्याच्याजवळ गाडी पंचर झाल्यानंतर पंचर काढण्यासाठीदेखील पैसे नसायचे. तो मित्रांकडून उसणे पैसे घेऊन गाडीचा पंचर काढायचा. तो परिस्थितीशी लढला आणि शेवटी जिंकला. आज तो करोडपती आहे (Mohammad siraj true life story).

सिराजने एकदा टीव्ही प्रेजेंटेटर रीना डिसूजाच्या कार्यक्रमात आपल्या संघर्षाविषयी माहिती दिली होती. यामध्ये त्याने बऱ्याच गोष्टींचा उलगडा केला होता. सिराजचे वडील रिक्षाचालक होते. मात्र, ते आपल्या मुलांच्या इच्छा, आकांशा पूर्ण करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करायचे. सिरोजने सांगितलेल्या माहितीनुसार त्याचे वडील मोहम्मद गौस हे त्याला दररोज 70 रुपये द्यायचे. यापैकी 60 रुपयांचं तो गाडीत पेट्रोल भरायचा. कारण त्याला क्रिकेटच्या सरावासाठी घरापासून प्रचंड लांब जावं लागायचं. यादरम्यान गाडी पंचर झाली तर तो मित्रांना विनंती करुन उसणे पैसे घेऊन गाडीचा पंचर काढायचा. त्यानंतर दुसऱ्यादिवशी मित्रांना त्यांचे पैसे परत करायचा.

सिरोज 2017 पासून आयपीएलमध्ये खेळत आहे. त्याची आयपीएलच्या एका मोसमाची फीज 2.6 कोटी रुपये इतकी आहे. आतातर त्याला आंतरराष्ट्रीय सामने खेळण्याचीदेखील संधी मिळत आहे. त्यामुळे सिरोजचं भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे.

हेही वाचा : “आई म्हणाली सर्वांनाच जायचंय, वडिलांचं स्वप्न पूर्ण कर”, वडिलांच्या निधनानंतर मोहम्मद सिराज भावूक

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.