Mohammad Irfan’s death rumours | पाक क्रिकेटर मोहम्मद इरफानच्या अपघाती मृत्यूची अफवा

| Updated on: Jun 22, 2020 | 12:56 PM

पाकिस्तानी क्रिकेट संघातील वेगवान गोलंदाज मोहम्मद इरफानच्या अपघाती मृत्यूची अफवान सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. Mohammad Irfan's death rumours

Mohammad Irfans death rumours | पाक क्रिकेटर मोहम्मद इरफानच्या अपघाती मृत्यूची अफवा
Follow us on

इस्लामाबाद : पाकिस्तानी क्रिकेट संघातील वेगवान गोलंदाज मोहम्मद इरफानच्या अपघाती मृत्यूची अफवान सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या अफवेवर स्वत: मोहम्मद इरफानने ट्विट करुन, आपण सुरक्षित असल्याचं म्हटलं आहे. “मी पूर्णपणे सुरक्षित आहे. माझ्या निधनाचं वृत्त खोटं आणि तथ्यहीन आहे. सोशल मीडियावरील या फेक न्यूजमुळे माझ्या कुटुंबाला त्रास होत आहे” अशा आशयाचं ट्विट मोहम्मद इरफानने केलं आहे. (Mohammad Irfan’s death rumours)

“कार अपघातात माझा मृत्यू झाल्याची अफवा सोशल मीडियावर पसरवली जात आहे, जी तथ्यहीन आणि फेक आहे. यामुळे माझे कुटुंब आणि चाहत्यांना प्रचंड दु:ख झालं, जे शब्दात सांगू शकत नाही. मला असंख्य फोन कॉल्स आलेत. माझा कोणताही अपघात झाला नाही. आम्ही सर्वजण सुरक्षित आहोत”. असं मोहम्मद इरफान म्हणाला.

38 वर्षीय मोहम्मद इरफानने 2010 मध्ये इंग्लंडविरुद्धच्या वन डे सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. इरफानने पाकिस्तानकडून 60 वनडे, 22 टी 20 आणि 4 कसोटी सामने खेळले आहेत. त्याने कसोटीत 10, वन डे मध्ये 83 आणि टी 20 मध्ये 16 विकेट्स घेतल्या आहेत. मार्च महिन्यात पाकिस्तानात झालेल्या सुपर लीगमध्ये इरफान हा मुल्तान सुल्तान्स या संघाकडून खेळला होता. त्यावेळी त्याने चार विकेट्स पटकावल्या होत्या.

पाकिस्तानात कोरोनाचा कहर

दरम्यान, जगभरात धुमाकूळ घालणाऱ्या कोरोनाने पाकिस्तानातही कहर माजवला आहे.  पाकिस्तानी क्रिकेट संघाचा माजी कर्णधार शाहीद आफ्रिदीला ‘कोरोना’ची लागण झाली आहे. खुद्द आफ्रिदीनेच आपण ‘कोरोना’ पॉझिटिव्ह असल्याचे सांगितले होतं. प्रकृती बिघडल्यामुळे शाहीद आफ्रिदीने ‘कोरोना’ चाचणी केली होती. त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला. माझ्या प्रकृतीसाठी प्रार्थना करा, असे आवाहन आफ्रिदीने ट्विटरवरुन केले.

(Mohammad Irfan’s death rumours)

संबंधित बातम्या 

माझ्यासाठी दुआ करा, पाकिस्तानचा धडाकेबाज क्रिकेटपटू शाहीद आफ्रिदीला कोरोना 

पाक क्रिकेट बोर्डाने बलात्काराचे खोटे आरोप लावून मला संघाबाहेर काढले : शोएब अख्तर