Mohsin Naqvi On Narendra Modi Post: पाकिस्तानी मंत्र्याला झोंबल्या मिरच्या! आधी ट्रॉफी घेऊन पळाला आता मोंदींच्या पोस्टला उत्तर देत म्हणाला…

Mohsin Naqvi On Narendra Modi Post: नुकताच झालेल्या आशिया कप 2025च्या फायनलने भारताने बाजी मारली. पाकिस्तानचा दणकून परभाव केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत पाकिस्तानला ऑपरेशन सिंदूरची आठवण करुन दिली. ही पोस्ट पाहून पाकिस्तानचे मंत्री आणि एसीसीचे अध्यक्ष मोहसीन नक्वीला चांगलीच मिरची झोंबली आहे.

Mohsin Naqvi On Narendra Modi Post: पाकिस्तानी मंत्र्याला झोंबल्या मिरच्या! आधी ट्रॉफी घेऊन पळाला आता मोंदींच्या पोस्टला उत्तर देत म्हणाला...
Asia Cup 2025
Image Credit source: Tv9 Network
| Updated on: Sep 29, 2025 | 5:46 PM

रविवारी, 28 सप्टेंबर रोजी दुबईत आशिया चषक 2025 चा अंतिम सामना झाला. या सामन्यात भारत आणि पाकिस्तान आमने सामने होते. भारताने पाकिस्तानवर 5 गडी राखून दणदणीत विजय मिळवला. आतापर्यंत भारताना नवव्यांदा आशिया चषक जिंकले. हा विजयानंतर भारतात आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले. भारतवासियांसाठी पाकिस्तानविरुद्धचा समाना जिंकल्यानंतर एक वेगळाच आनंद असतो तो सर्वत्र पाहिला गेला. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी सोशल मीडियाद्वारे आनंद व्यक्त केला. मात्र, ते पाहून पाकिस्तानी मंत्र्याला मिरच्या झोंबल्या आहेत.

काय आहे नरेंद्र मोदी यांची पोस्ट?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्स अकाऊंटवर पोस्ट शेअर करत भारताचे कौतुक केले आहे. “खेळाच्या मैदानातही ऑपरेशन सिंदूर, निकाल तोच लागला. भारताने पुन्हा विजय मिळवला. आमच्या क्रिकेटर्सना शुभेच्छा” या आशयाचे ट्विट त्यांनी केले. दहशतवादी संघटनांवर कारवाई न करता भारताकडून शांतता आणि मैत्रीची अपेक्षा ठेवणार्‍या पाकिस्तानला या टि्वटने चांगलाच झटका बसला आहे.

वाचा: बलात्कार इन्स्टाग्रामवर LIVE दाखवला, तीन तरुणींसोबत भयंकर घडलं, पाशवी कृत्याने खळबळ!

हसीन नक्वीला चांगलीच मिरची झोंबली

नरेंद्र मोदींच्या या पोस्टनंतर पाकिस्तानचे मंत्री आणि एसीसीचे अध्यक्ष मोहसीन नक्वीला राग अनावर झाला आहे. त्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पोस्ट शेअर करत, जर युद्ध हे तुमच्या अभिमानाचे माप असेल, तर इतिहास पाहता पाकिस्तानकडून तुमचा अपमानजनक पराभव आधीच नोंदवला आहे. कोणताही क्रिकेट सामना ही वस्तुस्थिती बदलू शकत नाही. खेळात युद्ध ओढल्याने केवळ निराशाच उघड होते आणि खेळाच्या भावनेचा अपमान होतो असे म्हटले आहे. यावरुन मोहसीन नक्वीला चांगलीच मिरची झोंबल्याचे दिसून येत आहे.

PM Modi Tweet

आधी ट्रॉफी घेऊन पळाला

आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष मोहसिन नक्वी यांच्यासोबत ख्वाजा आसिफनेही नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली होती. आशिया कपमधील विजयानंतर टीम इंडियाने मोहसीन नकवी यांच्याकडून ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिला होता. त्यानंतर मोहसीन नकवी मैदानातून आशिया कपची ट्रॉफी आपल्यासोबत घेऊन गेले. तरीही भारतीय टीमने त्यांच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आणि आनंद साजरा केला.