बलात्कार इन्स्टाग्रामवर LIVE दाखवला, तीन तरुणींसोबत भयंकर घडलं, पाशवी कृत्याने खळबळ!
एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. ड्रग्ज घेणाऱ्या व्यक्तींनी 3 तरुणींवर बलात्कार केला आहे. बलात्कार करताना त्यांनी इन्स्टाग्रामवर लाइव्ह व्हिडीओ तयार केला होता. त्यानंतर त्यांनी तरुणींची हत्या केली.

जगाला हादरुन टाकणारी घटना समोर आली आहे. एक तरुणी आणि दोन महिलांवर इन्स्टाग्रामवर लाइव्ह प्रसारण करुन बलात्कार करण्यात आला. त्यानंतर अतिशय वाईट पद्धतीने त्या तिघींची हत्या करण्यात आली. बलात्कार आणि खुनाची संपूर्ण घटना ड्रग तस्करांनी इन्स्टाग्रामवर लाइव्ह दाखवल्यामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे.
बलात्कारानंतर यातना देऊन हत्या
न्यूयॉर्क टाइम्सच्या वृत्तानुसार, ड्रग तस्करांनी अर्जेंटिनामधील ब्युनस आय्रेसमध्ये तीन तरुणींवर बलात्कार करुन त्यांना प्रचंड यातना देऊन हत्या करण्यात आली. ड्रग तस्करांनी सोशल मीडियावर या संपूर्ण घटनेचे लाइव्ह स्ट्रीमिंग केले. या घटनेनंतर संपूर्ण देशात खळबळ माजली आहे. तीन तरुणींमधील एक तरुणी ही अल्पवयीन होती. या घटनेने संपूर्ण अर्जेंटिनाला हादरवून सोडले आहे.
एक घरात बोलावून बलात्कार आणि हत्या
अर्जेंटिनाच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, या महिलांना गेल्या शुक्रवारी ब्युनस आय्रेसच्या बाहेरील परिसरातील एका घरात बोलावले गेले होते, जिथे त्यांच्या यातना आणि हत्येचे इन्स्टाग्राम आणि टिकटॉकवर खासगी स्ट्रीमद्वारे प्रसारण करण्यात आले. ब्युनस आय्रेस प्रांताच्या सुरक्षा मंत्रालयाच्या प्रवक्त्याने सांगितले की, पीडितांची ओळख ब्रेंडा डेल कास्टिलो (२०), मोरेना व्हर्डी (२०), आणि लारा गुटियेरेझ (१५) अशी झाली आहे.
आंतरराष्ट्रीय ड्रग सिंडिकेटवर संशय
पोलिसांचा अंदाज आहे की, या गुन्ह्यामागे एक आंतरराष्ट्रीय ड्रग सिंडिकेट आहे. हा हल्ला मादक पदार्थांच्या एका छोट्या पॅकेटच्या चोरीनंतर बदल्याच्या स्वरूपात करण्यात आला, जे कदाचित पीडितांपैकी एकीने चोरले असावे. ब्युनस आय्रेसचे सुरक्षा मंत्री जेव्हियर अलोंसो यांनी बुधवारी एका पत्रकार परिषदेत म्हटले, “नशेत असल्यामुळे आरोपींनी असे कृत्य केल्याचा संशय आहे. ही नशेशी संबंधित बदल्याची कारवाई होती असे म्हणायला हरकत नाही. आपण याला थेट ‘स्कोअर सेटलिंग’ म्हणू शकतो.”
सेक्सच्या बदल्यात पैसे देण्याचा दिला होता फसवा
पोलिसांच्या मते, तीनही तरुणींना सेक्स वर्कच्या बदल्यात पैसे देण्याचा फसवा देऊन बोलावले गेले होते. अलोंसो म्हणाले, “त्यांना फसवून या जाळ्यात अडकवले गेले. ही योजना एका आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी नेटवर्कने काळजीपूर्वक तयार केली होती.” त्याच रात्री या तरुणींशी बलात्कारासह यातना देण्यात आल्या आणि हत्या करण्यात आली. या घटनेचे लाइव्ह प्रसारण इन्स्टाग्रामवर अनेकांनी पाहिले. सांगितले जाते की, टिकटॉकवरही बलात्कार आणि खुनाचे लाइव्ह प्रसारण करण्यात आले. मात्र टिकटॉकने अद्याप कोणतेही अधिकृत निवेदन दिलेले नाही. तर इन्स्टाग्रामच्या मूळ कंपनी मेटाच्या प्रवक्त्याने म्हटले, “आम्हाला अद्याप इन्स्टाग्रामवर या लाइव्ह स्ट्रीमचे कोणतेही पुरावे मिळालेले नाहीत. आमची टीम तपासात कायद्याच्या अंमलबजावणी संस्थांसोबत सहकार्य करत आहे.”
