Morocco FIFA : मोरक्कोच्या विजयाचा महाउत्सव, रस्त्यावर थिरकले लोक, शकिराने दिल्या खास संगीतमय शुभेच्छा..

| Updated on: Dec 11, 2022 | 4:43 PM

Morocco FIFA : मोरक्कोने इतिहास रचला, रस्त्यावर येऊन लोकांनी विजयोत्सव साजरा केला..

Morocco FIFA : मोरक्कोच्या विजयाचा महाउत्सव, रस्त्यावर थिरकले लोक, शकिराने दिल्या खास संगीतमय शुभेच्छा..
मोरक्कोने रचला इतिहास
Image Credit source: सोशल मीडिया
Follow us on

नवी दिल्ली : कतारमधील फीफा वर्ल्ड कप (FIFA world Cup 2022) अंतिम टप्प्यात जाऊन पोहचला आहे. उपांत्यपूर्व फेरीत मोरक्कोने (Morocco)  पुर्तगालवर विजय मिळवत इतिहास रचला. उपांत्य फेरीत जागा पक्की करणारा मोरक्को हा पहिला अरब-आफ्रिकन देश झाला. मोरक्कोत दिवाळी साजरी झाली. रस्त्यावर येऊन लोकांनी विजयाचा महाउत्सव साजरा केला. तरुणाई रस्त्यावर थिरकली. मोरक्कोचा राष्ट्रध्वज घेऊन चाहते बेधुंद झाले.

मोरक्कोच्या कासाब्लांका शहरातील हजारो चाहते रस्त्यावर उतरले. त्यांनी विजयाचा आनंद साजरा केला. रस्त्यावर उतरुन लोकांनी नृत्य केले. खूप धमाल केली. स्थानिक मीडिया रिपोर्टनुसार, देशात पहिल्यांदा असा नजारा दिसला. ज्यांना कतरमध्ये जाता आले नाही, ते रस्त्यावर उतरून थिरकले.

हे सुद्धा वाचा

केवळ मोरक्कोच नाही तर कतर, सऊदी अरब सहीत अन्य अरब देश ही मोरक्कोच्या विजयाचे साक्षीदारच झाले नाहीत तर त्यांनी या विजयात सहभाग घेतला. स्टार फुटबॉलर क्रिस्टियानो रोनाल्डोची पोर्तुगालची टीम मोरक्को पुढे धराशायी झाली.

मोरक्कोने 1-0 अशा फरकाने पोर्तुगालला मात दिली. त्यामुळे पोर्तुगाल विश्वकपाच्या बाहेर फेकल्या गेला. मोरक्कोच्यावतीने युसूफ एन नेसरी याने 42 व्या मिनिटात भेदक गोल केला आणि तो निर्णायक ठरला. पुढे घडला तो इतिहास आहे. सर्वच राष्ट्र या विजयाचे साक्षीदार ठरले.

मोरक्को हा पहिला आफ्रिकन देश आहे ज्याने उपांत्य फेरीत धडक दिली. मोरक्कोच्या या विजयाने अनेकांना भूरळ घातली. लोकप्रिय गायिका शकीराने मोरक्कोच्या विजयाच्या अनोख्या शुभेच्छा दिल्या. ती ही या आनंदात सहभागी झाली. This Time For Africa असे ट्विट करत तिने चाहत्यांना शुभेच्छा दिल्या.

पाकिस्तानचे पूर्व प्रधानमंत्री इमरान खान याने सुद्धा मोरक्कोच्या विजयाचा आनंद व्यक्त केला. पोर्तुगालला हरवून फुटबॉल विश्वकपच्या उपांत्य फेरीत पोहचल्याबद्दल त्याने टीमचे अभिनंदन केले. पुढील सामान्यांसाठी शुभेच्छा दिल्या.