
टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी गेल्या महिन्यात 44 वर्षांचा झाला. तरीही, तो इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) मध्ये चेन्नई सुपर किंग्ज (सीएसके) कडून खेळत आहे. आयपीएलमध्ये सीएसकेसाठी पाच वेळा विजेतेपद जिंकवून देणारा महेंद्रसिंग धोनी पुढील हंगामात खेळेल की नाही याबद्दल अजूनही शंका आहे, परंतु याचदरम्यान त्याने एक असं विधान केलं आहे, ते ऐकून रिकेट चाहते हैराण झाले आहेत. त्याने IPLमधून निवृत्ती घेण्याबद्दल मोठी गोष्ट सांगितली आहे, पण धोनी कधी निवृत्त होईल हे त्याने उघड केले नाही. मात्र असं असलं तरी आपण नेहमीच सीएसकेसोबत राहू असंही त्याने नमूद केलं.
काय म्हणाला धोनी ?
सीएसकेला धोनीने पाच वेला आयपीएल ट्रॉफी जिंकून दिली आहे, एका कार्यक्रमात बोलताना धोनी म्हणाला, “मी आणि सीएसके, आम्ही एकत्र आहोत. तुम्हाला माहिती आहे, आम्ही पुढील 15-20 वर्षे एकत्र राहू, पण असे समजू नका की मी पुढील 15-20 वर्ष खेळेन.” आयपीएलमध्ये खेळण्याचे माझे कदाचिता आता काहीच दिवस उरले असतील पण मी नेहमीच सीएसकेसोबत राहील असं धोनीन नमूद केलं. टीम इंडियाचा माजी कर्णधार असलेला धोनी पुढे म्हणाला की, ही काही 1-2 वर्षांची गोष्ट नाहीये, मी नेहमीच पिवळ्या जर्सीत खेळेन. मी काही काळाने कदाचित खेळणार नाही, पणं असं असलं तरी माझं मन नेहमीच CSK सोबत असेल, असंही त्याने सांगितलं.
मी नेहमीच पिवळ्या जर्सीत असेन
महेंद्रसिंग धोनी म्हणाला की, मी नेहमीच म्हणतो की माझ्याकडे निर्णय घेण्यासाठी बराच वेळ आहे, परंतु जर तुम्ही पिवळ्या जर्सीमध्ये परतण्याबद्दल विचारत असाल तर मी म्हणेन की मी नेहमीच पिवळ्या जर्सीमध्येच असेल, मी खेळेन की नाही, तो वेगळा मुद्दा आहे. CSKशी असलेले त्याचं नातं नेहमीच राहील. सीएसकेने मला एक चांगला माणूस आणि क्रिकेटपटू बनण्यास खूप मदत केली आहे, असंही धोनीने आवर्जून सांगितलं..
मागचा हंगाम आमच्यासाठी चांगला नव्हते, पण आम्ही आयपीएल 2026 मध्ये चांगली कामगिरी करू, अशी आशा त्याने व्यक्त केली. आयपीएल 2025 मध्ये सीएसकेची कामगिरी चांगली नव्हती आणि ते पॉइंट टेबलमध्ये तळाशी होते. या काळात, ते 14 पैकी फक्त 4 सामने जिंकू शकले.