AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हा खेळाडू निघाला भयंकर अंधश्रद्धाळू… मॅचपूर्वी टॉयलेट सीट झाकून ठेवायचा आणि छतावर… कर्णधारही वैतागायचा

नील मॅकेंजी, दक्षिण आफ्रिकेचा एक प्रतिभावान क्रिकेटपटू, त्याच्या विचित्र अंधश्रद्धांमुळे प्रसिद्ध होता. मॅचपूर्वी तो सर्व टॉयलेट सीट झाकून ठेवायचा आणि बॅट छताला लटकवायचा. मैदानातील पांढऱ्या पट्टीवर कधीच पाय ठेवायचा नाही. त्याच्या या टोटक्यांमुळे कर्णधारही वैतागला होता, पण मॅकेंजीला वाटायचे की यामुळेच त्याला यश मिळते. त्याच्या या सवयी क्रिकेट विश्वात चर्चेचा विषय ठरल्या.

हा खेळाडू निघाला भयंकर अंधश्रद्धाळू... मॅचपूर्वी टॉयलेट सीट झाकून ठेवायचा आणि छतावर... कर्णधारही वैतागायचा
नील मॅकेंजी
| Updated on: May 07, 2026 | 1:13 PM
Share

दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट विश्वात नील मॅकेंजीचं नाव मोठ्या आदराने आणि सन्माने घेतलं जातं. मॅकेंजीने दक्षिण आफ्रिकेसाठी 58 कसोटीस 64 वनडे आणि दोन टी ट्वेंटी इंटरनॅशल सामने खेळले आहेत. मॅकेंजीने कसोटीत 16 अर्धशतके आणि 5 शतकेही झळकावली आहेत. त्याने कसोटीत 3253 धावा कुटल्या आहेत. तर वनडेत त्याने दोन शतके आणि 10 अर्धशतके करून एकूण 1688 धावांची बेगमी केली आहे. मॅकेंजी हा दक्षिण आफ्रिका संघातील आपल्या काळातील सर्वात विश्वासहार्य आणि प्रतिभावंत खेळाडू म्हणून ओळखला जातो. पण तो काही फक्त क्रिकेट विश्वातील त्याच्या खेळामुळेच ओळखला जात नाही, तर त्याच्या अंधश्रद्धाळूपणामुळेही तो तेवढाच ओळखला जातो. तो इतका अंधश्रद्धाळू होता की त्याच्या या अंधश्रद्धाळूपणाला त्याचा कर्णधारही वैतागला होता.

जगात असंख्य खेळाडू त्यांच्या अंधश्रद्धाळूपणामुळे प्रसिद्ध झाले. कुणी पॅड विशिष्ट पद्धतीने बांधायचे तर कुणी मैदानात पाऊल ठेवताना कोणतं पाऊल ठेवायचं याचीही काळजी घ्यायचे. अनेक खेळाडूंच्या अंधश्रद्धेचे असंख्य किस्से आहेत. पण यात नील मॅकेंजी मात्र अत्यंत वेगळा होता. मॅकेंजी मैदानात टोटक्यांवर एवढा विश्वास ठेवायचा की त्याच्या या अंधश्रद्धाळूपणामुळे त्याचा कर्णधारही वारंवार वैतागायचा. पण मॅकेंजीने मात्र त्याचा स्वभाव कधी सोडला नाही. तसं केल्याने यश मिळते, असा त्याचा भ्रम झाला होता.

अन् रोज रात्री…

मॅकेंजी अनेक प्रकारच्या टोटक्यांवर विश्वास ठेवायचा. पण बॅटला छतावर लटकवणे आणि टॉयलेट सीटला झाकण्याच्या त्याच्या कृतीने तो अधिकच प्रसिद्ध झाला. फलंदाजीला उतरण्यापूर्वी तो मैदानात जात असताना आधी ड्रेसिंग रुममधील सर्व टॉयलेटच्या सीट झाकून ठेवायचा. स्वत: हाताने तो टॉयलेट सीट झाकून ठेवायचा. सर्व सीट झाकून ठेवल्यानंतरच तो मैदानात उतरायचा. असं केल्याने कामगिरी दमदार होत असल्याचा त्याचा समज होता. मॅकेंजीचा आणखी एक किस्सा सांगितला जातो. एका सामन्यापूर्वी त्याच्या सहकाऱ्यांनी त्याची बॅट टेप लावून छताला चिटकवली होती. त्या सामन्यात मॅकेंजीने शतक झळकावलं होतं. त्यानंतर तो प्रत्येक सामन्यापूर्वी रात्रीच छताला बॅट लटकवायचा. असं केल्याने आपली कामगिरी चांगली होईल, असं त्याला वाटायचं.

मैदानातील सफेद पट्टी डेंजर

एवढच नव्हे तर, मैदानातील सफेद पट्टीवर त्याने कधी पाय ठेवला नाही. त्याने त्याच्या संपूर्ण करिअरमध्ये मैदानातील सफेद पट्टीवर पाय ठेवला नाही. त्याचा आणखी एक अंधश्रद्धाळूपणा प्रसिद्ध झाला होता. तो प्रत्येक चेंडूनंतर लेग साइडच्या दिशेने पाहायचा. त्यानंतर स्टान्स घ्यायचा. त्याच्या या चित्रविचित्र मान्यतांमुळेच तो क्रिकेट जगतात अधिक लोकप्रिय झाला होता.

Follow Us
वरळीत पुन्हा आम्ही... ठाकरे गटातील बड्या नेत्याचा सचिन अहिरांना टोला,
Sachin ahir Worli | वरळीत पुन्हा आम्ही... ठाकरे गटातील बड्या नेत्याचा सचिन अहिरांना टोला, 'त्या' विधानाची सर्वत्र चर्चा
तिरंगा रॅलीत मुख्यमंत्री फडणवीसांनी गायले देशभक्ती गीत, पहा व्हिडीओ
Devendra Fadanvis | तिरंगा रॅलीत मुख्यमंत्री फडणवीसांनी गायले देशभक्ती गीत, पहा व्हिडीओ
मोठी बातमी! आदित्य ठाकरे तातडीने आयुक्त अश्विनी भिडेंच्या भेटीला
मोठी बातमी! आदित्य ठाकरे तातडीने आयुक्त अश्विनी भिडेंच्या भेटीला, थेट मुख्यमंत्र्यावर आरोप, 16 एकर जागा...
वळणाचा अंदाज चुकला अन् दोन ST बस आमनेसामने! रायगडमध्ये अपघात...
ST Bus | वळणाचा अंदाज चुकला अन् दोन ST बस आमनेसामने! रायगडमध्ये अपघात, सुदैवाने जीवितहानी टळली
दूध भेसळ प्रकरणी मोठी कारवाई! 15 जणांची तातडीने धरपकड, NCP...
दूध भेसळ प्रकरणी मोठी कारवाई! 15 जणांची तातडीने धरपकड, NCP नेत्याच्या कुटुंबियाचाही समावेश
राष्ट्रवादीत पुन्हा खळबळ! तटकरेंच्या विरोधात थेट निवडणूक आयोगात तक्रार
Sunil Tatkare | राष्ट्रवादीत पुन्हा खळबळ! सुनील तटकरे यांच्या विरोधात थेट निवडणूक आयोगात तक्रार; नियुक्तीवरच सवाल
ठाकरे गटातील नगरसेविकेचं तळ्यात मळ्यात? राजुल पाटील शिंदे गटाच्या...
ठाकरे गटातील नगरसेविकेचं तळ्यात मळ्यात? राजुल पाटील शिंदे गटाच्या कार्यक्रमाला, ठाकरे गटाकडून थेट...
रेवती सुळेंच्या लग्नानंतर आता दिल्ली रिसेप्शनची चर्चा
रेवती सुळेंच्या लग्नानंतर आता दिल्ली रिसेप्शनची चर्चा; बड्या नेत्यांची उपस्थिती?
छत्रीचा माईक घेऊन शाळकरी मुली बनल्या रिपोर्टर! VIDEO पाहून तुम्हीही...
Karjat | छत्रीचा माईक घेऊन शाळकरी मुली बनल्या रिपोर्टर! कर्जतच्या रस्त्यांची पोलखोल; VIDEO पाहून तुम्हीही म्हणाल…
एक माणूस रोज मंत्र्यांना शिव्या देतो, सरकार एक शब्दही बोलत नाही!
Laxaman Hake | एक माणूस रोज मंत्र्यांना शिव्या देतो, सरकार एक शब्दही बोलत नाही! लक्ष्मण हाके भडकले; OBC आरक्षणावरून सरकारलाही घेरलं