धोनीला निवृत्तीचा सल्ला देण्याचा अधिकार कुणालाही नाही : आफ्रिदी

धोनीला निवृत्तीचा सल्ला देण्याचा अधिकार कुणालाही नाही : आफ्रिदी

मुंबई : वेस्ट इंडिज आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-20 मालिकेतून वगळण्यात आल्यानंतर टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि विद्यमान विकेटकीपर महेंद्रसिंह धोनीच्या निवृत्तीबद्दल चर्चा सुरु आहे. पण धोनीला निवृत्तीचा सल्ला देण्याचा अधिकार कुणालाही नाही, अशी टिप्पणी पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने केली आहे. धोनीने भारतीय संघासाठी जे केलंय ते कुणीही करु शकत नाही आणि त्याला निवृत्तीचा सल्ला देण्याचा […]

सचिन पाटील

| Edited By:

Jul 05, 2019 | 4:58 PM

मुंबई : वेस्ट इंडिज आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-20 मालिकेतून वगळण्यात आल्यानंतर टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि विद्यमान विकेटकीपर महेंद्रसिंह धोनीच्या निवृत्तीबद्दल चर्चा सुरु आहे. पण धोनीला निवृत्तीचा सल्ला देण्याचा अधिकार कुणालाही नाही, अशी टिप्पणी पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने केली आहे.

धोनीने भारतीय संघासाठी जे केलंय ते कुणीही करु शकत नाही आणि त्याला निवृत्तीचा सल्ला देण्याचा अधिकार कुणालाही नाही. 2019 च्या विश्वचषकात यशस्वी होण्यासाठी भारताला धोनीसारख्या विकेटकीपरची गरज आहे, अशी प्रतिक्रिया शाहीद आफ्रिदीने दिली.

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली हा आपल्या आवडीचा खेळाडू असल्याचं सांगतानाच, त्याने स्वतःमध्ये काही सुधारणा घडवून आणण्याची गरज असल्याचं मतही आफ्रिदीने टाइम्स नाऊच्या मुलाखतीत बोलताना व्यक्त केलं.

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया मालिका चांगली होणार आहे. ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच देशात हरवण्यासाठी ज्या गोष्टीची गरज आहे, ती गोष्ट भारतीय संघात आहे. पण भारताच्या सर्वच खेळाडूंनी उत्कृष्ट खेळ करण्याची गरज आहे, असं आफ्रिदी म्हणाला.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी20 मालिकेसाठी भारतीय संघ

विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, केएल राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, दिनेश कार्तिक, रिषभ पंत (यष्टिरक्षक), कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, वॉशिंग्टन सुंदर, कृणाल पांड्या, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, उमेश यादव, खलील अहमद

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी संघ

विराट कोहली (कर्णधार), मुरली विजय, लोकेश राहुल, पृथ्वी शॉ, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, रोहित शर्मा, रिषभ पंत, पार्थिव पटेल, रवीचंद्रन अश्विन, रवींद्र जाडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, इशांत शर्मा, उमेश यादव, जसप्रीत बुमरा, भुवनेश्वर कुमार

ऑस्ट्रेलिया दौऱ्याचं वेळापत्रक

कसोटी मालिका

पहिला सामना – 6 डिसेंबर

दुसरा सामना – 14 डिसेंबर

तिसरा सामना – 26 डिसेंबर

चौथा सामना – 3 जानेवारी

वन डे मालिका

पहिला सामना – 12 जानेवारी

दुसरा सामना – 15 जानेवारी

तिसरा सामना – 18 जानेवारी

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें