IPL Breaking : चेन्नई विरुद्ध मुंबई सामन्यात अडथळा, वानखेडे मैदानातील लाईट गेली, आऊट झाला अन् लाईटमुळे रिव्ह्यू अडकला

IPL Breaking : चेन्नई विरुद्ध मुंबई सामन्यात अडथळा, वानखेडे मैदानातील लाईट गेली, आऊट झाला अन् लाईटमुळे रिव्ह्यू अडकला
षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर त्याने डेव्हन कॉनवेला एलबीडब्ल्यू आऊट केलं. चेंडू लेग-स्टंप चुकल्यासारखं दिसत होता. पण स्टेडियममध्ये वीजपुरवठा खंडित असल्यानं डीआरएस उपलब्ध नाही.
Image Credit source: twitter

चेन्नईनं पहिले फलंदाजी करता खराब सुरुवात केली आहे. वानखेडे मैदानावर काही तांत्रिक कारणामुळे लाईट गेल्याची माहिती आहे. यामुळे गोलंदाजाल रिव्ह्यू देखील घेता आला नाहीय.

शुभम कुलकर्णी

|

May 12, 2022 | 8:39 PM

मुंबई: आज आयपीएलच्या (IPL) पंधराव्या सीजनमध्ये चेन्नई सुपर किंग्स (CSK) विरुद्ध मुंबई इंडियन्स (MI) सामना वानखेडे स्टेडियमवर सुरू आहे. मुंबई इंडियन्सने टॉस जिंकला आहे. चेन्नईनं पहिले फलंदाजी करता खराब सुरुवात केली आहे. दरम्यान, वानखेडे मैदानावर काही तांत्रिक कारणामुळे लाईट गेल्याची माहिती आहे. यामुळे गोलंदाजाल रिव्ह्यू देखील घेता आला नाहीय. मुंबई इंडियन्सचा गोलंदाज डॅनियल सॅम्सनं त्याच्या पहिल्याच षटकात अप्रतिम गोलंदाजी केली आहे. षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर त्याने डेव्हन कॉनवेला एलबीडब्ल्यू आऊट केलं. चेंडू लेग-स्टंप चुकल्यासारखं दिसत होता. पण स्टेडियममध्ये लाईट गेल्यामुळे रिव्ह्यू घेता आला नाही. ओव्हरच्या चौथ्या चेंडूवर मोईन अली झेलबाद झालाय. त्यालाही आपलं खातं उघडता आलं नाही. पहिल्या षटकात फक्त पाच धावा काढता आल्या. आज सामन्यात जसप्रीत बुमराहनं आपला मागील सामन्यातील फॉर्म कायम ठेवल्याचं दिसतंय. त्यानं त्याच्या पहिल्याच षटकात रॉबिन उथप्पाला एलबीडब्ल्यू आऊट केलंय.

मोईनची विकेट, VIDEO पाहण्यासाठी इथे क्लिक करा

सॅम्सनंची अप्रतिम गोलंदाजी

मुंबई इंडियन्सचा गोलंदाज डॅनियल सॅम्सनं त्याच्या पहिल्याच षटकात अप्रतिम गोलंदाजी केली आहे. षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर त्याने डेव्हन कॉनवेला एलबीडब्ल्यू आऊट केलं. चेंडू लेग-स्टंप चुकल्यासारखं दिसत होता. पण स्टेडियममध्ये वीजपुरवठा खंडित असल्यानं डीआरएस उपलब्ध नाही.

कॉनवेची विकेट, VIDEO पाहण्यासाठी इथे क्लिक करा

मोईन अली झेलबाद

ओव्हरच्या चौथ्या चेंडूवर मोईन अली झेलबाद झालाय. त्यालाही आपलं खातं उघडता आलं नाही. पहिल्या षटकात फक्त पाच धावा काढता आल्या.

बुमराह फॉर्ममध्ये

आज सामन्यात जसप्रीत बुमराहनं आपला मागील सामन्यातील फॉर्म कायम ठेवल्याचं दिसतंय. त्यानं त्याच्या पहिल्याच षटकात रॉबिन उथप्पाला एलबीडब्ल्यू आऊट केलंय.

उथप्पाला एलबीडब्ल्यू आऊट, VIDEO पाहण्यासाठी इथे क्लिक करा

आज सामन्यात जसप्रीत बुमराहनं आपला मागील सामन्यातील फॉर्म कायम ठेवल्याचं दिसतंय. त्यानं त्याच्या पहिल्याच षटकात रॉबिन उथप्पाला एलबीडब्ल्यू आऊट केलंय.

हे सुद्धा वाचा


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें