Asian Cup | एशिया कपआधी पूर्ण सपोर्ट स्टाफच बदलला, हा दिग्गज टीम इंडियाचा कोच
Sports News | क्रीडा विश्वातून मोठी बातमी समोर आली आहे. टीम इंडियात कोचसह सपोर्ट स्टाफमध्ये मोठा बदल करण्यात आला आहे.

मुंबई | आगामी आशिया कप स्पर्धेची क्रिकेट चाहत्यांना उत्सुकता लागून राहिली आहे. या आशिया कप स्पर्धेचं हायब्रिड पद्धतीने आयोजन करण्यात आलं.या स्पर्धेत एकूण 13 सामने खेळवण्यात येणार आहेत. हायब्रिड मॉडेलनुसार 4 सामने हे पाकिस्तानमध्ये खेळवण्यात येणार आहेत. तर उर्वरित 9 मॅचेस या श्रीलंकेत आयोजित करण्यात आल्या आहेत. वनडे फॉर्मेटनुसार आशिया कप खेळवण्यात येणार आहे. या आशिया कपचं संपूर्ण वेळापत्रकही जाहीर करण्यात आलंय. आगामी वर्ल्ड कपच्या पार्श्वभूमीवर या आशिया कप स्पर्धेला अनन्यसाधारण महत्व आहे. आशिया कपकडे वर्ल्ड कपची रंगीत तालिम म्हणून पाहिलं जात आहे. या आशिया कप स्पर्धेच्या गडबडीदरम्यान फुटबॉल विश्वातून मोठी बातमी समोर आली आहे.
एशियन कप क्वालिफायर्समध्ये मोठा बदल करण्यात आला आहे.आखिल भारतीय फुटबॉल महासंघ अर्थात एआयएफएफने क्लिफोर्ड मिरांडा याची अंडर 23 मेन्स टीम इंडियाच्या हेड कोचपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तांत्रिक समितीने नालाप्पन मोहनराज यांच्याकडे सहाय्यक प्रशिक्षकपदाची जबाबदारी दिली आहे. तर रघुवीर खानवालकर यांना गोलकिपींग कोच म्हणून नियुर्त केलंय. तर गाविन एलियास अरायुजो फिटनेस कोच म्हणून नियुक्त करण्याची शिफारस केली आहे.
एआयएफएफने एएफसी अंडर 23 एशियन कप क्वालिफायर स्पर्धेसाठी संभावित 28 जणांची यादी जाहीर केली आहे. आय एम विजयन यांच्या अध्यक्षतेखाली व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक पार पडली. या बैठकीला बोमपाल मागर, हरजिंदर सिंह, अरुण मल्होत्रा, क्लायमेक्स लॉरेन्स आणि इतर उपस्थित होते.
मिरांडा याच्या कारकीर्दीतील सुवर्ण क्षण
मिरांडा याने मिडफ्लिडरल म्हणून 2005 ते 2014 या 9 वर्षात टीम इंडियाचं प्रतिनिधित्व केलं. टीम इंडियाने 2 वेळा सॅफ चॅम्पियनशीप आणि 2 नेहरु कप स्पर्धा आणि एएमफसी चॅलेंज कप जिंकला. तेव्हा मिरांडा या टीमचे सदस्य होते.
दरम्यान एएफसी अंडर 23 एशियन कप 2024 क्वालिफायर स्पर्धेला सप्टेंबरमध्ये आयोजन करण्यात आलं आहे. ही स्पर्धा चीनमधील डालियान इथे 6 ते 12 सप्टेंबर दरम्यान पार पडणार आहे.
