Asian Champions Trophy, IND vs JAP : भारतासमोर जपानचं आव्हान, कधी आणि कुठे पाहू शकता सामना? वाचा…

भारतीय संघ हॉकी चॅम्पियन्स ट्रॉफी(Asian Champions Trophy)मध्ये सलग दुसरं जेतेपद पटकावण्याच्या जवळ आहे. या स्पर्धेच्या उपांत्य फेरी(Semi Final)त आज (मंगळवार साडे पाच) संघाचा सामना आशियाई चॅम्पियन जपानशी होणार आहे.

Asian Champions Trophy, IND vs JAP : भारतासमोर जपानचं आव्हान, कधी आणि कुठे पाहू शकता सामना? वाचा...
भारतीय हॉकी संघ
| Edited By: | Updated on: Dec 21, 2021 | 5:41 PM

भारतीय संघ हॉकी चॅम्पियन्स ट्रॉफी(Asian Champions Trophy)मध्ये सलग दुसरं जेतेपद पटकावण्याच्या जवळ आहे. या स्पर्धेच्या उपांत्य फेरी(Semi Final)त आज (मंगळवार साडे पाच) संघाचा सामना आशियाई चॅम्पियन जपानशी होणार आहे. पाच देशांच्या स्पर्धेच्या राऊंड-रॉबिन टप्प्याच्या शेवटी, भारतानं 10 गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावलं आणि उपांत्य फेरीत प्रवेश केला. त्यापाठोपाठ कोरिया (South Korea) (सहा) दुसऱ्या क्रमांकावर, जपान (Japan) (पाच) तिसऱ्या स्थानावर आणि पाकिस्तान (Pakistan) (दोन) चौथ्या स्थानावर आहे. या चारही संघांनी उपांत्य फेरीत धडक मारलीय.

दक्षिण कोरियानं साधली बरोबरी
टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकल्यानंतर पहिली स्पर्धा खेळणाऱ्या दक्षिण कोरियानं 2-2 अशी बरोबरी साधली. यानंतर भारतानं बांगलादेशचा 9-0 आणि पाकिस्तानचा 3-1 असा पराभव केला. त्यानंतर जपानचा पराभव केला. साखळी फेरीतील शेवटच्या सामन्यात जपानचा 6-0 असा धुव्वा उडवल्यानंतर पुन्हा एकदा त्याचा सामना होणार आहे. संघानं रॉबिन फेरीत एकही सामना गमावलेला नाही आणि तो याच आत्मविश्वासानं उतरेल.

भारतानं जपानचा केला पराभव
भारतीय संघानं आशियाई क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता संघ जपानचा सर्व विभागांमध्ये पराभव केला. 6-0 अशा फरकाने भारतानं सामना खिशात घातला. मौलाना भासानी हॉकी स्टेडियमवर हरमनप्रीत सिंग (10वा आणि 53वा मिनिट) यानं दोन गोल केले तर दिलप्रीत सिंग (23वा), जर्मनप्रीत सिंग (34वा), सुमित (46वा) आणि शमशेर सिंग (54वा) यांनीही स्कोअरशीटमध्ये आपलं नाव नोंदवले. दुसऱ्या उपांत्य

फेरीत पाकिस्तान आणि कोरिया आमनेसामने होतील.
भारत आणि जपान यांच्यातील हॉकी चॅम्पियन्स ट्रॉफी सामना कोठे खेळवला जाईल?
भारत आणि जपान यांच्यातील हॉकी चॅम्पियन्स ट्रॉफीचा सामना बांगलादेशची राजधानी ढाका येथे होणार आहे.
भारत आणि जपान यांच्यातील हॉकी चॅम्पियन्स ट्रॉफी सामना कधी होणार?
भारत आणि जपान यांच्यातील हॉकी चॅम्पियन्स ट्रॉफीचा सामना मंगळवार, 21 डिसेंबर (5.30)रोजी होणार आहे.
भारत आणि जपान यांच्यातील हॉकी चॅम्पियन्स ट्रॉफी सामना कधी सुरू होईल?
भारत आणि जपान यांच्यातील हॉकी चॅम्पियन्स ट्रॉफीचा सामना साडेपाच वाजता सुरू होईल?
भारत आणि जपान यांच्यातील हॉकी चॅम्पियन्स ट्रॉफी सामना कुठे पाहू शकणार?
भारत आणि जपान यांच्यातील हॉकी चॅम्पियन्स ट्रॉफी सामन्याचे स्टार स्पोर्ट्स 1 आणि स्टार स्पोर्ट्स सिलेक्टवर थेट प्रक्षेपण केले जाईल.
भारत आणि जपान यांच्यातील हॉकी चॅम्पियन्स ट्रॉफी सामन्याचे थेट प्रक्षेपण कोठे होईल?
भारत आणि जपान यांच्यातील हॉकी चॅम्पियन्स ट्रॉफी सामना Hotstarवर लाइव्ह स्ट्रिमिंग होणार आहे.

Ravichandran Ashwin : ‘कुलदीप यादवच्या स्तुतीनं भारावलो, पण मला एकटं पडल्यासारखं वाटत होतं’

Kidambi Srikanth BWF : श्रीकांतनं BWF वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये रौप्य पदक जिंकल्यानंतर गोपीचंद यांची प्रतिक्रिया, म्हणाले…

Gashimov Memorial Chess : विश्वनाथन आनंदनं शाखरियार मामेदयारोवचा पराभव करत साजरा केला स्पर्धेतला पहिला विजय