Asian Games 2023 | एशियन गेम्ससाठी भारताच्या 634 खेळाडूंची निवड, कुणा कुणाला संधी?

Indian Squad For Asia Games 2023 | एशियन गेम्सचं आयोजन हे 23 सप्टेंबर ते 8 ऑक्टोबर दरम्यान चीनमध्ये करण्यात आलं आहे.

Asian Games 2023 | एशियन गेम्ससाठी भारताच्या 634 खेळाडूंची निवड, कुणा कुणाला संधी?
| Updated on: Aug 25, 2023 | 11:23 PM

मुंबई | एशियन गेम्स स्पर्धेला 23 सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. या बहुप्रतिक्षित एशियन गेम्स स्पर्धेसाठी क्रीडा मंत्रालयाने भारतीय संघाची घोषणा केली आहे. भारतीय संघाच एकूण 634 खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. भारताचे हे एकूण 634 खेळाडू विविध 38 क्रीडा प्रकारात सहभागी होणार आहेत. यंदा एशियन गेम्स स्पर्धेचं आयोजन हे चीनमध्ये करणयात आलं आहे. एशियन गेम्सचा थरार हा 23 सप्टेंबर ते 8 ऑक्टोबर दरम्यान रंगणार आहे. याआधी 2018 मध्ये जकार्ता इथे एशियन गेम्सचं आयोजन केलं गेलं होतं. तेव्हा भारतीय क्रिकेट संघात 572 खेळाडू होते.

एशियन गेम्स 2023 स्पर्धेत ट्रॅक एन्ड फील्ड इवेंट्समध्ये सर्वाधिक खेळाडू सहभागी होणार आहेत. ट्रॅक एन्ड फील्ड इवेंट्समध्ये तब्बल 65 खेळाडू आहेत, यात 31 महिला अ‍ॅथलेटि्सचा समावेश आहे. तसेच वूमन्स फुटबॉल टीममध्ये 22 खेळाडूंचा समावेश आहे. सोबतच मेन्स टीम इंडिया फुटबॉल टीममध्येही 22 खेळाडू आहेत. थोडक्यात काय तर मेन्स आणि वूमन्स असे मिळून फुटबॉलसाठी एकूण 44 खेळाडू आहेत. तसेच हॉकी टीम इंडियात 36 खेळाडूंचा समावेश आहेत. इथेही मेन्स 18 आणि वूमेन्स 18 खेळाडू आहेत.

एशियन गेम्समध्ये कुस्तीपटू बजरंग पूनिया, चेस प्लेअर आर प्रज्ञानानंद या आणि यासारख्या अनेक खेळाडूंवर लक्ष असणा आहे. त्यामुळे भारतीय खेळाडू एशियन गेम्समध्ये कशी कामगिरी करतात, याकडे भारतीयाचं लक्ष असणार आहे.

एशिनय गेम्ससाठी भारतीय संघ

दरम्यान बीसीसीआयने काही दिवसांआधीच 14 जुलै रोजी एशियन गेम्ससाठी मेन्स आणि वूमन्स अशा प्रत्येकी 15-15 सदस्यीय भारतीय क्रिकेट संघाची घोषणा केली होती. त्यानुसार ऋतुराज गायकवाड हा मेन्स टीम इंडियाचं कर्णधारपद सांभाळणार आहे. तसेच क्रिकेट टीममध्ये अनेक युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे.

टीम इंडिया | ऋतुराज गायकवाड (कॅप्टन), यशस्वी जयस्वाल, राहुल त्रिपाठी, तिलक वर्मा, रिंकू सिंग, जितेश शर्मा (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, शाहबाज अहमद, रवी बिश्नोई, आवेश खान, अर्शदीप सिंग, मुकेश कुमार, शिवम मावी, शिवम दुबे आणि प्रभसिमरन सिंग (विकेटकीपर)

राखीव खेळाडू | यश ठाकूर, साई किशोर, व्यंकटेश अय्यर, दीपक हुडा आणि साई सुदर्शन.

19 व्या एशियन गेम्ससाठी वूमन्स टीम इंडिया

हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मंधाना, शेफाली वर्मा, जेमिमा रॉड्रिग्स, दीप्ती शर्मा, ऋचा घोष (विकेटकीपर), अमनजोत कौर, देविका वैद्य, अंजली सरवानी, तीतस साधू, राजेश्वरी गायकवाड, मिनू मणी, कनिका आहुजा, उमा छेत्री आणि अनिल छेत्री .

राखीव खेळाडू | हरलीन देओल, काशवी गौतम, स्नेह राणा, सायका इशाक आणि पूजा वस्त्राकर.