AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Asian Games 2023 | एशियन गेम्ससाठी Team India ची घोषणा, ‘हा’ खेळाडू कॅप्टन

Team India squad for 19th Asian Games | बीसीसीआयने एशियन गेम्स स्पर्धेसाठी टीम इंडियाचा संघ जाहीर केला आहे. या स्पर्धेत रोहित शर्मा नाही, तर युवा खेळाडू कर्णधारपद सांभाळणार आहे.

Asian Games 2023 | एशियन गेम्ससाठी Team India ची घोषणा, 'हा' खेळाडू कॅप्टन
यंदाच्या एकदवसीय वर्ल्ड कप 2023 ला काही महिने आता शिल्लक आहेत. त्याआधी आशिया कप होणार असल्याने टीम इंडियासाठी मोठी संधी आहे. मात्र त्याआधी एक मोठी बातमी समोर आली आहे. भारताचे महत्त्वाचे खेळाडू परत एकदा संघात परतण्यासाठी सज्ज झाले आहेत.
| Updated on: Jul 15, 2023 | 2:27 AM
Share

मुंबई | बीसीसीआय अर्थात भारतीय क्रिकेट नियमाक मंडळाने 19 व्या एशियन गेम्स स्पर्धेसाठी टीम इंडियाची घोषणा केली आहे. बीसीसीआयने 15 सदस्यीय मुख्य संघ जाहीर केला आहे. तर चौघांना राखीव खेळाडू म्हणून संधी देण्यात आली आहे. बीसीसीआयने शुक्रवारी 14 जुलै रोजी रात्री उशिरा ट्विट करत याबाबतची माहिती दिली. या स्पर्धेसाठी आधी शिखर धवन याचं नावं आघाडीवर होतं. मात्र या स्पर्धेतच शिखर धवन याला संधी देण्यात आलेली नाही. टीम इंडियाचा युवा सलामीवीर पुणेकर ऋतुराज गायकवाड याच्याकडे कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. सोबतच बीसीसीआयने आयपीएलमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना संधी दिली आहे. यामध्ये रिंकू सिंह याच्यासह अन्य खेळाडूंचा समावेश आहे.ही स्पर्धा टी 20 फॉर्मेटनुसार खेळवण्यात येणार आहे.

युवा खेळाडूंना संधी

वनडे वर्ल्ड कप स्पर्धेचं आयोजन यंदा भारतात करण्यात आलंय. वनडे वर्ल्ड कप 2023 ला 5 ऑक्टोबरपासून सुरुवात होतेय. तर एशियन गेम्सचा 28 सप्टेंबरपासून श्रीगणेशा होतोय. त्यामुळे एशियन गेम्स स्पर्धेत बी टीम इंडिया सहभागी होणार आहे. या युवा टीम इंडियात रिंकू सिंह, राहुल त्रिपाठी, तिलक वर्मा आणि यशस्वी जयस्वाल यांचा समावेश आहे.

कुणाकडे कोणती जबाबदारी?

अर्शदीप सिंह, शिवम मावी, आवेश खान आणि मुकेश कुमार या चौघांकडे वेगवान गोलंदाजीची जबाबदारी असणार आहे. तर फिरकी गोलंदाजीची धुरा ही रवी बिश्नोई आणि शहबाज अहमद याच्यांकडे असेल. तसेच संघात ऑलराउंडर म्हणून वॉशिंग्टन सुंदर याला संधी दिली गेली आहे.

एशियन गेम्स स्पर्धेत क्रिकेट सामन्यांचं आयोजन हे 28 सप्टेंबर ते 8 ऑक्टोबर दरम्यान करण्यात आलंय. या स्पर्धेचं आयोजन हे चीनमध्ये करण्यात आलंय. एशियन स्पर्धेचं चीनमध्ये आयोजन करण्याची ही तिसरी वेळ आहे. तसेच या स्पर्धेत क्रिकेटचा समावेश करण्याची ही तिसरी वेळ आहे. एशियन गेम्समध्ये याआधी 2014 आणि 2010 मध्ये क्रिकेट खेळाला स्थान देण्यात आलं होतं.

19 व्या एशियन गेम्ससाठी टीम इंडियाची घोषणा

टीम इंडिया | ऋतुराज गायकवाड (कॅप्टन), यशस्वी जयस्वाल, राहुल त्रिपाठी, तिलक वर्मा, रिंकू सिंग, जितेश शर्मा (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, शाहबाज अहमद, रवी बिश्नोई, आवेश खान, अर्शदीप सिंग, मुकेश कुमार, शिवम मावी, शिवम दुबे आणि प्रभसिमरन सिंग (विकेटकीपर)

राखीव खेळाडू | यश ठाकूर, साई किशोर, व्यंकटेश अय्यर, दीपक हुडा आणि साई सुदर्शन.

कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा
कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा.
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर.
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान.
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा.
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक.
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:.
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज.
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.