BWF World Championship final: भारतीयांच्या नजरा लागलेल्या सामन्यात, अखेर किदांबी श्रीकांतला रौप्यपदक

प्रकाश पदुकोण (1983), बी साई प्रणीथ (2019) आणि लक्ष्य सेन (2021) यांच्यानंतर प्रतिष्ठेच्या बॅडमिंटन स्पर्धेत पदकविजेती कामगिरी करणारा श्रीकांत तिसरा भारतीय बॅडमिंटनपटू आहे.

BWF World Championship final: भारतीयांच्या नजरा लागलेल्या सामन्यात, अखेर किदांबी श्रीकांतला रौप्यपदक
| Edited By: | Updated on: Dec 20, 2021 | 10:23 AM

ह्यलवा: भारताचा अव्वल बॅडमिंटनपटू किदांबी श्रीकांतला काल BWF जागतिक अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत पराभवाचा सामना करावा लागला. BWF जागतिक अजिंक्यपद स्पर्धेची अंतिम फेरी गाठून श्रीकांतने इतिहास रचला. पण सुवर्णपदकाचं भारताच स्वप्न साकार होऊ शकलं नाही. श्रीकांतला रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं. स्पेनच्या ह्यूलवा येथे झालेल्या स्पर्धेत सिंगापूरच्या 24 वर्षीय लोह कीन येवने श्रीकांतला पराभूत केलं. जागतिक क्रमवारीत श्रीकांतकडे 15 वे मानांकन असून लोह कीन येव 22 व्या स्थानी आहे.

लोह कीन येवने 21-15, 22-20 असा सरळ सेटमध्ये श्रीकांतचा पराभव केला. लोह कीन येव विरोधात श्रीकांतचा हा पहिला पराभव आहे. श्रीकांत पराभूत झाला असला, तरी जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत रौप्य पदक जिंकणारा श्रीकांत पहिला भारतीय बॅडमिंटनपटू ठरला आहे. या अंतिम फेरीआधी कॉमनवेल्थ गेम्स 2018 मध्ये श्रीकांतचा लोह कीन येव विरोधात सामना झाल होता. त्यावेळी श्रीकांतने येवला सरळ सेटमध्ये पराभूत केले होते.

प्रकाश पदुकोण (1983), बी साई प्रणीथ (2019) आणि लक्ष्य सेन (2021) यांच्यानंतर प्रतिष्ठेच्या बॅडमिंटन स्पर्धेत पदकविजेती कामगिरी करणारा श्रीकांत तिसरा भारतीय बॅडमिंटनपटू आहे. BWF स्पर्धेच्या उपांत्यफेरीत प्रथमच दोन भारतीय बॅडमिंटनपटू आमने-सामने आले होते. श्रीकांत आणि लक्ष्यमध्ये शनिवारी सामना झाला होता. या मध्ये श्रीकांतने 17-21, 21-14, 21-17 असा लक्ष्यभेद केला होता.

BWF स्पर्धेची अंतिम फेरी गाठवणारा श्रीकांत पहिला बॅडमिंटनपटू आहे. बॅडमिंटनमध्ये पुरुष एकेरीत पहिल्या स्थानी राहिलेल्या श्रीकांतने 2017 साली सुपरसीरिजची चार विजेतेपद पटकावली होती. त्यानंतर श्रीकांतचा पदकासाठी संघर्ष सुरु होता. अखेर चार वर्षांनी जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत श्रीकांतने थेट रौप्यपदकाला गवसणी घातली.

संबंधित बातम्या:
Election: ताई पहिल्या 4 मंत्र्यांमध्ये होत्या, दादा 32 व्या नंबरचे मंत्री! पंकजा मुंडेंचा धनंजय मुंडेंना टोमणा
Nashik| महापालिका निवडणुका लांबणार, अजित पवारांचे संकेत; ओबीसी जनगणना झाल्यावरच रणधुमाळी
शाह म्हणाले, राजीनामा देऊन मैदानात या, आता राऊतांचं जशास तसं उत्तर, शिवसेनेशिवाय भाजपचे 105 अशक्य?