
क्रीडा विश्वातून मोठी बातमी समोर आली आहे. स्पेनचा टेनिसपटू कार्लोस अल्काराजने इतिहास घडवला आहे. वर्ल्ड रँकिंगमध्ये दुसऱ्या स्थानी असणाऱ्या अल्काराजने फ्रेंच ओपन 2025 मध्ये पुरुष एकेरीचे विजेतेपद पटकावलं आहे. अल्काराजने रविवारी 8 जून रोजी झालेल्या महामुकाबल्यात नंबर 1 असणाऱ्या यानिक सिनर याचा धुव्वा उडवला. अल्काराजने सिनरवर 4-6, 6-7 (4), 6-4, 7-6 (3), 7-6 (2) अशा फरकाने मात केली. अल्काराजची ही फ्रेंच ओपन स्पर्धेत मेन्स सिंगलचं विजेतेपद पटकावण्याची सलग दुसरी वेळ ठरली. तर दुसऱ्या बाजूला पराभवामुळे इटलीच्या सिनरचं फ्रेंच ओपन जिंकण्याचं स्वप्न भंग झालं. सिनरची फ्रेंच ओपनमध्ये पोहचण्याची ही पहिलीच वेळ होती.
कार्लोस अल्काराज आणि यानिक सिनर यांच्यात फ्रेंच ओपनचा किताब जिंकण्यासाठी जोरदार चुरस पाहायला मिळाली. या दोघांमध्ये रंगलेला हा महाअंतिम सामना स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक वेळ चाललेला सामना ठरला. या महाअंतिम सामन्याचा थरार तब्बल 5 तास 29 मिनिटं रंगला. त्यानंतर विजेता निश्चित झाला. 5 तासांपेक्षा अधिक वेळ सुरु असलेल्या या सामन्यामुळे नक्की कोण जिंकणार? याची उत्सुकता चाहत्यांना होती. अंतिम सामन्यात कोण बाजी मारणार? याकडे चाहत्यांच्या नजरा लागून होत्या. मात्र कार्लोसनेच बाजी मारली.
कार्लोस अल्काराज याची विम्बल्डन ग्रँड स्लॅम स्पर्धेचं विजेतेपद पटकावण्याची दुसरी वेळ ठरली. कार्लोसने याआधी 2024 साली अशीच कामगिरी केली होती. कार्लोसने 2024 आणि 2025 मध्ये सलग 2 वेळा फ्रेंच ओपन तर 2022 साली यूएस ओपन या प्रतिष्ठेच्या आणि मानाच्या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं.
यानिक सिनर याने पहिल्या सेटमध्ये बाजी मारली. यानिकने पहिला सेट 6-4 अशा फरकाने आपल्या नावावर केला. सिनरकडून या दरम्यान काही चुका झाल्या. त्यामुळे अल्काराज याने आघाडी घेतली होतली. मात्र सिनरने कमबॅक करत पहिला सेट जिंकण्यात यश मिळवलं.
दुसरा सेटही यानिक सिनरनेच जिंकला. दुसऱ्या सेटचा निकाल हा टायब्रेकरद्वारे लागला. सिनरने 7-4 अशा फरकाने हा सेट जिंकला. मात्र त्यानंतर तिसऱ्या सेटमध्ये अल्काराज याने कमाल केली. अल्काराजने कमबॅक केलं आणि तिसरा सेट जिंकला. अल्काराजने तिसऱ्या सेटमध्ये 6-4 अशा फरकाने सिनरवर मात केली. अल्काराने त्यानंतर आघाडी कायम राखली.
अल्काराज याने चौथ्या सेटमध्येही कमाल केली. सिनरला विजयासाठी फक्त एका सेटची गरज होती. तर दुसऱ्या बाजूला अल्कारजने चौथा सेट 7-6 अशा फरकाने जिंकला. त्यानंतर पाचव्या सेटमध्ये सामन्याचा निकाल स्पष्ट झाला.
अल्काराज आणि सिनर यांच्यात पाचव्या सेटमध्येही जोरदार रस्सीखेच पाहायला मिळाली. दोघांमध्येही चढाओढ पाहायला मिळत होती. पाचव्या सेटमध्ये दोघेही 6-6 ने बरोबरीत होते. त्यामुळे या सेटचा निकाल टायब्रेकरद्वारे लागला. अल्काराजने या टायब्रेकरमध्ये बाजी मारली. अल्काराजने हा सेट एकतर्फी फरकाने आपल्या नावावर केला. अल्काराजने 10-2 च्या फरकाने हा सेट आपल्या नावावर केला.