कोल्हापूरच्या पाटलांच्या पोराची युरोपियन लीगसाठी वयाच्या 18 व्या वर्षी निवड, महाराष्ट्रातील पहिला खेळाडू ठरला!

Darshan Patil Selection SV Gmunden Club : कष्ट प्रामाणिक असतील यशालाही पर्याय राहत नाही. जिद्द मेहनत आणि चिकाटी काय असत हे कोल्हापूरमधील दर्शन पाटील याने दाखवून दिली आहे. महाराष्ट्राच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

कोल्हापूरच्या पाटलांच्या पोराची युरोपियन लीगसाठी वयाच्या 18 व्या वर्षी निवड, महाराष्ट्रातील पहिला खेळाडू ठरला!
Darshan Patil select SV Gmunden Club
Follow us
| Updated on: Feb 23, 2024 | 5:27 PM

मुंबई : आपल्या देशात सर्वत्र क्रिकेटचे फॅन्स आहेत. क्रिकेट खेळाचं फॅड मोठ्या प्रमाणात असलेलं पाहायला मिळतं. मात्र कोल्हापूरमधील एका सुपुत्राने वेगळ्या खेळात गगनभरारी घेत महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. करवीर तालुक्यातील दर्शन पाटील याची ऑस्ट्रियामधील SV Gmunden या फुटबॉल क्लबमध्ये निवड झाली आहे. त्यामुळे येत्या युरोपियन लीगमध्ये महाराष्ट्राकडून खेळणारा तो पहिला फुटबॉलपटू ठरणार आहे. दर्शन याच्यासह नेदरलँडमधील वर्मन याचीसुद्धा या क्लबकडून खेळण्यासाठी निवड झाली आहे.

देवकर पानंद इथे राहणाऱ्या दर्शन याने आपल्या मामाकडून (बिपीन देवणे) फुटबॉलची प्रेरणा घेतली. पाचवीमध्ये त्याने कोल्हापूरमधील महाराष्ट्र हायस्कूल येथे प्रवेश घेतला. कारण या शाळेमध्ये फुटबॉलची क्रेज आहे. त्यानंतर दर्शन याने पाचवीपासून फुटलबॉलचा सराव करायला सुरूवात केली. दोन्ही वर्षे शाळेकडून खेळला, चांगल्या प्रदर्शनानंतर तो आठवीत असताना १४ वर्षाखालील दिल्लीमध्ये झालेल्या नॅशनल स्पर्धेत खेळला. दुसरं नॅशनल हे रिलायन्स तर भोपाळमध्ये झालेल्या १९ वर्षाखालील नॅशनल स्पर्धेत तो खेळला. वडिलांनी फुटबॉलमध्ये इतका स्कोप नाही. त्यामुळे घरच्यांनी त्याला फुटबॉलसोबत अभ्यासाकडे लक्ष देण्यास सांगितलं होतं.

…अन् दर्शनचं नशीब पालटलं

दर्शन पाटीलला त्याचे कॉलेजचे कोच प्रदीप सोळोखे आणि धीरज मिश्रा यांचा फोन आला. त्यांनीच महाराष्ट्रात अशी ट्रायलमध्ये होणार असल्याची माहिती दिली. डिसेंबर महिन्यात पुण्यातील बालेवाडी येथे ही ट्रायल झाली होती. या ट्रायलसाठी महाराष्ट्रभरातून पन्नासपेक्षा जास्त खेळाडू आले होते. त्यातील पाच मुलांची निवड झाली होती आणि या पाचमधून दर्शनला सिलेक्ट करण्यात आलं.

दर्शन काय म्हणाला?

ट्रायल झाल्यावर माझा नाव पत्ता घेतला त्यावेळी मला काही माहित नव्हतं की माझी निवड झाली आहे की नाही?. आमच्या दोन्ही कोचने मला तुझी निवड झाल्याचं सांगितलं होतं. मी ट्रायल झाल्यापासून कधी फोन येतो याची वाट पाहत होतो. मी मोठ्या उत्साहात माझ पासपोर्टही काढलं पण जवळपास दीड महिना झाला पण फोन काही आला नाही. मला तर वाटलं फेक आहे, अचानक मला परवा कोच आणि कौशिक सरांचा फोन आला त्यांनी मला मुंबईत यायला सांगितलं. आज मला वानखेडे स्टेडियममध्ये आल्यावर जर्सी देण्यात आली, असं दर्शन पाटील याने सांगितलं.

दरम्यान, या कार्यक्रमाला कर्नाटक स्पोर्टिंग क्लबचे अध्यक्ष डॉ.पी.व्ही. शेट्टी, SV Gmunden या फुटबॉल क्लबचे अध्यक्ष गेर्हाल्ड रिडल, दक्षिण-पूर्व आशिया आणि भारत RIESPO वरिष्ठ सल्लागार कौशिक मौलिक आणि PRO10 चे संचालक राजेश मालदे उपस्थित होते.

Non Stop LIVE Update
खैरेंच्या 'त्या' वक्तव्यावरून शिरसाटांचा निशाणा तर दानवेंचा पलटवार काय
खैरेंच्या 'त्या' वक्तव्यावरून शिरसाटांचा निशाणा तर दानवेंचा पलटवार काय.
लोकसभेचं तिकीट मिळताच रवींद्र वायकरांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
लोकसभेचं तिकीट मिळताच रवींद्र वायकरांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले....
सुप्रिया सुळेंचा 'हा' लकी नंबर, प्रत्येक भाषणातून होतोय वारंवार उल्लेख
सुप्रिया सुळेंचा 'हा' लकी नंबर, प्रत्येक भाषणातून होतोय वारंवार उल्लेख.
हे मटण खाणारे ब्राम्हण, देवेंद्र फडणवीसांवर कुणाचा निशाणा?
हे मटण खाणारे ब्राम्हण, देवेंद्र फडणवीसांवर कुणाचा निशाणा?.
भुताटकी, आत्मा, ढोंग आणि बरंच काही..., राऊतांचा मोदींवर हल्लाबोल काय?
भुताटकी, आत्मा, ढोंग आणि बरंच काही..., राऊतांचा मोदींवर हल्लाबोल काय?.
कॉलर उडवताना सकाळ की संध्याकाळ पहावं..., शरद पवारांचा उदयनराजेंना टोला
कॉलर उडवताना सकाळ की संध्याकाळ पहावं..., शरद पवारांचा उदयनराजेंना टोला.
ते टरबूज उन्हाळ्यात तरी कामी येतं, पण हे ..., ठाकरेंची फडणवीसांवर टीका
ते टरबूज उन्हाळ्यात तरी कामी येतं, पण हे ..., ठाकरेंची फडणवीसांवर टीका.
बारामतीनंतर शिरूरमध्ये तुतारीचा संभ्रम होणार? आयोगान कुणाला दिल चिन्ह?
बारामतीनंतर शिरूरमध्ये तुतारीचा संभ्रम होणार? आयोगान कुणाला दिल चिन्ह?.
खैरेंनी मुस्लिमांना सांगितल, 5 वेळा नमाज पडा; शिरसाटांनी व्हिडीओ लावला
खैरेंनी मुस्लिमांना सांगितल, 5 वेळा नमाज पडा; शिरसाटांनी व्हिडीओ लावला.
महाराष्ट्रातील नरेंद्र मोदींच्या सभांच्या झंझावातावर विरोधकांचा निशाणा
महाराष्ट्रातील नरेंद्र मोदींच्या सभांच्या झंझावातावर विरोधकांचा निशाणा.