Video : ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या खेळाडूवृत्तीची चर्चा! रेफरीकडून पेनल्टी मिळाली होती, पण…
ख्रिस्तियानो रोनाल्डो हे फुटबॉल विश्वातील सर्वात मोठं नाव..फुटबॉल म्हंटलं की रोनाल्डोचं नाव समोर येतं आहे. हा फुटबॉलपटू नुसता खेळामुळेच नाही, तर खेळभावनेमुळेही चर्चेत आहे. असाच एक प्रसंग एका फुटबॉल सामन्यादरम्यान घडला. रोनाल्डोने पुढे येत खेळाडूवृत्ती दाखवली आणि सर्वांची मनं जिंकली.
मुंबई : आशियाई चॅम्पियन्स लीग स्पर्धेत अल नासर आणि पर्सेपोलिस क्लब यांच्यात सामना पार पडला. या सामन्यात सर्वांच्या नजरा अल नासर संघाचा स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियाने रोनाल्डो याच्याकडे खिळल्या होत्या. ख्रिस्तियानो रोनाल्डोला काही संधी चालून आल्या पण त्याचं रुपांतर गोलमध्ये करू शकला नाही. त्यामुळे हा सामना गोलरहित ड्रॉ झाला. असं असलं तरी ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या एका कृतीने क्रीडारसिकांची मनं जिंकली आहे. रोनाल्डोनो स्वत:ला मिळालेल्या पेनल्टीला नकार दिला. झालं असं की, सामना सुरु झाल्यानंतर रोनाल्डो फुटबॉल गोलमध्ये पोस्टपर्यंत नेण्यासाठी धडपड करत होता. तेव्हा प्रतिस्परधी खेळाडूंने त्याला अडवण्यासाठी पुढे धाव घेतली. तेव्हा रोनाल्डो पडला. रेफरीने तात्काल पेनल्टी दिली, तेव्हा पर्सेपोलिस संघाचे खेळाडू रेफरीला पेनल्टी नसल्याचं सांगत होते. तेव्हाच रोनाल्डो किती मोठ्या मनाचा आहे याचं प्रदर्शन मैदानात झालं. त्याने लगेचच रेफरीकडे धाव घेत पेनल्टी नसल्याचं सांगितलं. रेफरी मा निंग याने मैदानाजवळील मॉनिटरवर तपासलं आणि पेनल्टीचा निर्णय मागे घेतला.
अल नासर संघाचा स्ट्राइकर ख्रिस्तियानो रोनाल्डोने रेफरीला फाउल नसल्याचं सांगितलं. यापूर्वी अल नासरला 17 व्या मिनिटाला एक धक्का लागला होता. अली लजामी याला रेफरीने रेड कार्ड दाखवलं होतं. त्यामुळे मैदानात 10 खेळाडूंसह संघ खेळ होता. असं असूनही प्रतिस्पर्धी संघाला अल नासरचा चक्रव्यूह भेदण्यात अपयश आलं. यामुळे सामना गोलरहित स्टेजवरच संपुष्टात आला. दुसऱ्या डावात रोनाल्डोच्या गळ्याला दुखापत झाली. त्रास होत असल्याने 77 व्या मिनिटाला रोनाल्डो मैदानाचा बाहेर पडला.
Cristiano Ronaldo waved off his own penalty against Persepolis, telling the referee himself he didn't believe it was a foul. 👀
Not something you see every day in football. 👏 pic.twitter.com/do8L58tFYJ
— CBS Sports Golazo ⚽️ (@CBSSportsGolazo) November 27, 2023
पर्सेपोलिस विरुद्धचा सामना ड्रॉ झाल्यानंतरही रोनाल्डोच्या अल नासर संघाने आशियाई चॅम्पियन्स लीगच्या बाद फेरीत प्रवेश केला आहे. अल नासरचा सामना शुक्रवारी सामना सौदी प्रो लीगच्या प्रतिस्पर्धी असलेल्या अल हिलाल या संघाशी होणार आहे.