FIFA World Cup 2026: फुटबॉल वर्ल्डकप स्पर्धेच्या एका तिकीटाची किंमत माहिती आहे का? बसेल धक्का!

फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेला 12 जूनपासून सुरूवात होणार आहे. ही स्पर्धा अमेरिका, मॅक्सिको आणि कॅनडात होत आहे. त्यामुळे उत्साह शिगेला पोहोचलेला आहे. पण या स्पर्धेत तिकीटाची किंमत ऐकून तुम्हाला धक्का बसल्याशिवाय राहणार नाही.

FIFA World Cup 2026: फुटबॉल वर्ल्डकप स्पर्धेच्या एका तिकीटाची किंमत माहिती आहे का? बसेल धक्का!
FIFA World Cup 2026: फुटबॉल वर्ल्डकप स्पर्धेच्या एका तिकीटाची किंमत माहिती आहे का? बसेल धक्का!
Image Credit source: Getty Images
| Updated on: Jun 10, 2026 | 3:24 PM

फिफा वर्ल्डकप स्पर्धेची चार वर्षांची प्रतीक्षा अवघ्या काही तासात संपणार आहे. 2022 नंतर चार वर्षांनी फुटबॉल वर्ल्डकप स्पर्धेची अनुभूती घेण्यासाठी क्रीडाप्रेमी सज्ज झाले आहेत. यंदा स्पर्धेचं यजमानपद अमेरिका, कॅनडा आणि मॅक्सिकोकडे आहे. या स्पर्धेत पहिल्यांदाच 48 संघ सहभागी होणार आहेत. यंदा 104 सामने होणार आहेत. त्यामुळे या स्पर्धेतून मोठी कमाई होण्याचा अंदाज आहे. पण या स्पर्धेच्या प्रत्येक सामन्याच्या तिकीटाची किंमत ऐकून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. जर तुम्हालाही असं वाटत असेल की मैदानात जाऊन प्रत्यक्ष सामना पाहावा. तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. कारण तिकिटाचे दर पाहून कदाचित तुम्हाला हात आखुडता घ्यावा लागेल. फुटबॉल वर्ल्डकप स्पर्धेतील सर्वात कमी दराचं तिकीट हे जवळपास 10 हजार रुपयाने सुरू होतं. तर अंतिम सामन्यासाठी 6 लाखाहून अधिक रुपये खर्च करावे लागतील.

भारतीय वेळनुसार 12 जूनच्या मध्यरात्री फुटबॉल वर्ल्डकप स्पर्धेला सुरूवात होणार आहे. 20 जुलैपर्यंत ही स्पर्धा असणार आहे. यंदाच्या स्पर्धेत संघांची संख्या 32 वरून 48 वर पोहोचली आहे. त्यामुळे प्रेक्षकांना यंदा अतिरिक्त सामन्यांची मेजवानी मिळणार आहे. पण अमेरिकेत फुटबॉल स्पर्धेची लोकप्रियता तुलनेनं कमी आहे. त्यामुळे या स्पर्धा उत्साह भरण्यासाठी वेगवेगळे प्रयोग केले जात आहेत. असं असताना तिकीटाच्या दरावरून आता चर्चा सुरू झाली आहे. रिपोर्टनुसार, स्पर्धेच्या उद्घाटन सामन्याची तिकिटांचे दर इतर साखळी फेरीच्या सामन्यांपेक्षा अधिक आहेत.

पहिल्या सामन्यासाठी श्रेणी 1 च्या तिकिटांची किंमत जवळपास 2.20 लाख रूपये आहे. तर सर्वात स्वस्त असलेल्या श्रेणी 4 ची तिकीत दर हा जवळपास 54 हजार रुपये आहे. तर इतर साखळी सामन्यांसाठी श्रेणी 1 साठी तिकिटाचे दर जवळपास 54 हजार रूपये, तर श्रेणी 4 साठी तिकिटाचे दर जवळपास 10 हजार रुपये आहे. या तिकीट दरात बदल होऊ शकतो. कारण या तिकिटांची मागणी जास्त असल्याने ती अधिक महाग विकली जाण्याची शक्यता आहे.

अंतिम फेरीच्या तिकिटाची किंमत

अंतिम सामन्यात कोण पोहोचणार? हे आता स्पर्धा सुरू झाल्यानंतर शेवटच्या टप्प्यात कळेल. पण स्पर्धक ठरण्यापूर्वीच अंतिम सामन्याच्या तिकीटाचे दर गगनाला भिडले आहे. सर्वोच्च श्रेणीसाठी अंदाजे 6 लाख रुपयांपेक्षा अधिक रक्कम मोजावी लागू शकते. तर श्रेणी 1 साठी तिकिटाचे दर अंदाजे 2 लाख रुपये असेल. तर सर्वात स्वस्त तिकिट हे 20 हजार रुपये असेल. त्यामुळे तिकिटाचे दर आणि अमेरिकेचा प्रवास पाहता भारतीय फुटबॉलप्रेमींना खिसा हलका करावा लागेल.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us