AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

फिफा वर्ल्डकप स्पर्धा सुरू होण्यापूर्वी वादाला फोडणी, इराणने अमेरिकेवर केला मोठा आरोप

फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेला काही तास शिल्लक असताना वादाला फोडणी मिळाली आहे. खरं तर अमेरिकेत स्पर्धा असल्याने इराणचा संघ कसा जाणार वगैरे हे सुरू होतं. आता इराणने स्पर्धेसाठी संघ पाठवला आहे. पण आता इराणने तिकिटांवरून अमेरिकेवर गंभीर आरोप केले आहेत.

फिफा वर्ल्डकप स्पर्धा सुरू होण्यापूर्वी वादाला फोडणी, इराणने अमेरिकेवर केला मोठा आरोप
फिफा वर्ल्डकप स्पर्धा सुरू होण्यापूर्वी वादाला फोडणी, इराणने अमेरिकेवर केला मोठा आरोपImage Credit source: Twitter
| Updated on: Jun 09, 2026 | 8:13 PM
Share

फिफा वर्ल्डकप स्पर्धेला 12 जूनपासून सुरूवात होणार आहे. या स्पर्धेसाठी आता काही तासांचा अवधी शिल्लक आहे. असं असताना एक नवा वाद समोर आला आहे. इराण फुटबॉल फेडरेशनने अमेरिकेवर गंभीर आरोप केला आहे. अमेरिकेने इराणच्या वर्ल्डकप साखळी फेरीतील सामन्यांच्या तिकीट वाटप रद्द केल्याचा आरोप केला आहे. इराण फुटबॉल फेडरेशनच्या मते, अमेरिका राजकीय वादामुळे इराणी प्रेक्षकांना वर्ल्डकप सामने पाहण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करत आहे. यापूर्वी इराणी फुटबॉल संघाच्या एका खेळाडूला अमेरिकेतली विमानतळावर ताब्यात घेण्यात आलं होतं. सात तासांच्या चौकशीनंतर त्याची सुटका करण्यात आली होती. त्यामुळे इराणमध्ये संतापाची लाट पसरली होती. त्यात अमेरिकेने प्रशासकीय अडचणीही निर्माण केल्या आहे. काही सहाय्यक कर्मचाऱ्यांना व्हिसा नाकारला आहे. आता तिकीट वाटपाचा मुद्दा उचलून इराण फुटबॉल फेडरेशनने अमेरिकेच्या वागणुकीवर ताशेरे ओढले आहेत.

इराण फुटबॉल फेडरेशनने एक निवेदन जारी करत म्हंटलं की, ‘फिफा विश्वचषक 2026 सुरू होण्यासाठी आता दोन दिवस शिल्लक आहेत. अमेरिकेने पुन्हा एकदा इराण फुटबॉल संघाच्या गट फेरीतील तीन सामन्यांच्या ठिकाणी इराणी समर्थकांच्या प्रवेशात अडथळा आणला आहे.’ फिफाच्या नियमानुसार, प्रत्येक सामन्यांच्या तिकिटांपैकी 8 टक्के तिकीटे ही इराणला मिळायला हवीत. तिकिटांचा हा हिस्सा सहभागी संघटनांना दिला जातो, त्यानंतर ही तिकीटं समर्थकांना वाटली जातात. पण अमेरिकेने हा हिस्सा हिसकावून घेतल्याचा आरोप इराणनने केला आहे. त्यामुळे इराण आपल्या समर्थकांना कोणतंही तिकीट देऊ शकत नाही. त्यामुळे मैदानात इराणचे समर्थक असतील की नाही याबाबत शंका आहे.

इराणने आशियाई फुटबॉल महासंघाच्या पात्रता फेरीत चांगली कामगिरी केली आणि वर्ल्डकप स्पर्धेत स्थान पक्क केलं. इराणने सलग चौथ्यांदा फिफा वर्ल्डकप स्पर्धेत जागा मिळवली आहे. 2014, 2018, 2022 आणि 2026 मध्ये जागा मिळवण्यात यश आलं आहे. इराणच्या फुटबॉल इतिहासातील हा सातवा वर्ल्डकप आहे. इराण जी गटात असून या ग्रुपमध्ये न्यूझीलंड, बेल्जियम आणि इजिप्त हे संघ आहेत. इराणचा पहिला सामना 16 जून रोजी न्यूझीलंडशी होणार आहे.

Follow Us
मोठी बातमी! ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी मनसे आक्रमक;
मोठी बातमी! ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी मनसे आक्रमक; राज्यभर स्वाक्षरी मोहीम, नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
अखिलेश यादवांचा भाजप आणि निवडणूक आयोगावर गंभीर आरोप; ज्ञानेश कुमार...
अखिलेश यादवांचा भाजप आणि निवडणूक आयोगावर गंभीर आरोप; ज्ञानेश कुमार यांना हटवण्याची मागणी!
राष्ट्रपतींनी पुरावे मागितले, राहुल गांधी देऊ शकले नाही, अन् आता...
Anurag Thakur on Rahul Gandhi | राष्ट्रपतींनी पुरावे मागितले, राहुल गांधी देऊ शकले नाही, अन् आता... भाजप मंत्र्याने थेटच सांगितलं
पाकिस्तानातील हिंगलाज मातेचं महाराष्ट्रात स्वयंभू मंदिर! नाशिकच्या...
पाकिस्तानातील हिंगलाज मातेचं महाराष्ट्रात स्वयंभू मंदिर! नाशिकच्या या शक्तिस्थळाचा इतिहास थक्क करणारा
त्यांच्यावर सर्वांना विश्वास...MPSC कारभारात तुकाराम मुंढेंची नियुक्ती
त्यांच्यावर सर्वांनाच विश्वास आहे, मात्र... एमपीएससी कारभारात तुकाराम मुंढेंची नियुक्ती होताच काँग्रेस नेत्याचे विधान
सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने इंडिया आघाडीचा मोर्चा; पोलिसांची परवानगी
सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने इंडिया आघाडीचा मोर्चा; पोलिसांची परवानगी नाकारली, तरी राहुल गांधींसह अनेक नेते सहभागी
दिल्लीत इंडिया आघाडीचा एल्गार; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी...
दिल्लीत इंडिया आघाडीचा एल्गार; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी विरोधक पुन्हा रस्त्यावर!
आमचं आंदोलन म्हणजे...; राहुल गांधींचं ते वक्तव्य चर्चेत, म्हणाले...
Rahul Gandhi : आमचं आंदोलन म्हणजे...; राहुल गांधींचं ते वक्तव्य चर्चेत, म्हणाले...
ठाकरे सेनेचे नगरसेवक आणि स्थानिकांमध्ये हाणामारी; नेमकं काय घडलं?
Shivsena Ubt : ड्रेनेज लाईनच्या पाहणीदरम्यान ठाकरे सेनेचे नगरसेवक आणि स्थानिकांमध्ये हाणामारी; नेमकं काय घडलं?
ज्ञानेश कुमारांना सरकार का वाचवतंय? राहुल गांधींचा मोदी सरकारला सवाल
Rahul Gnadhi : ज्ञानेश कुमारांना सरकार का वाचवतंय? राहुल गांधींचा मोदी सरकारला सवाल; २०० अधिकारी...