AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एक चूक आणि…! FIFA World Cup स्पर्धेत सापांची भीती, या संघाला आधीच दिला इशारा

Snakes in FIFA World Cup 2026: फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेसाठी 48 संघ सज्ज झाले आहेत. आता ही स्पर्धा काही तासांवर येऊन ठेपली आहे. असं असताना या स्पर्धेवर सापांचं सावट आहे. एका संघाचं सराव शिबीर असलेल्या ठिकाणी विषारी सापांचं निवासस्थान आहे.

एक चूक आणि...! FIFA World Cup स्पर्धेत सापांची भीती, या संघाला आधीच दिला इशारा
एक चूक आणि...! FIFA World Cup स्पर्धेत सापांची भीती, या संघाला आधीच दिला इशाराImage Credit source: Getty Images
| Updated on: Jun 09, 2026 | 3:19 PM
Share

फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेकडे साऱ्या जगाचं लक्ष लागून आहे. असं असताना या स्पर्धेवर सापांचं सावट आहे. अगदी तुम्ही वाचलं ते खरं आहे. या स्पर्धेदरम्यान सापांपासून सावध राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. हा इशारा फक्त एकाच संघाला दिला गेला आहे. हा फुटबॉल संघ आहे स्वित्झर्लंडचा.. स्वित्झर्लंड संघ सॅन डियागो येथे फिफा वर्ल्डकप स्पर्धेची तयारी करत आहे. कारण अमेरिकेत स्वित्झर्लंडचा संघ ज्या ठिकाणी सराव करत जिथे रॅटल सापांचं निवासस्थान आहे. या सापांची गणना जगातील पाच विषारी सापांमध्ये केली जाते. या सराव शिबिराच्या बाहेर रॅटल सापाच्या चार वेगवेगळ्या विषारी प्रजाती राहात. त्यामुळे स्वित्झर्लंड संघाला आधीच इशारा देण्यात आला आहे. सराव शिबिराच्या बाहेर फिरू नका अशी ताकीद दिली आहे.

सॅन डियागोमध्ये सापांपासून सावध राहा!

स्वित्झर्लंडच्या फुटबॉलपटूना स्पष्ट सांगण्यात आलं आहे की, सराव शिबिराच्या बाहेर चुकून फुटबॉल गेला तर तो आणण्याची जोखीम पत्कारू नका. उलट तो फुटबॉल तिथे सोडून द्या आणि सरावासाठी दुसरा फुटबॉल घ्या. संघाच्या अधिकृत सोशल मिडिया खात्यावरून याबाबत माहिती देण्यात आली आहे. सराव करत असलेल्या ठिकाणाचा एक नकाशा दाखवण्यात आला आहे. यात मैदान, जिम, चेंजिंग रूम आणि गोलकीपर झोन आहे. पण यात एक भाग वेगळा दाखवण्यात आला आहे. या परिसरात वर डोंगरावर लाल रंगात एक लेबल लावलं आहे. त्यावर सापांचं निवास्थान असं लिहिलं आहे.

फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेत स्वित्झर्लंड ब गटात

फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेत स्वित्झर्लंडचा संघ ब गटात आहे. या गटात यजमान कॅनडा, कतार आणि बोस्निया अँड हेजरगोवनिया हे देश आहेत. या गटात स्वित्झर्लंडचा संघ मजबूत दिसत आहे. गेल्या काही वर्षात स्वित्झर्लंड संघाने फुटबॉल स्पर्धेत आपलं सातत्य दाखवलं आहे. फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेत स्वित्झर्लंडचा पहिला सामना 14 जून रोजी होणार आहे. हा सामना कतारविरुद्ध होणार आहे.

Follow Us
पाकिस्तानातील हिंगलाज मातेचं महाराष्ट्रात स्वयंभू मंदिर! नाशिकच्या...
पाकिस्तानातील हिंगलाज मातेचं महाराष्ट्रात स्वयंभू मंदिर! नाशिकच्या या शक्तिस्थळाचा इतिहास थक्क करणारा
त्यांच्यावर सर्वांना विश्वास...MPSC कारभारात तुकाराम मुंढेंची नियुक्ती
त्यांच्यावर सर्वांनाच विश्वास आहे, मात्र... एमपीएससी कारभारात तुकाराम मुंढेंची नियुक्ती होताच काँग्रेस नेत्याचे विधान
सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने इंडिया आघाडीचा मोर्चा; पोलिसांची परवानगी
सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने इंडिया आघाडीचा मोर्चा; पोलिसांची परवानगी नाकारली, तरी राहुल गांधींसह अनेक नेते सहभागी
दिल्लीत इंडिया आघाडीचा एल्गार; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी...
दिल्लीत इंडिया आघाडीचा एल्गार; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी विरोधक पुन्हा रस्त्यावर!
आमचं आंदोलन म्हणजे...; राहुल गांधींचं ते वक्तव्य चर्चेत, म्हणाले...
Rahul Gandhi : आमचं आंदोलन म्हणजे...; राहुल गांधींचं ते वक्तव्य चर्चेत, म्हणाले...
ठाकरे सेनेचे नगरसेवक आणि स्थानिकांमध्ये हाणामारी; नेमकं काय घडलं?
Shivsena Ubt : ड्रेनेज लाईनच्या पाहणीदरम्यान ठाकरे सेनेचे नगरसेवक आणि स्थानिकांमध्ये हाणामारी; नेमकं काय घडलं?
ज्ञानेश कुमारांना सरकार का वाचवतंय? राहुल गांधींचा मोदी सरकारला सवाल
Rahul Gnadhi : ज्ञानेश कुमारांना सरकार का वाचवतंय? राहुल गांधींचा मोदी सरकारला सवाल; २०० अधिकारी...
भाडोत्री गुंडांना पोलिसांचा गणवेश... आंदोलनावरून राऊतांचा गंभीर आरोप
Sanjay Raut : भाडोत्री गुंडांना पोलिसांचा गणवेश अन्... दिल्लीतील आंदोलनावरून संजय राऊतांचा गंभीर आरोप
संविधानाची गोष्ट करता, पण… सरन्यायाधीशांच्या मुद्द्यावरून फडणवीसांचा..
Devendra Fadnavis : संविधानाची गोष्ट करता, पण… सरन्यायाधीशांच्या मुद्द्यावरून फडणवीसांचा विरोधकांना सवाल
सीजेपी आंदोलन भोवलं; आदित्य-अमित ठाकरेसह संदीप देशपांडे यांच्यावर.....
CJP Protest : सीजेपी आंदोलन भोवलं; आदित्य-अमित ठाकरेसह संदीप देशपांडे यांच्यावर.....