AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुणे शिक्षक मतदारसंघातील भाजपचा उमेदवार अडचणीत? शिवसेना शिंदे गटातून मोठी बातमी

राज्यामध्ये विधान परिषद निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. शिक्षक आणि पदवीधर मिळून पाच जागांवर निवडणुका होणार आहे. मात्र त्यापूर्वीच आता मोठी बातमी समोर आली आहे. भाजपच्या पुण्यातील उमेदवाराच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

पुणे शिक्षक मतदारसंघातील भाजपचा उमेदवार अडचणीत? शिवसेना शिंदे गटातून मोठी बातमी
भाजपला धक्का बसण्याची शक्यता Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Oct 12, 2026 | 4:16 PM
Share

राज्यात सध्या विधान परिषद निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. पाच जांगावर निवडणूक होणार आहे. ज्यामध्ये पुणे शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघ, अमरावती शिक्षक मतदारसंघ, छत्रपती संभाजीनगर पदवीधर मतदारसंघ आणि नागपूर मतदारसंघाचा समावेश आहे. दरम्यान या पाचही मतदारसंघामध्ये कमी अधिक प्रमाणात बंडखोरी झाल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे या पाचही मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवारांचं टेन्शन वाढण्याची शक्यता आहे. अमरावती मतदारसंघात तर बंडखोरी केलेल्या तीन जणांवर भाजपकडून कारवाई करण्यात आली आहे. त्यांना सहा वर्षांसाठी पक्षातून निलंबीत करण्यात आलं आहे.

दरम्यान आता पुणे शिक्षक मतदारसंघातून मोठी बातमी समोर येत आहे. पुण्याच्या शिक्षक मतदारसंघावर शिवसेना शिंदे गटाकडून दावा करण्यात आला होता. मात्र महायुतीमध्ये ही जागा भाजपच्या वाट्याला आली. या मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी शिवसेना शिंदे गटाचे मंगेश चिवटे हे इच्छूक होते.  ही जागा महायुतीमध्ये भाजपच्या वाट्याला गेल्यानंतर देखील मंगेश चिवटे यांनी या मतदारसंघामधून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता.  मात्र उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी त्यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. मात्र जरी मंगेश चिवटे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला असला तरी देखील शिवसैनिकांमधील नाराजी दूर झालेली नाहीये.

एकनाथ स्वाभिमानी शिक्षक संघटनेनं या निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे.  शिवसेना शिंदे गटाशी संबंधित असलेल्या एकनाथ स्वाभिमानी शिक्षक संघटनेनेकडून पुणे शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीवर बहिष्कार घालण्यात आला आहे. या संघटनेकडून मंगशे चिवटे यांच्या उमेदवारीचं समर्थन करण्यात आलं आहे.

आमच्या 10 हजार सभासदांनी निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे.  आम्ही महायुतीचे घटक असून, आमच्यावर अन्याय झाला आहे. त्यामुळे आम्ही आमच्या भावना व्यक्त करण्यासाठी मतदानावर बहिष्कार घालत आहोत. मंगेश चिवटे हे आमचे उमेदवार होते, मात्र ऐनवेळी माघार घेण्यासाठी त्यांच्यावर दबाव आणला गेला.  मंगेश चिवटे हे मागील दोन वर्षांपासून शिक्षकांसाठी काम करत होते. मात्र सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तीवर अन्याय झाला आहे. आमची नाराजी दूर होणार नाही, कारण ती वेळ आता निघून गेली आहे, अशा इशारा यावेळी संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.

Follow Us
पाकिस्तानातील हिंगलाज मातेचं महाराष्ट्रात स्वयंभू मंदिर! नाशिकच्या...
पाकिस्तानातील हिंगलाज मातेचं महाराष्ट्रात स्वयंभू मंदिर! नाशिकच्या या शक्तिस्थळाचा इतिहास थक्क करणारा
त्यांच्यावर सर्वांना विश्वास...MPSC कारभारात तुकाराम मुंढेंची नियुक्ती
त्यांच्यावर सर्वांनाच विश्वास आहे, मात्र... एमपीएससी कारभारात तुकाराम मुंढेंची नियुक्ती होताच काँग्रेस नेत्याचे विधान
सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने इंडिया आघाडीचा मोर्चा; पोलिसांची परवानगी
सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने इंडिया आघाडीचा मोर्चा; पोलिसांची परवानगी नाकारली, तरी राहुल गांधींसह अनेक नेते सहभागी
दिल्लीत इंडिया आघाडीचा एल्गार; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी...
दिल्लीत इंडिया आघाडीचा एल्गार; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी विरोधक पुन्हा रस्त्यावर!
आमचं आंदोलन म्हणजे...; राहुल गांधींचं ते वक्तव्य चर्चेत, म्हणाले...
Rahul Gandhi : आमचं आंदोलन म्हणजे...; राहुल गांधींचं ते वक्तव्य चर्चेत, म्हणाले...
ठाकरे सेनेचे नगरसेवक आणि स्थानिकांमध्ये हाणामारी; नेमकं काय घडलं?
Shivsena Ubt : ड्रेनेज लाईनच्या पाहणीदरम्यान ठाकरे सेनेचे नगरसेवक आणि स्थानिकांमध्ये हाणामारी; नेमकं काय घडलं?
ज्ञानेश कुमारांना सरकार का वाचवतंय? राहुल गांधींचा मोदी सरकारला सवाल
Rahul Gnadhi : ज्ञानेश कुमारांना सरकार का वाचवतंय? राहुल गांधींचा मोदी सरकारला सवाल; २०० अधिकारी...
भाडोत्री गुंडांना पोलिसांचा गणवेश... आंदोलनावरून राऊतांचा गंभीर आरोप
Sanjay Raut : भाडोत्री गुंडांना पोलिसांचा गणवेश अन्... दिल्लीतील आंदोलनावरून संजय राऊतांचा गंभीर आरोप
संविधानाची गोष्ट करता, पण… सरन्यायाधीशांच्या मुद्द्यावरून फडणवीसांचा..
Devendra Fadnavis : संविधानाची गोष्ट करता, पण… सरन्यायाधीशांच्या मुद्द्यावरून फडणवीसांचा विरोधकांना सवाल
सीजेपी आंदोलन भोवलं; आदित्य-अमित ठाकरेसह संदीप देशपांडे यांच्यावर.....
CJP Protest : सीजेपी आंदोलन भोवलं; आदित्य-अमित ठाकरेसह संदीप देशपांडे यांच्यावर.....