AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अखेर राहुल गांधी सुप्रीम कोर्टात दाखल, डीके शिवकुमार, सुप्रिया सुळे यांची देखील उपस्थिती

मोठी बातमी समोर येत आहे, काँग्रेस नेते राहुल गांधी सुप्रीम कोर्टात दाखल झाले आहेत. राहुल गांधी यांच्यासोबत काँग्रेसचे काही वरिष्ठ नेते देखील आहेत. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे देखील राहुल गांधी यांच्यासोतब आहेत.

अखेर राहुल गांधी सुप्रीम कोर्टात दाखल, डीके शिवकुमार, सुप्रिया सुळे यांची देखील उपस्थिती
राहुल गांधी सुप्रीम कोर्टात दाखल Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Oct 12, 2026 | 7:08 PM
Share

मोठी बातमी समोर येत आहे, काँग्रेस नेते राहुल गांधी सुप्रीम कोर्टात दाखल झाले आहेत. राहुल गांधी यांच्यासोबत काँग्रेसचे काही वरिष्ठ नेते देखील आहेत. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे देखील राहुल गांधी यांच्यासोतब आहेत. राहुल गांधी सुप्रीम कोर्टात दाखल झाले आहेत, या आधीच विरोधकांकडून सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यता आली होती, आणि आता राहुल गांधी सुप्रीम कोर्टात दाखल झाले आहेत.

राहुल गांधी आणि इंडिया आघाडीचे सर्व नेते भगवान दास मार्गावरून सुप्रीम कोर्टाच्या दिशेनं निघाले होते. मात्र त्याच ठिकाणी पोलिसांकडून इंडिया आघाडीच्या नेत्यांना अडवण्यात आले. पोलिसांनी अडवल्यानंतर काही वेळ हे सर्व नेते त्याच ठिकाणी थांबले. जिथे पोलिसांनी या नेत्यांना अडवलं ते ठिकाणी सुप्रीम कोर्टापासून अवघ्या 400 मीटर अंतरावर आहे. पोलिसांनी अडवल्यानंतर राहुल गांधी हे इंडिया आघाडीच्या सर्व नेत्यांसबोत माघारी फिरले. मात्र राहुल गांधी इंडिया गेटकडे जात असताना सर्वांना असं वाटलं की, राहुल गांधी हे स्वत: त्यांच्या निवासस्थानाकडे निघाले आहेत. मात्र राहुल गांधी थेट पोलिसांना चकवा देत इंडिया गेटच्या सर्कलवरून टिळक रोडने सुप्रीम कोर्टात पोहोचले.

दरम्यान त्यापूर्वीच राहुल गांधी यांच्याकडून घोषणा करण्यात आली होती की मी सुप्रीम कोर्टात जाणारच, सुप्रीम कोर्टात जाऊन याचिका दाखल करणार. त्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी आणि इंडिया आघाडीचे सर्व नेते भगवान दास मार्गावरून सुप्रीम कोर्टाच्या दिशेनं निघाले होते. मात्र त्याच ठिकाणी पोलिसांकडून इंडिया आघाडीच्या नेत्यांना अडवण्यात आले. मात्र त्यानंतर राहुल गांधी हे त्याच ठिकाणी थांबले अन् नंतर इंडिया आघाडीच्या नेत्यांसोबत टिळक मार्गाने ते सुप्रीम कोर्टात दाखल झाले. राहुल गांधी यांच्यासह काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेस नेते डीके शिवकुमार, राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांची देखील उपस्थिती होती.  त्यानंतर ते काही वेळात पुन्हा सुप्रीम कोर्टामधून मागे फिरले.

Follow Us
दिल्लीतील आंदोलनात जनसागर! राहुल गांधींच्या महामोर्चाला उस्फुर्त...
दिल्लीतील आंदोलनात जनसागर! राहुल गांधींच्या महामोर्चाला उस्फुर्त प्रतिसाद
ठाकरे बंधूंवरील गुन्ह्यांच्या निषेधार्थ तेजस ठाकरेंच्या नेतृत्वाखाली..
ठाकरे बंधूंवरील गुन्ह्यांच्या निषेधार्थ तेजस ठाकरेंच्या नेतृत्वाखाली दादरमध्ये मूकमोर्चा; शिवाजी पार्करही आंदोलन!
उदय सामंतांचा MPSC आयुक्तांच्या राजीनाम्यावर मोठा खुलासा; महायुतीतील..
उदय सामंतांचा MPSC आयुक्तांच्या राजीनाम्यावर मोठा खुलासा; महायुतीतील समन्वयावरही भाष्य!
पक्षचिन्ह गैरसमजामुळे लाखो मत गमावले, ठाकरे गटातील नेत्याचा आरोप
धनुष्यबाणाच्या गैरसमजामुळे दीड लाख मतांचा फटका अन् पक्ष... ठाकरे गटातील नेत्याचा अजब आरोप
सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने इंडिया आघाडीचा मोर्चा; राहुल गांधी...
सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने इंडिया आघाडीचा मोर्चा; राहुल गांधी, प्रियंका गांधी मैदानात, ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात याचिका दाखल!
मोठी बातमी! ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी मनसे आक्रमक;
मोठी बातमी! ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी मनसे आक्रमक; राज्यभर स्वाक्षरी मोहीम, नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
अखिलेश यादवांचा भाजप आणि निवडणूक आयोगावर गंभीर आरोप; ज्ञानेश कुमार...
अखिलेश यादवांचा भाजप आणि निवडणूक आयोगावर गंभीर आरोप; ज्ञानेश कुमार यांना हटवण्याची मागणी!
राष्ट्रपतींनी पुरावे मागितले, राहुल गांधी देऊ शकले नाही, अन् आता...
Anurag Thakur on Rahul Gandhi | राष्ट्रपतींनी पुरावे मागितले, राहुल गांधी देऊ शकले नाही, अन् आता... भाजप मंत्र्याने थेटच सांगितलं
पाकिस्तानातील हिंगलाज मातेचं महाराष्ट्रात स्वयंभू मंदिर! नाशिकच्या...
पाकिस्तानातील हिंगलाज मातेचं महाराष्ट्रात स्वयंभू मंदिर! नाशिकच्या या शक्तिस्थळाचा इतिहास थक्क करणारा
त्यांच्यावर सर्वांना विश्वास...MPSC कारभारात तुकाराम मुंढेंची नियुक्ती
त्यांच्यावर सर्वांनाच विश्वास आहे, मात्र... एमपीएससी कारभारात तुकाराम मुंढेंची नियुक्ती होताच काँग्रेस नेत्याचे विधान