AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मिस्टर इंडिया, प्रसिद्ध बॉडीबिल्डरचं सायलंट हार्ट अटॅकने निधन; रुग्णालयात नेताच 20 मिनिटात काळाचा घाला

प्रसिद्ध बॉडीबिल्डर प्रेमराज अरोडा यांचं निधन झालं आहे. काल बुधवारी त्यांनी जगाचा निरोप घेतला. वयाच्या अवघ्या 42व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या मृत्यूमुळे राजस्थानसह देशभरात शोक व्यक्त केला जात आहे.

मिस्टर इंडिया, प्रसिद्ध बॉडीबिल्डरचं सायलंट हार्ट अटॅकने निधन; रुग्णालयात नेताच 20 मिनिटात काळाचा घाला
Premraj Arora Image Credit source: tv9 marathi
| Updated on: May 25, 2023 | 10:57 AM
Share

कोटा : प्रसिद्ध बॉडीबिल्डर प्रेमराज अरोडा यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं आहे. काल बुधवारी कोटा येथील रुग्णालयात प्रेम अरोडा यांनी अखेरचा श्वास घेतला. ते अवघे 42 वर्षाचे होते. त्यांच्यामागे आईवडील, भाऊ, पत्नी आणि दोन मुली असा परिवार आहे. अचानक छातीत दुखू लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. रुग्णालयात दाखल केल्यानंतर अवघ्या 20 मिनिटात त्यांचं निधन झालं. सायलंट हार्ट अटॅकमुळे त्यांचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात आलं. त्यांनी बॉडीबिल्डर स्पर्धेत त्यांना मिस्टर इंडियाचा पुरस्कार मिळाला होता. ते देशातील प्रसिद्ध बॉडीबिल्डरांपैकी एक होते.

प्रेमराज अरोडा हे आरोडा समाजाचा अध्यक्ष होते. कोटामध्ये ते जीम चालवत होते. तरुणांसाठी ते बॉडीबिल्डिंगच्या स्पर्धाही आयोजित करायचे. राजस्थानच्या कोटा येथील कैथूनीपोल येथे राहणाऱ्या प्रेमराज यांनी अनेक पुरस्कार जिंकले होते. त्यातील मिस्टर इंडिया हा सर्वोच्च पुरस्कारही त्यांनी पटकावला होता.

अनेक स्पर्धांमध्ये भाग

प्रेमराज यांनी 1993मध्ये जिमिंगला सुरुवात केली होती. सुरुवातीच्या काळात ते सिटी लेव्हल आणि स्टेट लेव्हलच्या स्पर्धेत भाग घ्यायचे. त्यांनी विविध पुरस्कार पटकावले आहेत. त्यामुळे केवळ त्यांच्या पुरस्कारांनी अख्खं घर भरून गेलं आहे. ते अनेक वेळा मिस्टर कोटा आणि मिस्टर हाडोतीही राहिलेले आहेत. पॉवर लिफ्टिंगमध्ये स्पर्धेत उतरल्यानंतर त्यांनी 2016 पासून ते 2018पर्यंत मिस्टर राजस्थानचा पुरस्कार पटकावला. ते गोल्ड मेडिलिस्टही होते. पॉवर लिफ्टिंग आणि बॉडीबिल्डिंगमध्ये त्यांनी संपूर्ण देशात लौकीक मिळवला होता, असं प्रेमराज यांचे लहान भाऊ राहुल यांनी सांगितलं.

अ‍ॅसिडीटीचा त्रास होता

राहुल यांच्या माहितीनुसार, प्रेमराज यांना कोणताच मोठा आजार नव्हता. मात्र, त्यांना कधी कधी अ‍ॅसिडीटीची समस्या जाणवायची. रविवारी सकाळी त्यांना अ‍ॅसिडीटीचा त्रास झाला होता. त्यावेळी त्यांनी औषधे घेतली होती. त्यानंतर त्यांची तब्येत आणखीनच बिघडली. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, उपचार सुरू असतानाच अवघ्या 20 मिनिटात त्यांचं निधन झालं.

व्यसनापासून दूर राहा

प्रेमराज केवळ बॉडीबिल्डिंगच करत नव्हते तर तरुणांना चांगलं मार्गदर्शनही करायचे. तरुणांनी व्यसनांपासून दूर राहावं असं ते सतत सांगायचे. लोकांनाही सांगायचे आणि स्वत:ही ते फिट राहायचे. तरुणांनाही फिट राहण्यासाठी थोडा वेळ काढण्याचं आवाहन करायचे. ते बॉडीबिल्डिंगच्या स्पर्धा भरवायचे. तरुणांना बक्षीसं द्यायचे. नुकतीच त्यांनी नवी जीमही सुरू केली होती.

...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका.
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी.
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक.
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित.
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?.
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया.
भाजप कार्यकर्त्यांचा विरोध तरीही मनसेचे दिनकर पाटील भाजपात अन्..
भाजप कार्यकर्त्यांचा विरोध तरीही मनसेचे दिनकर पाटील भाजपात अन्...
कोणतीही तडजोड नाही, वंचितकडून काँग्रेसला मोठा प्रस्ताव अन् राज्यात...
कोणतीही तडजोड नाही, वंचितकडून काँग्रेसला मोठा प्रस्ताव अन् राज्यात....
जगताप यांच्या काँग्रेस प्रवेशावरून पुणे शहर काँग्रेसमध्ये नाराजी?
जगताप यांच्या काँग्रेस प्रवेशावरून पुणे शहर काँग्रेसमध्ये नाराजी?.
भाजपचा एकाचवेळी काँग्रेस, ठाकरे सेनेला जोर का धक्का! BJPची ताकद वाढणार
भाजपचा एकाचवेळी काँग्रेस, ठाकरे सेनेला जोर का धक्का! BJPची ताकद वाढणार.