FIFA World Cup 2026: वर्ल्डकप स्पर्धेत पहिलाच पराभव देशाच्या जिव्हारी, थेट प्रशिक्षकाला काढून टाकलं!

FIFA World Cup 2026: फिफा वर्ल्डकप स्पर्धेतील साखळी फेरीतील पहिलाच पराभव ट्यूनीशियाच्या जिव्हारी लागला आहे. या पराभवानंतर मुख्य प्रशिक्षक असलेल्या सबरी लामौची यांना थेट बाहेरचा रस्ता दाखवला आहे. स्वीडनकडून 5-1 ने मात मिळताच हे पाऊल उचललं आहे.

FIFA World Cup 2026: वर्ल्डकप स्पर्धेत पहिलाच पराभव देशाच्या जिव्हारी, थेट प्रशिक्षकाला काढून टाकलं!
FIFA World Cup 2026: वर्ल्डकप स्पर्धेत पहिलाच पराभव देशाच्या जिव्हारी, थेट प्रशिक्षकाला काढून टाकलं!
Image Credit source: Getty Images
| Updated on: Jun 15, 2026 | 10:24 PM

FIFA World Cup 2026: फिफा वर्ल्डकप दर चार वर्षांनी येतो. त्यामुळे चार वर्षांनी येणाऱ्या स्पर्धेत पात्र ठरलेल्या प्रत्येक देशाला चांगली कामगिरी करण्याची अपेक्षा असते. खरं तर फुटबॉल वर्ल्डकप स्पर्धेसाठी पात्र ठरणं किती कठीण आहे. त्यात पात्र ठरल्यावर चांगल्या कामगिरीची अपेक्षा असणं सहाजिकच आहे. असं असताना स्वीडनने ट्यूनीशियाला 5-1 ने लोळवलं. हा निकाल ट्यूनीशिया फुटबॉल व्यवस्थापनाच्या जिव्हारी लागला आणि त्यांनी थेट मुख्य प्रशिक्षक असलेल्या सबरी लामौची यांना घरचा रस्ता दाखवला. फुटबॉल स्पर्धेच्या इतिहासात एका पराभवानंतर थेट काढून टाकण्याची ही पहिलीच आश्चर्यकारक घटना आहे. मानहानीकारक पराभवानंतर त्यांना काढून टाकलं आहे. त्यामुळे पुढच्या सामन्यात सबरी लामौची संघासोबत नसतील.

सबरी लामौची यांची नियुक्ती कधी झाली होती?

जानेवारी 2026 मध्ये ट्यूनीशियाई फुटबॉल फेडरेशनने फ्रान्सचा माजी आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू सबरी लमौची यांच्यासोबत जुलै 2028 पर्यंत करार केला होता. त्यांनी काही आठवड्यांपूर्वी टोरोंटोत पहिला ट्रेनिंग कॅम्प लावला होता. पण वर्ल्डकप स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात ट्यूनीशियाचा मानहानीकारक पराभव झाला. या पराभवानंतर लामौची यांनी सांगितलं की, ‘हा एक कठीण आणि वेदनादायी पराभव आहे. वर्ल्ड क्लास खेळाडूंच्या समोर इतक्या मोठ्या चुका करणं अक्षम्य आहे.’ स्वीडनच्या चाहत्यांनीही सोशल मीडियावर संताप व्यक्त केला आहे. चाहत्यांचा मते, ट्यूनीशिया संघ हा बचावासाठी ओळखला जातो आणि संघाने मागच्या दोन सामन्यात 10 गोल खाल्ले. दुसरीकडे, लामौची यांच्यावर आधीच पक्षपाताचे आरोपही झाले आहेत.

पुढच्या सामन्यापूर्वी लामौची यांना निरोप

मिडिया रिपोर्टनुसार, ट्यूनीशियन फुटबॉल बोर्डाने सबरी लमौची यांना पदमुक्त करण्यासाठी आधीच तयारी सुरू केली आहे. त्यामुले 20 जून रोजी जापानविरुद्ध होणाऱ्या पुढच्या सामन्यात डगआऊटमधून आऊट असणार आहेत. 2014 मध्ये वर्ल्डकप स्पर्धेत आयव्हरी कोस्टचे नेतृत्व आणि नॉटिंगहॅम फॉरेस्टसारख्या क्लबला प्रशिक्षण दिलेल्या सबरी लमौची यांच्यासाठी हा धक्का आहे. आता त्यांची जबाबदारी कोण सांभाळणार याचीही चर्चा सुरू आहे.

Follow Us