जर्मनीचा फुटबॉलर ऑलिव्हर कानचा भारतीय खेळाडूंना सल्ला, Nevre Give Up

| Updated on: Nov 25, 2023 | 1:44 PM

Oliver Khan advice indian football players : जर्मनीचा दिग्गज फुटबॉलर गोलकीपर ऑलिव्हर कान १५ वर्षांनी भारतात परतला. ऑलिव्हर मुंबईतील एका शाळेत तो आलेला त्यावेळी त्याने मार्गदर्शन करताना सर्व भारतीय खेळाडूंना सल्ला दिला.

जर्मनीचा फुटबॉलर ऑलिव्हर कानचा भारतीय खेळाडूंना सल्ला, Nevre Give Up
Follow us on

मुंबई : जर्मनीचा स्टार फुटबॉलपटू ऑलिव्हर कान मुंबईमध्ये आला होता. मुंबईमधील जी डी सोमाणी इंटरनॅशनल स्कूलमध्ये त्याने भेट दिली, यावेळी त्याने विद्यार्थ्यांशी संवाद साधला त्यासोबतच मार्गदर्शन करत भारतामध्ये फुटबॉलसाठी भारतीयांमध्ये क्षमता असल्याचं सांगितलं. इतकंच नाहीतर कानने सर्व खेळाडूंना मार्गदर्शन करताना एक मोलाचा सल्ला दिला.

जी डी सोमाणी इंटरनॅशनल स्कूलमध्ये आल्यावर कान याचं वाजत गाजत स्वागत करण्यात आलं.  महाराष्ट्रीय पद्धतीने म्हणजेच तुतारी वाजवत आणि त्यानंतर त्यांना पगडी देण्यात आली होती. यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी लेझीम खेळले. त्यानंतर कान यांची सही मिळवण्यासाठी चिमुकल्यांनी गराडा घातलेला पाहायला मिळाला.शाळेत पारंपारिक पद्धतीने स्वागत केल्यावर शाळेतील मुलांनी त्याच्यासमोरच एक फुटबॉलचा सामनाही खेळला.

भारतीयांना कोणता सल्ला दिला?

मी जेव्हा माझ्या करिअयरला सुरूवात केलेली तेव्हा मलाही कठोर परिश्रम घ्यावे लागले होते. माझ्यासमोर अनेक आव्हान आली होतीत मात्र मी हार मानली नाही. कधीही हार मानू नका हेच माझ्याही आयुष्याचं ध्येय होतं आणि मी हे प्रत्येकाली स्वीकारण्यास सांगतो. कारण जे कायम दर्जेदार काम करण्याचा प्रयत्न करतात ते यश मिळवण्यात यशस्वी होतातच. त्यामुळे माझा सर्वांना सांगणं असेल की कधीच हार मानू नका, असं ऑलिव्हर कान यांनी सांगितलं.