AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चक दे इंडिया! महिला हॉकी संघाने इंग्लंडला रडवलं, सामना ड्रॉ करत स्पर्धेतून बाहेर काढलं

वुमन्स हॉकी वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या साखळी फेरीतील तिसऱ्या सामन्यात भारत आणि इंग्लंड हे संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात कडवी झुंज पाहायला मिळाली.

चक दे इंडिया! महिला हॉकी संघाने इंग्लंडला रडवलं, सामना ड्रॉ करत स्पर्धेतून बाहेर काढलं
चक दे इंडिया! महिला हॉकी संघाने इंग्लंडला रडवलं, सामना ड्रॉ करत स्पर्धेतून बाहेर काढलंImage Credit source: Hockey India Twitter
| Updated on: Aug 20, 2026 | 8:24 PM
Share

वुमन्स हॉकी वर्ल्डकप 2026 स्पर्धेतील करो या मरोचा सामना भारत आणि इंग्लंड यांच्यात पार पडला. या सामन्यात पहिल्या क्वॉर्टरपासून दोन्ही संघांनी तीव्र लढत दिली. त्यामुळे या सामन्याचा निकाल काय लागतो याची उत्सुकता होती. कारण या सामन्याच्या निकालावरच पुढच्या फेरीचं गणित ठरणार होतं. त्यामुळे दोन्ही संघांनी कडवी झुंज दिली. एका गोलसाठी दोन्ही संघांनी चांगलाच घाम गाळला. पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या क्वॉर्टरमध्ये दोन्ही संघांच्या हाती काहीच लागलं नाही. त्यामुळे गोल स्थिती 0-0 अशी होती. त्यामुळे चौथ्या क्वॉर्टरमधील 15 मिनिटात काय होते याची उत्सुकता होती. इंग्लंडने चौथ्या क्वॉर्टरमध्ये जास्तीत जास्त चेंडू जवळ ठेवून चक्रव्यूह भेदण्याचा प्रयत्न केला. पण इंग्लंडला काही जमलं नाही. अखेर हा सामना 0-0 ने बरोबरीत सुटला आणि भारताने क्रॉसओव्हर फेरीत धडक मारली. तर इंग्लंडचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं.

भारतीय महिला हॉकी संघाने इंग्लंडला गोलसाठी अक्षरश: रडवलं. कारण हा सामना काहीही करून त्यांना जिंकायचा होता. पण भारताचा डिफेन्स इतका जबरदस्त होता की  शेवटपर्यंत इंग्लंडने केलेले सर्व प्रयत्न फेल गेले. गट ड मध्ये चीनने दक्षिण आफ्रिकेचा 5-1 असा पराभव केल्यामुळे ते पहिल्या स्थानावर राहिले. भारतीय संघ दुसऱ्या स्थानावर राहिला आहे. त्यामुळे क्रॉसओव्हर फेरीत भारताचा सामना अ गटातून पात्र ठरलेल्या नेदरलँड आणि ऑस्ट्रेलियाशी होईल. या फेरीतीय दोन सामन्यांनंतर जे अव्वल दोन संघ असतील, ते थेट सेमीफायनल खेळतील.

भारतीय महिला संघाची स्पर्धेतील कामगिरी

हॉकी वर्ल्डकप स्पर्धेत भारतीय महिला संघाचा पहिला सामना ऑलिम्पिक रौप्य पदक विजेत्या चीनशी झाला. जागतिक क्रमवारीत चौथ्या क्रमांकावर असलेल्या चीनचं मोठं आव्हान होतं. हे आव्हान भारतीय संघाने यशस्वीरित्या पेललं आणि चीनला 2-2 ने बरोबरी रोखलं. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात दक्षिण अफ्रिकेचा धुव्वा उडवला. दक्षिण अफ्रिकेला 6-1 ने पराभूत केलं. वुमन्स हॉकी वर्ल्डकपच्या इतिहासातील हा भारताचा आजवरचा सर्वात मोठा विजय ठरला आहे. विशेष म्हणजे भारताच्या सहा वेगवेगळ्या खेळाडूंनी गोल मारले.

Follow Us
शिवसैनिकांच्या अनोख्या बॅनरची तुफान चर्चा; उद्धव ठाकरे भावी पंतप्रधान
शिवसैनिकांच्या अनोख्या बॅनरची तुफान चर्चा; उद्धव ठाकरे भावी पंतप्रधान अन् राज ठाकरे तर थेट...
ठाकरे बंधूंचा ज्ञानेश कुमारांविरोधात एल्गार, मतदार यादीच्या मुद्द्यावर
ठाकरे बंधूंचा ज्ञानेश कुमारांविरोधात एल्गार, मतदार यादीच्या मुद्द्यावर मुंबईत मोठं आंदोलन
अभिजीत दिपकेंना मोठा धक्का! दादरमधील आंदोलन भोवलं? रहिवाशांची थेट...
अभिजीत दिपकेंना मोठा धक्का! दादरमधील आंदोलन भोवलं? रहिवाशांची थेट गुन्हा...
विक्रम शिंगाडेंवर विनयभंगाचा गुन्हा; अभयसिंह जगतापांचे पोलीसांसमोरच...
विक्रम शिंगाडेंवर विनयभंगाचा गुन्हा; अभयसिंह जगतापांचे पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन!
नुसताच पाऊस कमी नाही, पिकंही गेली! अहिल्यानगरच्या 14 तालुक्यांत नुकसान
नुसताच पाऊस कमी नाही, पिकंही गेली! अहिल्यानगरच्या 14 तालुक्यांत नुकसानीचे पंचनामे सुरू
विधान परिषदेच्या जागेवरून मविआत तोडगा नाही, पुन्हा बैठक होणार
विधान परिषदेच्या जागेवरून मविआत तोडगा नाही, पुन्हा बैठक होणार
महायुतीत खलबतं? पुणे शिक्षक मतदारसंघाच्या उमेदवारीवरून राजकारण;
महायुतीत खलबतं? पुणे शिक्षक मतदारसंघाच्या उमेदवारीवरून राजकारण; शिंदेंच्या नेत्यांना तातडीच्या सूचना
महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटला; पुणे शिक्षक मतदारसंघ भाजपकडे
महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटला; पुणे शिक्षक मतदारसंघ भाजपकडे, मंगेश चिवटेंना धक्का!
चंद्रपुरात दुष्काळामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना नो लीव्ह, मुख्यालयातच...
चंद्रपुरात दुष्काळामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना नो लीव्ह, मुख्यालय सोडण्यास मनाई
ठाकरे बंधूंच्या गर्जना मोर्चासाठी मनसेची मोठी तयारी; 150 जणांची स्पेशल
ठाकरे बंधूंच्या गर्जना मोर्चासाठी मनसेची मोठी तयारी; 150 जणांची स्पेशल टीम तैनात?