Asia Cup 2023 | भारत-पाकिस्तान ‘या’ तारखेला आमनेसामने, कोण जिंकणार?

| Updated on: May 26, 2023 | 11:38 PM

भारतीय चाहत्यांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. भारत-पाकिस्तान हे कट्टर संघ आमनेसामने येणार आहेत. जाणून घ्या या सामन्याबाबत.

Asia Cup 2023 | भारत-पाकिस्तान या तारखेला आमनेसामने, कोण जिंकणार?
Image Credit source: AFP
Follow us on

मुंबई | टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान यांच्यात जेव्हा सामना होतो तेव्हा एक वेगळाच जल्लोष पाहायला मिळतो. मात्र गेल्या काही वर्षात ताणलेल्या राजकीय संबंधांमुळे या दोन्ही संघांमध्ये कोणत्याही क्रीडा प्रकारात विशेष असे सामने झालेले नाहीत. मात्र या दरम्यान चाहत्यांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. भारतीय टीमने ज्युनिअर आशिया कप हॉकी स्पर्धेत धमाकेदार सुरुवात केलीय. त्यानंतर आता शनिवारी भारतीय संघ पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तान विरुद्ध भिडणार आहेत.

भारतीय संघाचा पाकिस्तानवर मात करत साखळी फेरीतील विजयी घोडदौड कायम ठेवण्याचा प्रयत्न असणार आहे. भारताने आपल्या पहिल्या पूल ए मॅचमध्ये चीनी ताईपेवर 18-0 अशा एकतर्फी फरकाने विजय मिळवलाय. तर गुरुवारी अरिजीत सिंह हुंदल, शारदानंद तिवारी आणि उत्तर सिंह या तिकडीच्या जोरावर जपानवर 3-1 च्या फरकाने विजय मिळवला.

भारत-पाक कडवी झुंज

भारताचा पाकिस्तान विरुद्धच्या या सामन्यात कस लागणार आहे. कारण पाकिस्तानने गेल्या सामन्यांमध्ये चीनी ताईपेला 15-1 आणि थायलंडवर 9-0 या एकतर्फी फरकाने विजय मिळवलाय. तर दुसऱ्या बाजूला आमचा विजयामुळे विश्वास वाढल्याचं भारताचा कॅप्टन उत्तम सिंह म्हणाला. मात्र आमच्यासमोर पाकिस्तानचं आव्हान असेल, असं उत्तमने मान्य केलं. “आम्ही स्पर्धेत दणक्यात सुरुवात केली. याच विश्वासाने आम्ही पाकिस्तानचा सामना करु. पहिल्या 2 विजयांमुळे आमचा आत्मविश्वास वाढलाय. मात्र पाकिस्तान टीमही तोडीसतोड आहे. हा सामना बरोबरीचा होईल”, असं उत्तम म्हणाला.

कोच सी आर कुमार काय म्हणाले?

“पाकिस्तान विरुद्ध खेळणं कायम आव्हानात्मक राहिलंय. मात्र आम्ही तयारी केलीय. तसेच सरावावर अधिर लक्ष दिल्यास निकाल चांगलाच लागेल”, असा विश्वास भारताचे हेड कोच सी आर कुमार यांनी व्यक्त केला. पाकिस्ताननंतर भारताचा सामना हा रविवारी थायलड विरुद्ध होणार आहे.