चक दे इंडिया! एशियन गेम्स पुरुष हॉकीमध्ये भारताने मिळवलं गोल्ड मेडल, जापानचा 5-1 ने पराभव

Asian Games 2023 : एशियन गेम्समध्ये भारताने आणखी एका सुवर्ण पदकाची कमाई केली आहे. पुरुष हॉकी संघाने अपेक्षेप्रमाणे कामगिरी करत जापानचा 5-0 ने धुव्वा उडवला.

चक दे इंडिया! एशियन गेम्स पुरुष हॉकीमध्ये भारताने मिळवलं गोल्ड मेडल, जापानचा 5-1 ने पराभव
Asian Games : हॉकीमध्ये भारताने जिंकलं सुवर्ण पदक, अंतिम सामन्यात जापानला 5-0 ने हरवलं
Image Credit source: Twitter
| Updated on: Oct 06, 2023 | 6:13 PM

मुंबई : एशियन गेम्समध्ये भारताने जबरदस्त कामगिरीचं प्रदर्शन केलं आहे. गेल्या 72 वर्षातील पदकांचा विक्रम मोडीत काढला आहे. भारताची मेडल संख्या 90 च्या पार गेली आहे. त्यात आणखी एका गोल्ड मेडलची भर पडली आहे. भारताने पहिल्या सत्रापासूनच जापानवर आघाडी मिळवली होती.विशेष म्हणजे भारतीय हॉकी संघ या एशियन गेम्समध्ये एकही सामना हारलेला नाही. बांगलादेश ते पाकिस्तान या सारख्या दिग्गज संघांना मोठ्या फरकाने पराभूत केलं.

भारताकडून पहिला गोल मनप्रीत सिंह याने मारला. पण जापानने रिव्ह्यू घेतल्याने निर्णय तिसऱ्या पंचांकडे गेला. पण तिसऱ्या पंचांनी गोल असल्याचं सांगितलं आणि टीम इंडियाने पहिली आघाडी मिळवली. त्यानंतर टीम इंडियाने मागे वळून पाहिलंच नाही. दुसऱ्या तिसऱ्या आणि चौथ्या सत्रातही आघाडी कायम ठेवली. या कामगिरीसह टीम इंडियाने एशियन गेम्समध्ये सुवर्ण पदक मिळवलं आहे.

पहिल्या सत्रात दोन्ही संघ गोल करू शकले नाहीत. दुसऱ्या सत्रातील 25 व्या मिनिटाला भारताकडून पहिला गोल केला गेला. त्यामुळे पहिल्या हाफमध्ये भारताला 1-0 ने आघाडी मिळाली. दुसऱ्या हाफमधील तिसऱ्या सत्रात भारताने आणखी दोन गोल झळकावले. चौथ्या सत्रातील 48 व्या मिनिटाला अभिषेकने गोल मारत 4-0 ने आघाडी घेतली. त्यानंतर जापानने एक गोल मारला आणि 4-1 अशी स्थिती झाली. शेवटच्या क्षणी हरमनप्रीत याने गोल मारला आणि 5-1 ने विजय मिळवला.

भारताकडून मनप्रीत सिहं, कर्णदार हरमनप्रीत सिंह, अमित रोहिदास आणि अभिषेक यांनी गोल मारला. भारतीय पुरुष हॉकी संघाने एशियन गेम्स इतिहासातील चौथं गोल्ड मेडल पटकावलं आहे. यापूर्वी 1966, 1998 आणि 2014 मध्ये भारतीय पुरुष हॉकी संघाने सुवर्ण पदक पटकावलं होतं. या व्यतिरिक्त हॉकी टीने 9 रौप्य आणि 3 कांस्य पदक जिंकले आहेत. भारत आणि जापान यांनी 2013 नंतर 28 वेळा एकमेकांसमोर उभे ठाकले होते. यात 23 सामने भारताने, जापानने 3 आणि दोन सामने ड्रॉ झाले आहेत. यासह भारताने ऑलिंपिक 2024 मधील कोटाही पूर्ण केला आहे. भारताने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पात्र केलं आहे. पॅरिक ऑलिम्पिक स्पर्धा 26 जुलै ते 11 ऑगस्टपर्यंत असणार आहे.