Sania mirza Reitrement: भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झाची निवृत्तीची घोषणा

| Updated on: Jan 19, 2022 | 3:44 PM

भारतात टेनिस या खेळाकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलणारी भारताची अव्वल महिला टेनिसपटू सानिया मिर्झाने (Sania mirza) निवृत्तीची घोषणा केली आहे.

Sania mirza Reitrement: भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झाची निवृत्तीची घोषणा
Follow us on

मुंबई: भारतात टेनिस या खेळाकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलणारी भारताची अव्वल महिला टेनिसपटू सानिया मिर्झाने (Sania mirza) निवृत्तीची घोषणा केली आहे. ऑस्ट्रेलियन ओपन (Austalian open) 2022 मध्ये महिला दुहेरीच्या पहिल्या फेरीत पराभव झाल्यानंतर सानियाने निवृत्तीच्या योजनेची घोषणा केली. 2022 हा माझा शेवटचा मोसम असेल. तो मला पूर्ण करायचा आहे असे सानियाने सांगितले. ‘मी ठरवलय हा माझा शेवटचा सीजन असेल’, असे सानियाने सांगितले.

काजा ज्युवान आणि तामारा या स्लोव्हेनियाच्या जोडीने मिर्झा आणि किचीनॉक जोडीचा ऑस्ट्रेलियन ओपनच्या सलामीच्या लढतीतच पराभव केला. मिर्झा आणि युक्रेनची तिची जोडीदार किचीनॉक याचा ज्युवान-तामारा जोडीने 4-6, 6-7 (5) असा एक तास 37 मिनिटात पराभव केला.