Nashik : मनमाडच्या युवकाची एशियन स्पर्धेसाठी निवड, क्रीडा क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव

| Updated on: Jun 11, 2022 | 11:12 AM

शुभमनं 48 किलो गटात चमकदार कामगिरी करत सुवर्ण पदकाची कमाई केली आहे. यामुळे नाशिकच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेलाय.

Nashik : मनमाडच्या युवकाची एशियन स्पर्धेसाठी निवड, क्रीडा क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव
कुस्ती स्पर्धा
Follow us on

नाशिक : जिल्ह्यातील मनमाडच्या (Manmad) सावरकर नगर जिमखान्याचा युवा पैलवान शुभम आचपळे यानं दिल्ली (Delhi) येथे झालेल्या एशियन सब जूनियर निवड चाचणी स्पर्धेत चांगली कामगिरी केली आहे. त्याने 48 किलो गटात चमकदार कामगिरी करत सुवर्ण पदकाची कमाई केली आहे. यामुळे नाशिकच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेलाय. नाशिक जिल्ह्याला ऐतिहासिक विजय मिळवून दिल्याने शुभमचं सर्वत्र कौतुक होतंय. शुभमची तुर्की येथे आंतराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली असून नाशिककरांसाठी अभिमानाची बाब आहे. नाशिकच्या (Nashik) क्रीडा क्षेत्रातून शुभमचं सर्वच स्तरातून कौतुक होतंय. सध्या शुभम हा हरियाणाच्या सोनिपत येथे सराव करीत आहे.

सुवर्णपदकाची कमाई

शुभम हा सध्या हरियाणातील  सोनिपत याठिकाणी सराव करत आहे. त्याची तुर्कीमध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाल्यानं सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होतोय. शुभमला 48 किलो गटात चमदार कामगिरी केल्यानं सुवर्ण पदक मिळालंय. त्याने आपल्या कौशल्याच्या आधारे हे पदक पटकावलं आहे.

हे सुद्धा वाचा

अथक प्रयत्न आणि मेहनत

कोणतीही स्पर्धा असो अथक प्रयत्न आणि मेहनत असली की यश नक्की मिळतं. शुभम करत असलेली कामगिरी ही अभिमानास्पद आहे. त्यामुळे नाशिकमधील क्रीडा क्षेत्र आणखी विस्तार जातंय. नाशिक आणि पर्यायाणे उत्तर महाराष्ट्रात खेळाला प्रत्साहीत करण्यासाठी आणि खेळाडूंना प्रोत्साहन मिळण्यासाठी शुभमची कामगिरी अगदी ठळक आहे. शुभमनं आपल्या मेहनतीतून गाठलेली मोठी पातळी ही अनेकांसाठी प्रेरणादाई ठरू शकते. शुभम लहान वयात करत असलेली मोठी कामगिरी ही त्याच्या कौतुकात अगदी ठळकपणे बोलून दाखवली जाते. या सगळ्या गोष्टीमागे त्याची मेहनत देखील महत्वाची आहे. कुस्तीसाठी मोठ्या प्रमाणात सराव करावा लागतो. तो सराव शुभम सध्या हरयाणामध्ये करत आहे.

तुर्की स्पर्धेसाठी निवड

शुभमची तुर्की येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर शुभम खेळणार असल्यानं कुटुंबियांसह नाशिककरांसाठी ही अभिमानाची बाब आहे. शुभमचं हे एक उदाहरण अनेकांसाठी प्रेरणादाई आहे. खेळाडू बनण्यासाठी स्पर्धेची आवड असावी लागते. एखादा जवळचा व्यक्ती किंवा जिल्ह्यातील व्यक्ती क्रीडा स्पर्धेत मोठी कामगिरी केल्यानं चर्चेत येतो. त्याचा फायदा इतर युवकांचं मनोबल वाढवण्यासठी देखील होऊ शकतो. शुभमच्या कामगिरीनं नाशिकमध्ये क्रीडा क्षेत्रात आणि खेळाडू निर्माण होतील, एवढं मात्र नक्की.