
वर्ल्ड चॅम्पियन डी गुकेशने पुन्हा एका चॅम्पियनसारखी कामगिरी केली आहे. त्याने माजी वर्ल्ड चॅम्पियन मॅग्नस कार्लसनला पराभूत करत बुद्धीबळाच्या 64 घरांवर राज्य असल्याचं दाखवून दिलं. नॉर्वे चेस 2025 स्पर्धेच्या सहाव्या फेरीत गुकेशने हा ऐतिहासिक विजय मिळवला. त्याने कार्लसनला पहिल्यांदाच क्लासिकल टाइम कंट्रोलमध्ये पराभूत केलं. हा सामना नॉर्वेच्या स्टवान्गर येथे पार पडला. त्यामुळे कार्लसनच्या मनातलं दु:ख लपलं नाही. कारण आपल्या घरातच आणि चाहत्यांसमोर हार पत्कारावी लागली. त्याचा प्रभाव सामना संपल्यावर स्पष्ट दिसून आला. पराभवानंतर कार्लसनच्या मनातला राग उफाळून आला आणि त्याने टेबलवर जोरदार मुक्का मारला आणि मैदान सोडलं. या सामन्यातील पहिल्या फेरीत कार्लसन गुकेशवर भारी पडला होता. पण त्यानंतर डी गुकेशने जोरदार कमबॅक केलं आणि सामना जिंकला.
कार्लसनने या पराभवानंतर सोशल मीडियावर एक विचित्र पोस्ट केली आहे. यात त्याने लिहिलं की, ‘जेव्हा तुम्ही राजाविरुद्ध खेळता तेव्हा चूकता कामा नये.’ हा संदेश त्याच्या वर्चस्वाचे प्रतीक होते. पण गुकेशने सहाव्या फेरीत कार्लसनला बरोबर गुंडाळला.पांढऱ्या मोहऱ्यासह खेळताना 19 वर्षी गुकेशने बॅकफूटवर असूनही संयम सोडला नाही. कार्लसनने या खेळात आपली आघाडी ठेवली होती. पण स्पर्धेच्या इंक्रिमेंट टाईम कंट्रोलमध्ये (वेगाने खेळाला जातो) कार्लसनवर दबाव वाढला. गुकेशने या संधीचं सोनं केलं आणि कार्लसनला चूक करण्यास भाग पाडलं. चूक होताच सामना फिरवला आणि शेवटी विजय मिळवला.
OH MY GOD 😳🤯😲 pic.twitter.com/QSbbrvQFkE
— Norway Chess (@NorwayChess) June 1, 2025
पराभवानंतर कार्लसनला काय झालं तेच कळालं नाही. हातात असलेला सामना गमवल्याने त्याला राग अनावर झाला. मग काय पराभूत मानसिकेतच खूर्चीवरून उठला आणि टेबलवर जोरात मुक्का मारला. त्यानंतर स्पर्धेचं ठिकाण सोडून कारमध्ये जाऊन बसला आणि गेला. प्रसिद्ध बुध्दीबळपटू सुसान पोल्गर या पराभवाचं विश्लेषण करताना सांगितलं की, ही कार्लसनच्या करिअरमधील सर्वात मोठी हार आहे. दुसरीकडे, या विजयानंतर डी गुकेश खूपच खूश होता. कारण कार्लसनने यापूर्वी क्लासिकल खेळ आणि दबावात कामगिरी करण्याच्या क्षमतेवर प्रश्न उपस्थित केले होते.