Novak Djokovic इतिहास रचणार?, अमेरिका ओपन टेनिस स्पर्धेचा अंतिम सामना, सामना कधी, कुठे आणि कसा पाहणार?

| Updated on: Sep 12, 2021 | 7:31 PM

जगाती अव्वल क्रमांकाचा खेळाडू असणारा नोव्हाक आज US ओपनच्या अंतिम सामन्यात विजय मिळवण्यासाठी मैदानात उतरणार आहे. रशियाच्या डेनिल मेदवेदेवशी नोव्हाकची लढत असून हा सामनाा अनेक कारणांनी त्याच्यासाठी महत्त्वाचा आहे.

Novak Djokovic इतिहास रचणार?, अमेरिका ओपन टेनिस स्पर्धेचा अंतिम सामना, सामना कधी, कुठे आणि कसा पाहणार?
नोव्हाक जोकोव्हिच
Follow us on

US open 2021: टेनिस विश्वातील मानाची स्पर्धा असणाऱ्या अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धचा पुरुष एकेरीचा अंतिम सामना आज मध्यरात्री 1 वाजून 30 मिनिटांनी खेळवला जाणार आहे. यावेळी सर्बियाचा स्टार टेनिसपटू नोव्हाक जोकोव्हिच (Novak Djokovic) विरुद्ध रशियाचा डॅनिल मेदवेदेव (daniil medvedev) यांच्यात हा सामना रंगणार आहे. हा सामना नोव्हाकसाठी अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. कारण त्याच्यासाठी हे 21 वं ग्रँडस्लॅम आहे. आतापर्यंत राफेल नदाल आणि रॉडर फेडरर या दिग्गजांसह नोव्हाकनेही 20 ग्रँडस्लॅम पटकावले आहेत. त्यामुळे आजचा सामना जिंकल्यास नोव्हाकचे हे 21 वे ग्रँडस्लॅम होईल आणि इतक्या वेळा ग्रँडस्लॅम पटकावणारा तो इतिहासातील पहिला खेळाडू ठरेल.

आजच्या विजयासोबतच आणखी एक विक्रमही नोव्हाकच्या नावावर होऊ शकतो. हा विक्रम म्हणजे ‘कॅलेंडर स्लॅम’. यंदा नोव्हाकने ऑस्ट्रेलियन, फ्रेंच ओपन आणि विम्बल्डन अशा तीनही ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकल्यामुळे अमेरिकन ओपन जिंकत तो एका वर्षात इतक्या स्पर्धा जिंकणारा मागील बराच वर्षातील पहिलाच खेळाडू ठरेल. याआधी तब्बल 52 वर्षांपूर्वी म्हणजेच 1969 मध्ये रॉड लेव्हर याने ही कामगिरी केली होती.

कधी खेळवला जाईल सामना?

नोव्हाक जोकोव्हिच आणि डॅनिल मेदवेदेव यांच्यातील सामना आज म्हणजेच 11 सप्टेंबरच्या मध्यरात्री भारतीय प्रमाणवेळेनुसार 1 वाजून 30 मिनिटांनी खेळवला जाईल.

कुठे पाहता येईल सामना?

अमेरिकन ओपनचा हा अंतिम सामना लाईव्ह स्टार स्पोर्ट्स सेलेक्ट 1 आणि स्टार स्पोर्ट्स सेलेक्ट HD  या चॅनेल्सवर पाहता येणार आहे.

इतर बातम्या

दीपक चहरच्या ‘त्या’ खेळीनंतर धोनीचा खास मेसेज, दीपकने स्वत:च सांगितला किस्सा, माही म्हणाला…

Ind vs Eng : पाचवी टेस्ट रद्द, इंग्लंड क्रिकोट बोर्डाला 400 कोटींचा फटका, सौरव गांगुली तातडीनं इंग्लंडच्या दौऱ्यावर

PHOTO : चेन्नई सुपरकिंग्सचा संघ उर्वरीत IPL मध्ये सर्वात घातक?, ‘या’ पाच खेळाडूंनी स्पर्धेआधीच दाखवला जलवा

(Novak Djokovic will play US Open final against daniil medvedev)