
जागतिक पातळीवर नंबर 1 चा मुकूट मिरवणाऱ्या मॅग्नस कार्लसनला मागच्या काही सामन्यात भारतीय बुद्धीबळपटूंकडून पराभवाची चव चाखावी लागली आहे. विश्वविजेत्या डी गुकेश याने त्याला चीतपट केलं होतं. आता युवा बुद्धिबळ ग्रँडमास्टर प्रज्ञानंदने त्याला पराभूत केलं आहे. लास वेगासमध्ये फ्रीस्टाईल बुद्धीबळ ग्रँड स्लॅम स्पर्धेत प्रज्ञानंदने हा विजय मिळवला आहे. प्रज्ञानंदच्या बुद्धीबळ स्पर्धेच्या कारकिर्दीतील हा सर्वात मोठा विजय आहे. कारण त्याने फक्त 39 डावातच खेळ खल्लास केला. प्रज्ञानंदने चौथ्या फेरीत 10 मिनिटं आणि 10 सेकंदात कार्लसनचा पराभव केला. या सामन्यात प्रज्ञानंदची मजबूत पकड दिसून आली. त्याने 93.9 टक्के अचूकता दाखवली. तर कार्लसनला फक्त 84.9 टक्के सामना आपल्या ताब्यात ठेवण्यात यश आलं. सरते शेवटी प्रज्ञानंद कार्लसनवर भारी पडला. आर प्रज्ञानंदने आठ खेळाडूंच्या व्हाईट ग्रुपमध्ये 4.5 गुणांसह संयुक्तपणे अव्वल स्थान पटकावलं आहे. या स्पर्धेत प्रज्ञानंद क्लासिकल, रॅपिड आणि ब्लिट्झ या तिन्ही प्रकारात विजयी ठरला आहे.
आर प्रज्ञानंदने फ्रीस्टाइल ग्रँड स्लॅम टूरच्या टॉप ब्रॅकेटच्या उपांत्य पूर्व फेरीमध्ये प्रवेश केला आहे. दुसरीकडे, कार्लसनवर या पराभवाचा इतका परिणाम झाला की त्यातून तो सावरूच शकला नाही. पुढच्या फेरीत वेस्ली सो विरुद्ध पराभूत झाला आणि अमेरिकेच्या एरोनिययनने टॉप ब्रॅकेटमध्ये जेतेपदाच्या शर्यतीतून आऊट झाला. कार्लसनने यापूर्वी पॅरिस आणि कार्लजूएतील फ्रीस्टाईल स्पर्धेचं ग्रँडस्लॅम जिंकलं आहे. दरम्यान, दुसऱ्या गटातून भारता एरिगासी हा उपांत्यपूर्व फेरीत पोहोचण्यात यशस्वी ठरला आहे. उपांत्यपूर्व फेरीत प्रज्ञानंदचा सामना अमेरिकेच्या फॅबियानो कारुआनाशी, तर एरिगासीचा सामना अब्दुसत्तोरोव्ह नोदिरबेकशी होणार आहे.
PRAGGNANANDHAA BEAT MAGNUS CARLSEN AT FREESTYLE CHESS. 🇮🇳 pic.twitter.com/bQc9NBx4jd
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) July 17, 2025
भारताचे ग्रँडमास्टर आर प्रज्ञानंद जेतेपदापासून फक्त तीन पावलं दूर आहे. उपांत्यपूर्व, उपांत्य आणि अंतिम फेरी अशी लढत असणार आहे. फ्रीस्टाइल बुद्धिबळाचा उपांत्यपूर्व फेरीचा सामना गुरुवारी लास वेगासमध्ये खेळला जाईल. यानंतर वरच्या श्रेणीतील पराभूत खेळाडू खालच्या श्रेणीत जातील आणि विजेते खेळाडू 2,00,000 अमेरिकन डॉलर्सच्या पहिल्या बक्षीसासाठी स्पर्धा करत राहतील.