PKL 2021-22 Bengaluru Bulls vs Telugu Titans: शेवटच्या क्षणाला यशस्वी पकड, सलग दुसरी मॅच टाय

| Updated on: Jan 01, 2022 | 9:55 PM

पण शेवटच्या क्षणाला टायटन्सचा रेडर रोहित कुमारची पकड करुन संघाला पराभवपासून वाचवलं. यू मुंबाकडून सलामीच्या सामन्यात पराभूत झाल्यानंतर बेंगळुरु बुल्सने सलग तीन विजय मिळवले होते.

PKL 2021-22 Bengaluru Bulls vs Telugu Titans: शेवटच्या क्षणाला यशस्वी पकड, सलग दुसरी मॅच टाय
Follow us on

बेंगळुरु: यू मुंबा-यूपी योद्धानंतर बेंगळुरु बुल्स विरुद्ध तेलगु टायटन्स हा प्रो कबड्डी लीग स्पर्धेतील आजच्या दिवसातील सलग दुसरा सामना टाय झाला. दोन्ही संघांचे प्रत्येकी 34-34 गुण झाले. बेंगळुरूचा स्टार पवन कुमार संपूर्ण सामन्यात विशेष चमक दाखवू शकला नाही. पण शेवटच्या क्षणाला टायटन्सचा रेडर रोहित कुमारची पकड करुन संघाला पराभवपासून वाचवलं. यू मुंबाकडून सलामीच्या सामन्यात पराभूत झाल्यानंतर बेंगळुरु बुल्सने सलग तीन विजय मिळवले होते. (Pro Kabaddi League PKL 2021 22 Bengaluru Bulls vs Telugu Titans tie)

पवन सेहरावत मागच्या सामन्यात दमदार प्रदर्शन करुन 22 गुणांची कमाई केली होती. पण आजच्या सामन्यात पवन सेहरावतला फक्त आठ पॉईंटसची कमाई करता आली. रेड आणि टॅकलमध्ये दोन्ही संघांनी तोडीसतोड खेळ केला. शेवटपर्यंत सामन्याचं पारडं कुठल्या बाजूला झुकेल ते सांगता येत नव्हतं. शेवटच्या क्षणाला पवन कुमारने यशस्वी टॅकल केल्यामुळे आजच्या दिवसातील दुसरा सामना बरोबरीत सुटला.

यूपी योद्धा विरुद्ध यू मुंबा सामना सुद्धा 28-28 असा बरोबरीत सुटला होता. तेलगु टायटन्स या स्पर्धेत संघर्षच करत आहे. त्यांना अजून विजयाचं खातं उघडता आलेलं नाही. आजच्या सामन्यात त्यांना विजयाची संधी होती. पण अखेरच्या क्षणी चूक झाली. तेलगु टायटन्सकडून अंकित बेनिवालने दमदार सुपर टेन गुणांची कमाई केली. कोल्हापुरच्या सिद्धार्थ देसाईवर या संघाची मुख्य भिस्त आहे.

संबंधित बातम्या:
Ravi Shastri| ‘चालू दे तुमचं’, रवी शास्त्रींनी सांगितला पंत-गिल बरोबरचा शौचालयातला ‘तो’ किस्सा
IND vs SA: काल जंगी सेलिब्रेशन, आज वाँडरर्सवर टीम इंडियाने गाळला घाम
Explained: परदेशात भारतीय गोलंदाजांच्या जबरदस्त कामगिरीमागे ‘ही’ प्रमुख तीन कारणं

(Pro Kabaddi League PKL 2021 22 Bengaluru Bulls vs Telugu Titans tie)