साब्रिना विटमॅन..! पुरूष फुटबॉल संघाला मार्गदर्शन करणारी महिला प्रशिक्षक, असा आहे प्रेरणादायी प्रवास

फुटबॉल हा जगभरातील लोकप्रिय खेळ.. खेळ भावना आणि मैदानातील वाद बरंच काही आतापर्यंत फुटबॉल चाहत्यांनी अनुभवलं आहे. पण एखाद्या पुरुष संघाचं एका महिलेने प्रशिक्षकपद भूषवणं ही पहिलीच वेळ असावी. यामुळे येणाऱ्या पिढ्यांना प्रेरणा मिळणार आहे. चला जाणून घेऊयात साब्रिन विटमॅनबाबत...

साब्रिना विटमॅन..! पुरूष फुटबॉल संघाला मार्गदर्शन करणारी महिला प्रशिक्षक, असा आहे प्रेरणादायी प्रवास
साब्रिना विटमॅन..! पुरूष फुटबॉल संघाला मार्गदर्शन करणारी महिला प्रशिक्षक, असा आहे प्रेरणादायी प्रवास
| Updated on: Sep 05, 2025 | 2:49 PM

फुटबॉल मैदानात उतरणाऱ्या खेळाडूंना मैदानाबाहेरून मार्गदर्शन देत चुका दुरूस्त करण्याची मोठी जबाबदारी ही प्रशिक्षकाची असते. अनेकदा मैदानाबाहेर आपला आवाज चढवून रणनिती आखावी लागते. प्रशिक्षकांचा राग, त्यांची संघाप्रती असलेली भावना हे सर्व काही तुम्ही अनुभवलं असेल. कारण मुख्य प्रशिक्षक हा फुटबॉलची धोरणात्मक रणनिती, खेळाडूंचा विकास आणि एकूण कामगिरीसाठी जबाबदार असतो. यावरून त्याच्या खांद्यावर संघाची किती मोठी जबाबदारी असते हे कळून येतं. पण एखाद्या पुरुष संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी महिला सांभाळते, असं सांगितलं तर तुम्हा आश्चर्याचा धक्का बसेल. पण हे खरं आहे. साब्रिना विटमॅन ही सर्व सीमा ओलांडून मुख्य प्रशिक्षकपदाची भूमिका पार पाडत आहे. जर्मनीतील पुरुष व्यावसायिक संघाची पहिली महिला मुख्य प्रशिक्षक काम करत आहे. तिने मैदानावर निकाल देण्याची जबाबदारीच घेतली नाही तर एका नवीन युगाच्या आशाही पेलल्या आहेत. एफसी इंगोल्स्टॅड येथे मुख्य प्रशिक्षक होणे हा केवळ प्रशासकीय बदल नाही. नेतृत्वाला कसलीच बंधनं नसतात हे दाखवून देणारा मोठा निर्णय आहे.

संयम, दृढनिश्चयता आणि नम्रतापूर्वक वागणं पाहून साब्रिना विटमॅन ही मुख्य प्रशिक्षकाची भूमिका कशी पेलत असेल हे दिसून येतं. इतकं मोठं धाडसी पाऊल उचलणे खरंच कौतुकास्पद आहे. स्वतःबद्दल कमी आणि तुमच्या संघाबद्दल, खेळाडूंबद्दल आणि प्रक्रियेबद्दल जास्त बोला, असं तिची ठोस भूमिका आहे. साब्रिनाच्या प्रत्येक शब्दांमध्ये एक वजन असल्याचं दिसून येते. एफसी इंगस्टॅडचे व्यवस्थापकीय संचालक डायटमार बेयर्सडॉर्फर यांनी सांगितलं की, “साब्रिनाने प्रभावीपणे सिद्ध केले आहे की केवळ तरुण खेळाडू विकसित करणे, संपूर्ण संघ विकसित करणे, त्यांच्या पूर्ण क्षमतेपर्यंत पोहोचण्यास मदत करणे आणि यश मिळवणे शक्य आहे. तिच्यात असे करण्याची क्षमता आहे.”

साब्रिना विटमॅन हिच्यातील दृढ निश्चय नक्कीच फुटबॉल विश्वात एक उंची गाठेल, यात काही शंका नाही. तिच्या आत्मविश्वास आणि फुटबॉलप्रती असलेली आस्था यातून अधोरेखित होते. फुटबॉलमध्ये नेहमीच आवड, धैर्य आणि जिंकण्याची धडपड असते. हे सर्व गुण एक प्रशिक्षक म्हणून साब्रिना विटमॅन हिच्यात दिसून येतात. त्यामुळे फक्त एक संघ खेळाच्या लढाईतून जात नाही. तर फुटबॉल विश्वातील एक मोठी चळवळ आहे असं म्हंटलं तर वावगं ठरणार नाही. दृढ निश्चय असेल तर पुरुष स्त्री हा भेद आडवा येत नाही हे देखील साब्रिना विटमॅनने दाखवून दिलं आहे.