Shivraj Rakshe | डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे याला बक्षिस म्हणून काय काय?

| Updated on: Nov 20, 2023 | 9:18 PM

Shivraj Rakshe | शिवराज राक्षे याने महाराष्ट्र केसरी अंतिम फेरीत हर्षवर्धन सदगीर याला पराभवाची धुळ चारली आहे. शिवराज राक्षे याच्यावर महाराष्ट्र केसरी ठरल्यानंतर सोशल मीडियावरुन कौतुक होत आहे. शिवराजला चांदीच्या गदेसोबत बक्षिस म्हणून काय मिळालं जाणून घ्या.

Shivraj Rakshe | डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे याला बक्षिस म्हणून काय काय?
Follow us on

संतोष जाधव, टीव्ही 9 धाराशिव | कुस्तीपटू शिवराज राक्षे याने मानाची चांदीची महाराष्ट्र केसरी गटा पटाकवली आहे. शिवराज राक्षे हा 65 व्या महाराष्ट्र केसरी ठरला आहे. हर्षवर्धन सदगीर (माती गट) विरुद्ध शिवराज राक्षे (गादी गट) या दोघात अंतिम महाराष्ट्र केसरीसाठी कडवी लढत झाली. शिवराज राक्षे याने हर्षवर्धन सदगीर याला चितपट करत अंतिम सामन्यात बाजी मारली. हर्षवर्धन सदगीर याला कुस्तीच्या वेळी 1.42 मिनिटांचा खेळ बाकी असताना हाताला झटका लागला. त्यामुळे हर्षवर्धन सदगीर जखमी झाला. मात्र हर्षवर्धन याने योद्ध्याप्रमाणे दुप्पट जोशाने जोशाने मैदानात उतरला. मात्र शिवराज राक्षे याने हर्षवर्धन सदगीर याला अस्मान दाखवलं. दरम्यान शिवराज राक्षे दुसऱ्यांदा महाराष्ट्र केसरीचा किताब पटकवणारा मानकरी ठरला. शिवराज राक्षे पुण्यातील असून तो नांदेडकडून प्रतिनिधित्व करतो.

महाराष्ट्र केसरी महामुकाबला हा धाराशिव येथील तुळजाभवानी स्टेडियमच्या गुरुवर्य के टी पाटील क्रीडा नगरी येथे महाराष्ट्र केसरी स्पर्धा संपन्न झाला. या महामुकाबल्याला धाराशिवमधील तमाम नागिरकांनी एकच उपस्थिती लावली होती. धाराशिवमधील नागरिकांनी याची देही याची डोळा अंतिम सामन्याचा थरार अनुभवला. शिवराज राक्षे याला विजयानंतर मानाच्या चांदीच्या गदेने सन्नाामनित करण्यात आलं. आमदार कैलास पाटील, जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी आणि इतर मान्यवर यांच्या हस्ते बक्षीस देण्यात आलं. तसेच शिवराजने स्कॉर्पियो कारही जिंकली.

उपांत्य फेरीत काय झालं?

दरम्यान त्याआधी उंपात्य फेरीतील थरार पार पडला. माती गटातून गणेश जगताप विरुद्ध हर्षवर्धन सदगीर अशी लढाई झाली. हर्षवर्धन सदगीर याने गणेश जगताप याच्यावर 6-2 फरकाने मात करत विजय मिळवला. तर गादी गटातून शिवराज राक्षे विरुद्ध पृथ्वीराज मोहोळ अशी लढत झाली. इथे शिवराजने सामना एकतर्फी जिंकला. पृथ्वीराजला एकही गुण मिळवता आला नाही. शिवराजने 10-0 असा विजय मिळवला. कुस्तीगीर परिषद, धाराशिव तालीम संघ आणि आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाने या स्पर्धेचं आयोजन केले होते. सुधीर पाटील, अभिराम पाटील आणि आदित्य पाटील यांनी यात मोलाची भुमिका बजावली.