Maharashtra Kesari 2023 | शिवराज राक्षे दुसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी, हर्षवर्धन सदगीर याच्यावर एकतर्फी मात

Maharashtra Kesari Final Result 2023 | महाराष्ट्र केसरी फायनल सामन्याचं आयोजन हे धाराशीवमधील गुरुवर्य के टी पाटील क्रीडा नगरीतील तुळजाभवानी स्टेडियममध्ये करण्यात आलं होतं.

Maharashtra Kesari 2023 | शिवराज राक्षे दुसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी, हर्षवर्धन सदगीर याच्यावर एकतर्फी मात
Follow us
| Updated on: Nov 20, 2023 | 9:17 PM

धाराशिव | या क्षणाची मोठी बातमी समोर आली आहे. शिवराज राक्षे याने 65 वा महाराष्ट्र केसरी किताब पटकावला आहे. शिवराज राक्षे याने मानाची गदा पटकावली आहे. या महाराष्ट्र केसरी फायनल सामन्याचं आयोजन हे धाराशीवमधील गुरुवर्य के टी पाटील क्रीडा नगरीतील तुळजाभवानी स्टेडियममध्ये करण्यात आलं होतं. महाराष्ट्र केसरी फायनलमध्ये माती गटातून हर्षवर्धन सदगीर याने धडक मारली. तर गादी गटातून शिवराज राक्षे अंतिम फेरीत पोहचला होता. या दोघांमध्ये प्रतिष्ठेच्या लढतीत शिवराज राक्षे याने बाजी मारली. आता महाराष्ट्र केसरी ही मानाची गदा पटाकावल्यानंतर शिवराज राक्षे याच्यावर सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.

सेमी फायनलमध्ये काय झालं?

त्याआधी माती आणि गादी गटातून महाराष्ट्र केसरी सेमी फायनल सामना पार पडला. माती गटातून गणेश जगताप आणि हर्षवर्धन सदगीर आमनेसामने होते. या सामन्यात हर्षवर्धनने गणेश जगतापचा 6-2 असा पराभव केला. तर गादी गटातून सेमी फायनलमध्ये शिवराज राक्षे याने पृथ्वीराज मोहोळ याच्यावर 10-0 अशा फरकाने एकतर्फी विजय मिळवला.

शिवराज राक्षे याची पहिली प्रतिक्रिया

शिवराज राक्षे याने दुसऱ्यांदा महाराष्ट्र केसरीचा किताब पटकावल्यानंतर टीव्ही 9 मराठीला पहिली प्रतिक्रिया दिली. शिवराजने यावेळेस देवाचे आभार मानले. तसेच महाराष्ट्र केसरीबाबत शिवराजने काय प्रतिक्रिया दिली हे आपण जाणून घेऊयात. “मी आजचा विजय हा माझ्या आई वडील आणि गुरुजनांना समर्पित करतो. महाराष्ट्र केसरीच्या वादाबाबत मी बोलणार नाही. मात्र दोन्ही महाराष्ट्र केसरीचे किताब मी पटकावले आहेत. आम्ही दोघेही एकाच वस्तादाचे पैलवान आहोत त्यामुळे दोघांचे डावपेच एकमेकांना माहिती होते. मात्र ईश्वर कृपेने मी विजयी ठरलो”, अशी प्रतिक्रिया शिवराज राक्षे याने दिली.

बक्षिसांची लयलूट

दरम्यान महाराष्ट्र केसरी ठरलेल्या विजेत्या शिवराज राक्षे याला चांदीची गदा देण्यात आली आहे. तसेच स्कॉर्पिओ कारही देण्यात येणार आहे. तर उपविजेत्या मानाची चांदीची गदा, ट्रॅक्टर आणि आदी बक्षिसे देण्यात येणार आहे.

Non Stop LIVE Update
जरांगे पाटील जानेवारीत राजकारणात येणार? या आमदाराचा काय दिला संकेत?
जरांगे पाटील जानेवारीत राजकारणात येणार? या आमदाराचा काय दिला संकेत?.
हिवाळी अधिवेशनात NCP च्या दोन्ही गटांना एकच कार्यालय, नेमप्लेट कुणाची?
हिवाळी अधिवेशनात NCP च्या दोन्ही गटांना एकच कार्यालय, नेमप्लेट कुणाची?.
उनके बस की बात नही, मराठा आरक्षणावरून लोकसभेत विनायक राऊत काय म्हणाले?
उनके बस की बात नही, मराठा आरक्षणावरून लोकसभेत विनायक राऊत काय म्हणाले?.
शरद पवार यांनी घेतली उपराष्ट्रपतींची भेट, अचानक भेटीमागचं कारण काय?
शरद पवार यांनी घेतली उपराष्ट्रपतींची भेट, अचानक भेटीमागचं कारण काय?.
'त्या' मंत्र्यांचं पोस्टमॉर्टेम व्हावे, राऊतांची शिंदेंना काय विनंती?
'त्या' मंत्र्यांचं पोस्टमॉर्टेम व्हावे, राऊतांची शिंदेंना काय विनंती?.
गुणरत्न सदावर्ते यांचं आरक्षणावर मोठं वक्तव्य, डंके की चोट पर मला....
गुणरत्न सदावर्ते यांचं आरक्षणावर मोठं वक्तव्य, डंके की चोट पर मला.....
पोकळ घोषणांचा धूर,यंदाचं हिवाळी अधिवेशन वादळी? विरोधकांची बॅनरबाजी काय
पोकळ घोषणांचा धूर,यंदाचं हिवाळी अधिवेशन वादळी? विरोधकांची बॅनरबाजी काय.
नागपूर सज्ज, हिवाळी अधिवेशनादरम्यान तब्बल ११ हजार पोलिसांचा फौजफाटा
नागपूर सज्ज, हिवाळी अधिवेशनादरम्यान तब्बल ११ हजार पोलिसांचा फौजफाटा.
नवी मुंबईतील 'या' भागातून अल्पवयीन मुलं अचानक बेपत्ता, नेमकं घडतंय काय
नवी मुंबईतील 'या' भागातून अल्पवयीन मुलं अचानक बेपत्ता, नेमकं घडतंय काय.
...तर हे बाबासाहेबांना अभिवादन राहिलं असतं, सुजात आंबेडकरांची खंत काय?
...तर हे बाबासाहेबांना अभिवादन राहिलं असतं, सुजात आंबेडकरांची खंत काय?.