नागपुरातील राष्ट्रीय खेळाडूवर फूटपाथवर मोमोज विकण्याची वेळ, मायबाप सरकार मदतीचा हात द्या!

| Updated on: Jul 08, 2021 | 11:55 AM

उदनिर्वाहासाठी फुटपाथवर ‘मोमोज’विकण्याची वेळ हर्ष झाडे याच्यावर ओढावली आहे. त्यामुळे मायबाप सरकारने मदतीचा हात द्यावा, अशी मागणी आता होत आहे.

नागपुरातील राष्ट्रीय खेळाडूवर फूटपाथवर मोमोज विकण्याची वेळ, मायबाप सरकार मदतीचा हात द्या!
कोरोनामुळे राष्ट्रीय शुटिंग चॅम्पियन हर्षल झाडेवर हलाखीचं जगणं आलंय. उदनिर्वाहासाठी फुटपाथवर ‘मोमोज’विकण्याची वेळ त्याच्यावर ओढावली आहे.
Follow us on

नागपूर : कोरोनात रोजगार गेल्याने अनेकांवर आर्थिक संकट ओढवलंय. यात राष्ट्रीय खेळाडूंचाही समावेश आहे. नागपुरातील हर्षल झाडे (Harshal Zade) राष्ट्रीय शुटिंग चॅम्पियन आहे. पण कोरोनामुळे हर्षल झाडेवरंही हलाखीचं जगणं आलंय. उदनिर्वाहासाठी फूटपाथवर ‘मोमोज’ विकण्याची वेळ त्याच्यावर ओढावली आहे. त्यामुळे मायबाप सरकारने मदतीचा हात द्यावा, अशी मागणी आता होत आहे. (Time to sell momos on the footpath to the national player Harshal Zade in Nagpur)

फूटपाथवर मोमोज विकण्याची वेळ

कोरोनात शुटिंगचा सराव बंद झाला, कोचिंगही बंद झालं. हर्षलचे उत्पन्नाचे सगळे स्रोत बंद झाले. घरं कसं चालवायचं हा प्रश्न होता. त्यामुळे त्याने फुटपाथवर मोमोज विकण्यास सुरुवात केलीय. 10 एम एअर रायफलमध्ये महाराष्ट्राचं प्रतिनिधित्त्व करणाऱ्या हर्षल झाडे या खेळाडूवर आज फूटपाथवर मोमोज विकण्याची वेळ आलीय.

राष्ट्रीय खेळाडूच्या अशी परिस्थिती, तर बाकीच्यांची कल्पना न केलेली बरी…!

कोरोनाच्या संकटात सरकार खेळाडूच्या पाठीशी उभं न राहल्याने, ही परिस्थिती ओढवल्याचं हर्षलने सांगितलं. कोरोना काळात एका राष्ट्रीय खेळाडूवर फूटपाथवर मोमोज विकण्याची वेळ आली असेल, तर मग जिल्हा लेव्हल, राज्य लेव्हलवर खेळणाऱ्या खेळाडूची काय दुर्दशा झाली असेल याची कल्पना करवत नाही, अशा खिन्न भावना हर्षल यांनी व्यक्त केल्या.

खेळाडूंना सरकारकडून मदतीची हात हवा

कोरोनाच्या या काळात खेळाडूंचे खूप हाल झाले. त्यांच्या राहण्या-खाण्याची खूप दुर्दशा झाली. अशा काळात सरकारने खेळाडूंच्या पाठीशी ठामपणे उभा राहणं गरजेचं होतं. आतापर्यंत तरी सरकारकडून कोणतीही मदत मिळाली नाही. मात्र आता इथून पुढेतरी सरकारने आमच्यासारख्या नवोदित खेळाडूंवर लक्ष देऊन त्यांना मदतीचा हात देणं गरजेचं असल्याचं मत हर्षल यांनी टीव्ही 9 शी बोलताना व्यक्त केलं.

(Time to sell momos on the footpath to the National Player Harshal Zade in Nagpur)

हे ही वाचा :

Sri Lanka Tour : भारतीय संघाचा सराव जोमात सुरु, आपआपसांत सामना खेळून रणनीती मजबूत करण्याचे काम सुरु, पाहा फोटो

ICC Players of the Month साठी ‘या’ दोन भारतीय नामांकित, इंग्लंडविरुद्धच्या सामन्यांतील कामगिरीचा फायदा